बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी नेहा चा interview बघितला का??>> मी १-२ पाहिले. तिच्यासाठी ट्रेंड सुरु करा असं ती सांगत आहे.सेन्सिबल बोलते ती , पण ती बिग बॉस मटेरियल नाही वाटत. (कपटी वगैरे)
श्रीसंथला गोड भाषेत समजावून सांगण्यात आलं. रोमिल , सुरभीने त्याच्या खेळाबाबत बरंच काही सांगितलं. (टास्कमधल्या)
सुरभीने असं काही केला नाही हे जेव्हा सलमानने सांगितलं तेव्हा दीपिका गालातल्या गालात हसत होती.
सुरभी किती बोलते, जलोटाशी बोलताना सभ्य भाषेत फटकारलं तिने. थोडा गोंधळ कंट्रोल केला तर मस्त आहे ती. एकदम बिनधास्त.

होना, खरच अँगर मॅनेजमेन्ट इश्यु, रिहॅब पेश्न्ट्स सारखं वर्तन कंट्रोल केल तर सगळ्यांना गप्प करायची कुवत आहे सुरभि मधे, एकदम विनर मटेरियल !

यस्स, माझं गट फिलिंग बरोबर येतय , उडती बातमी आली आहे, मेघा धाडे वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून येतेय सोमवारपासून :टाळ्या:

कालचा एपी आता बघितला, सलमान मस्तच एकदम. मांजरेकरांनी पण बघायला हवे असे वाटले.

हा सिजन चालू झाल्यापासून वेळ मिळत नाहीये सो क्लिपस बघते वुटवर, आता मेघा धांडे खरेच येणार असेल तर नकोच बघायला, फक्त विकेंड एपी बघावे का विचार करतेय.

एक सांगाल का कोणी , अनुप जसलीन ब्रेकप खरेच झाले की अफवा होती

एक सांगाल का कोणी , अनुप जसलीन ब्रेकप खरेच झाले की अफवा होती>>> सब अफवा है....ते एकत्र आहेत ही पण आणि ब्रेकप झालं हे पण. सब खेल है! मायाजाल.... Lol

हो, मेघा धाडे येतीये (बऱ्याच लोकांनी कन्फर्म केलंय ) आणि येण्यापूर्वीच ट्विटरवर ट्रेण्ड सुरु झाला तिच्यासाठी. वाइल्ड कार्ड कधी जिंकत नसतात तसे, पण छान खेळावी जशी मराठी मध्ये खेळली होती.

सलमान काल खूप दिवसांनी आवडला, मस्तं दिसत होता आणि खराखुरा वीकेन्डचा वार वाटला, प्रमोशन्स किंवा इतर फालतु गेम्स नव्हते !
मेघाचा इंट्रव्ह्युही आला आता जाण्यापूर्वीचा, ती म्हणतेय ती हा सिझन न बघता फ्रेश माइंड घेऊन चाल्लीये, पण मेघा सारखी व्यक्ति होमवर्क न करता जाईल हे काही पटत नाही Wink

आता एवढ तर confirm की मेघा finale पर्यंत पोहचणार.
कारण तिच fan following बाकीच्यांपेक्षा जास्त आहे असा एक अंदाज...

अब आयेगा असली मजा!
आतापर्यंत कधीतरी बघत होते हिंदी बी बॉ! आता नियमित बघेन.
ती सुरभी इरिटेट करते. अजून तरी दीपिकाच बरी वाटतेय.
दीपिका मेघाने हातमिळवणी करावी!

हो... दिपिका आणि मेघा एकत्र यायला पहिजेत.... येतीलही बहुतेक कारण मेघाचा एकंदर नूर बघता ती रोमिल आणि सुरभी गॅंगमध्ये शामिल व्हायची शक्यता कमीच दिसतीय!

मेघा बिबॉ मराठीत चमकली याचं मोठं श्रेय रेरा गॅंगच्या तिला कमी लेखण्याला जाते. इथं पण जर तिला कॉर्नर केले गेले तर ती आणखी मोठी होणार. सध्याच तिला बेक्कार सपोर्ट आहे बाहेर.

मेघा गेस्ट म्हणून येणार नाहीये, प्रॉपर वाइल्ड कार्ड एंट्री काँटेस्टन्ट , हे खात्रीशीर सोर्स ने सांगितलय Wink
मेघापेक्षा अनेक पटींनी जास्त फॅन्स हिन्दी सेलेब्जना आहेत त्यामुळे इट्स नॉट इझी राइड फॉर मेघा, भरपूर ओझं असेल अपेक्षांचं !
करणवीर, दीपिका, नेहा सगळ्यांचे फॉलोअर्स million + रेंज मधे आहेत, मेघा अजुन 100k पर्यंत नाही पोचली आहे.
पण मजा येईल पहायला, मेघा कोणता गृप जॉइन करेल ? कि स्वतःचाच गृप बनवेल ?कॉमनर्स बरोबर कनेक्ट होईल कि सेल्लेब्ज ?
मला वाटतय ती मायानॉरिटी गृप जॉइन करेल, कदाचित कॉमनर्स बरोबर Happy
तिने श्री-दीपिकाच्या ऑपॉझिट जाऊन त्यांना टक्कर द्यावी अशी माझी इच्छा , दीपिकाला तर काढावच बाहेर जसं रेशमला काढल Proud
स्वतःचा फार आवाज नसलेल्या उर्वषी, करणवीर , जस्लीन , शिव इ. पब्लिकला बरोबर घेऊन पुढे जावं तिनी स्ट्राँग लोकांचा गृप जॉइन करण्यापेक्षा.

DJ सुरभी आणि रोमिलसारख्या डॉमिनंट लोकांबरोबर तिचे पटेल?

आणि ते फॅन फॉलोइंगचे जे नंबर्स आहेत त्यात एक लक्षात घेतले पाहिजेल की बाकीच्या सेलेब्सचे फॅन्स त्यांच्या इतर कामांमुळे/सिरीअल्समुळे आहेत, त्यातले किती बिग बॉस फॉलो करत असतील कुणास ठाऊक पण मेघाचे बहुतांश फॅन्स तिच्या मराठी बिग बॉसच्या प्रवासादरम्यान बनले असावेत त्यामुळे ते तिला इकडे पण सपोर्ट करणारच!

आत्ता माहित नाही स्वरुप, बघुया कशी खेळतेय.
स्वतःचा फार आवाज नसलेल्या उर्वषी, करणवीर , जस्लीन , शिव इ. पब्लिकला बरोबर घेऊन पुढे जावं तिनी स्ट्राँग लोकांचा गृप जॉइन करण्यापेक्षा, तिने लिड केलेल बघायला आवडेल.

उद्याचा प्रोमो.. वॉव, मेघाची काय सुपर धमाकेदार एंट्री आहे, अ‍ॅज एक्स्पेक्टेड श्री च्या विरुध्द जातेय मेघा आणि दुसरा वाइल्ड कार्ड रोहित दोघेही बहुदा स्वतःचा गृप बनवणार :टाळ्या:
https://www.instagram.com/p/BpNFbbaBwGJ/?utm_source=ig_share_sheet&igshi...

मेघामुळे मराठी पब्लिक बघेल, प्लस तिचे स्वतःचे अनेक फॅन्स. टी आर पी वाढेल. नेहा गेली म्हणून अनेक जण नाराज होते. त्यामुळे असं केलं असेल. ती जाईल फायनलपर्यंत.

मेघाचा बिबॉ घरात जाण्याआधीचा इंटरव्यु , ती रिपोर्टर म्हणतेय तसं मेघाची स्ट्रॅटजी गेम प्लॅनिंग आत्ताच सुरु झालीये, ती म्हणतेय तिने हा सिझन नाही फॉलो केलाय , फ्रेश मनाने जाणार Proud
https://youtu.be/m1cmza8bC6k

नेहा गेल्यावर अचानक महाराष्ट्रातला टी आर पी घटला असेल , म्हणुन मेघाला घेण्याची बुद्धी झाली असावी.

हो मराठी पब्लिक नाराज होते नेहा गेल्याने प्लस तिचे अजून फॅन्स. टीआरपी फार मिळत नाहीये बिबॉला. महाराष्ट्रात जास्त कोणी बघत नाही म्हणून मेघा कार्ड खेळले असावं. आता मराठी लोक बघतील बहुसंख्येने.

पण काहीजण अस पण बोलत आहेत की मेघा आधी मराठी bb जिंकून आली आहे, मग तिला या हिंदी season मध्ये आणणं unfair आहे..
तर काहीजण भरपूर खुष आहेत मेघा हिंदी bb मध्ये येतेय म्हणून...

Channel साठी त्यापेक्षा महत्वाचा trp आहे, यावेळी हिंदीला trp अतिशय कमी आहे आणि नेहा गेल्याने अजून कमी झालाय असं सांगितलं मगाशी news मध्ये. त्यामुळे कोणी काही बोललं तरी channel ला हे माहितेय मेघा मुळे महाराष्ट्रात तरी trp वाढेल.

कालचा एपी आता बघितला

सलमान मस्तच, पण श्री ची बायको एकदम मस्त, खूप छान डिफेन्ड केले त्याला

मला सध्यातरी श्री च बेस्ट वाटतोय, पण मी सगळे एपी नाही बघितलेत, सो माहीत नाही की नक्की कसा खेळतोय

मला सध्यातरी श्री च बेस्ट वाटतोय पण मी सगळे एपी नाही बघितलेत, सो माहीत नाही की नक्की कसा खेळतोय >>>>> कसला आलाय तो बेस्ट? सारख सारख 'मला घरी जायचय' अस लहान मुलासारखा रडणारा आणि छोटया छोटया गोष्टीन्वरुन चिडणारा श्री तुम्ही बघायला हवा होता व्हीबी. त्याच्या हेटर्स लिस्ट मध्ये वाढ झालीये सध्या.

मेघा परत इथेही किचन साम्भाळते की काय... किचनमधे उभी दिसली प्रोमोत >>>>>>> मग दिपिकाच काय होईल. Lol

अ‍ॅज एक्स्पेक्टेड श्री च्या विरुध्द जातेय >>>>>> आल्या आल्या तिने करणवीर ला फैलावर घेतल. त्याला विचारल, 'तुला हा गेम समजायला दिक्कत होते का?" Lol प्रोमोमध्ये जसलीन तिच्यावर इम्प्रेस झाली अस दाखवलय.

सुलू , हो मी जुने एपी नाही बघितलेत सो माहीत नाही की श्री नक्की कसा खेळतोय

आजचा एपी बघतेय , मेघाची हिंदी ऐकायला नाही आवडत आहे
बघू, त्या सीक्रेट रुम मधून बाहेर आल्यावर कशी वाटते

बाकी मेघा आवडत नसली तरी एक मराठी माणूस म्हणून मला हे आवडले की तिला इतरांना नॉमीनेट करायचो पॉवर दिलीये अन ती मस्त करतेय
तिने सुरभीला।नॉमीनेट केले हे बेस्टच

कोण्या फॅनची ट्विट भारी होती !
मेघा दीपिकाकडून किचन, दीपकच्या टास्क स्ट्रॅटॅजिज, जस्लीनकडून मेकप डॉलचा किताब, सुरभिकडून जास्त बोलायचा किताब आणि श्रीसन्तकडून कॅमेरा फुटेज छिनने आयी है Proud

Pages