बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपक नक्की खरच चांगला आहे की स्वतःच्या फायद्यासाठी सिंगल सोबत असतो ते समजत नाहीये.

भावना ताई पण अस कस होईल
आपल्याला ते आधीच्या दिवसाच दाखवतात ना???

एविक्शन ऑलरेडी झालं असेल, आतल्या गोटातून माहीती मिळवतात काहीजण, मराठीच्या वेळी समजायचं ना.

आपल्याला आज नाही, उद्या दिसेल ना. दोन दिवस असेलना सलमानचं.

सृष्टीला का कॅप्टन व्हायचं होतं, तिने कुठे रिंग मिळवून दिली. नेहा आणि केवीने तर दिली. बरं झालं नाहीतर स्मिता task करायची मराठीमध्ये आणि कॅप्टनशीप यायची तेव्हा मागे राहायची, रेशमबाई पुढे न करून Lol

नेहाने स्वत:ची स्मिता नाही होऊ दिली हे बरं केलं.

FB_IMG_1538234066342.jpg

Kashish - roadies चा या season चा winner (याच season मध्ये kriti पण होती)
Pratik-love school season 3 मध्ये होता (सिंगल आणि couple मध्ये असलेल्या मुलींवर लाइन मारण्यात expert हा bb मध्ये आला तर काय होईल हा विचार करवत नाही पण हा फिजिकल टास्क मध्ये चांगला खेळतो आणि mind game मध्ये तर romil ला आरामात टक्कर देऊ शकतो हा Rofl
Scarlett - spiltsvilla season 7 ची winner

कृति गेली बघून फार आनंद झाला आणि हिन्दी बिबॉ च्या अत्यंत फेअर न्यायाबद्दल फार आदर वाटला !
मुळात त्या दोघी कॅप्टन असून अतिशय बेजवाबदार वागल्याने , अनेक नियमभंग केल्याने बिबॉने स्वतः त्यांची इम्युनिटी काढून घेतली आणी त्या नॉमिनेट झाल्या आणि एलिमिनेट सुध्दा ! :टाळ्या:
त्या इनॅक्टिव्ह निर्मलमुळे मास्टरमाइंड रॉमिल जातो कि काय वाटल होतं , पण त्याला ठेवलय हा सुध्दा उत्तम निर्णय, शिव सारख्या डंब बॉडीबिल्डरपेक्षा अशा हुषार लोकांच्या स्ट्रॅटजीज /गेम बघताना बरं वाटतं.

दीपिका आणि जसलीन सुलतानी आखाड्यात आल्या तेव्हा first round मध्ये verbal fight झाली.
त्यात दीपिका बोलली की तिला किचन सांभाळायला जास्त better जमत.
Jasleen बोलली की दीपिका fake आहे. ती सासू सारखी वागते.
सिंगल वाल्यांनी दीपिकाला तर जोड्यानी Jasleen ला vote केल आणि first round Jasleen जिंकली.
Second round मध्ये त्यांना एकमेकांना जमिनीवर ढकलायच होतं त्यात winner ला 2 points मिळणार होते. यामध्ये दीपिका जिंकली.
तिला luxury hamper मिळालं..
Romil आणि निर्मल सुद्धा काल bb house च्या बाहेर गेले.
सलमान ने त्यांना एक चान्स दिला की कोणीतरी एक घरात रिटर्न जाऊ शकतो.
So romil पुन्हा bb house मध्ये आला त्याच्या नवीन पार्टनर सुरभी राणा सोबत.. (वाइल्ड कार्ड एन्ट्री)
ही Roadies मध्ये तर खूप विचित्र होती.
Neha dhupia, Raftaar, Nikhil, Ranvijay कोणाला जुमानत नव्हती..
Bb मध्ये आता खरी धमाल येणार..
कारण ही थोडी गरम डोक्याची आहे..

unnamed.png

आता सुरभी येऊन राडा घालायला सुरुवात करेल आणि बाकी लोकांना पण त्यासाठी प्रवृत्त करेल. सध्या घरात असलेले सदस्य पुरेसा किचाट करत नसल्याने आणि बिबाॅची प्रतिष्ठा पणाला लागल्याने आता जाम किचाट करणारे लोक आत येणार बहुतेक. Lol

रोडीज कधीही बघितलं नसल्याने कोणालाही ओळखत नाही.

कालचा आढावा छान घेतला कविता, मी रिपीट रात्री अगदी शेवटी बघितलं ते दोघे बाहेर पडले ते.

मला क्रीती आणि रोमीमध्ये रोमी आवडलेली. पण तो पार्शल डिसीजन घेतला दीपिकावेळी टॉर्चर टास्कमध्ये ते चुकलं दोघींचं. फक्त टॉर्चर टास्कस एपिसोडस बघितले दोन दिवस. एरवी नव्हतं बघितलं त्यामुळे actually त्या दोघी कशा ते माहिती नाही. पण युट्युबवर रोमी चांगली आहे पण क्रीती नाही, रोमीचं नुकसान झालं हिच्यामुळे अशा कमेंट्स वाचल्या, त्या दोघींच्या interview च्या व्हिडीओवर.

वीकेन्डचा वार पुन्हा अळणी सपक फिके.. हा नक्क्की तोच सलमानखान का ज्याबद्दल मी ऐकून होते खूप स्ट्रिक्ट्ली लाउड्ली चूका पॉइंट आउट करतो स्पर्धकांच्या ??
मला वाटतय कि सलमानखानला इंटरेस्टच नाहीये या सिझनमधे, स्पर्धक आवडले नाहीयेत त्याला बहुतेक.. काम उरकून टाकायच्या घाईत वाटतोय Uhoh
श्रीशनतला का इतक्या शान्तपणे सभ्यपणे घाबरत घाबरत समजावत होता सलमान ?
यापेक्षा तर मांजरेकर ओरडायचे!
असो, एकच गोष्ट आवडली कि २अत्यंत उथळ अजिबात लायक नसणार्या नियम मोडणार्या कृति रॉश्मिला काही बोलायलाही न देता हाकललं.
बाकी २ आठवडे झाले तरी कोणी आवडते स्पर्धक नाहीयेत, नेहाने श्रीशनतशी पंगा घेतलाच आहे तर फुटेज घेतलं पाहिजे आता, हाय टाइम लोहा गरम है मारदो हाथोडा !
आधी बरी वाटलेली दीपिका आता मुळीच आवडत नाहीये , अत्यंत बोरिंग, अगदीच निगेटिव्ह वाटायला लागली आहे, भाईगिरी करतेय, जस्लीन म्हंटली तशी सासू मटेरिअल.
मला सध्या रॉमिल आवडतोय, टु द पॉइंट क्लिअर अँड लाउड बोलतो जे त्याचं प्रोफेशनच आहे.
सर्वात अनॉयिंग अजिबातच डोळ्यापुढे सहन होत नाही, आवाजही ऐकावासा वाटत नाहीत ते दीपक आणि उर्वशी , अगदीच डबल ढोलकी, पुचाट , मस्का मारणारे !
अनुप जलोटा : थत्ते मटेरिअल
जस्लीन : आयटेम गर्ल
खान सिस्टर्स : फुटेज साठी सतत भांडण
सौराभ : इनव्हिजिबल
शिवः टाईट पँट्स
करणवीर : पुष्कर
दीपक : मोहल्लेकी चुगलखोर अंटी.
श्रीशन्तः चिडीचा डाव रडी.
रॉमिल : स्मार्ट !

दिपांजली .. सहि परिक्षण.. मलाहि इतक्या सगळ्यात रोमीलच आवडतो.. भेडचाल मस्त शब्द.. Happy तो श्रिशांत ला का म्हणत नाहित बाबा जातोस तु जा एकदाचा... उगाच इमोशनल अन चिढण्याशिवाय काहि करत नाहिय..
दिपक अन उर्वशी बद्दल एकदम बरोबर.. पण काल दिपक ने कविता मस्त केली अन त्याला चाल देवुन गायला पण मस्त Happy

क्रिती आणि सुरभी रोडिज मधे एका टिममधे होत्या .. क्रिती त्यात अत्यंत खडुस.. उद्धट होती.. क्रुर वाटायची..
सेम सुरभी.. ती क्रितीच्या २ पाउले पुढे होती..भान्ड्कुदळ.. उद्धट .. निखिल प्रिन्स नेहा धुपिआ सगळ्याना उलट बोलायची.. भाव पण द्यायची नाही.. मनात येइल ते डायरेक्ट काहिही बोलाय्ची

मला वाटतय कि सलमानखानला इंटरेस्टच नाहीये या सिझनमधे, स्पर्धक आवडले नाहीयेत त्याला बहुतेक.. काम उरकून टाकायच्या घाईत वाटतोय >>> अगदी अगदी.
काल सोमिवर वाचलं...सलमान खान करन वोरावर खूप आगपाखड वगैरे करतो आहे. करनचे फॅन्स त्यासाठी सलमानचा निषेध करतायत. पण इतिहास गवाह है...ज्याचा सलमान जास्त अपमान करतो त्यालाच जास्त पब्लिसिटी मिळते. Lol
आतापर्यंत दिपिका स्ट्राॅन्ग वाटतेय.

किचनमधे राहणे आणि रडणे म्हंजेच स्ट्राॅन्ग नाही का... Lol
कॅमेरा आपल्यावर राहिला पाहिजे....बास.

वीकेन्डचा वार पुन्हा अळणी सपक फिके. >>> अगदी अगदी.

मी तो बघायला घेते, मग कंटाळा येतो. शनीवारी बघितला बराच. रविवारी रिपिट शेवटी पाच मिनिटं लावला. यापेक्षा मराठी कितीतरी बरं होतं.

कालचा भाग अगदी अगदी कहर होता!
दीपिका - अनुपजी आप मेरे कैदी है.
आधीच उंचीने कमी असलेला अनुप अजुन वाकत - हम तो आपके कैदी है ( बाबारे ती तेच सांगतेय. आप हमके है कौन नाहीये विचारत)
मग दीपिकाने तिचा सो कॉल सोज्वलपणा दाखवत - नाही नाही अनुपजी, झुकिये मत. सॉरी आप हमारे कैदी है इस्लिये मुझे आपको बांधना पडेगा. (डोळे पाणावले. आमच्याकडे मुस्कटात मारून बेड्या ठोकतात हो!)
अनुपला बांधून झाल्यावर दीपिकामधील खुनशी सासू जागृत होते. जसलीन, अब तुझे नही छोडूंगी... मात्र चेहऱ्यावर तेच अश्ट्सात्विक भाव आणत- जसलींजी अनुप मेरे कैदी है (इथे द्विअर्थी संवाद आहे. कैदी तर आहेच. मात्र चेहऱ्यावर जुन्या हिंदी चित्रपटातील बिंदुचे भाव: देख तेरे पती को कैसे मैने मुठ्ठी मे कैद करके रखा है) ऑर आपको उनको आझाद करने के लिये कुरबानी देणी पडेगी (मनोजकुमार - भारत वर्ष को आझाद करणे के लिये कुर्बानी देणी पडेगी)
अनुपच्या स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला की नाही, व या स्वातंत्रयज्ञात कुणाची आहुती पडली, हे आपण पुढील भागात बघू... तोपर्यंत... Do Whatever you want to do man... Just don't trouble your mother man..

आधी फेक लवह्स्टोरी आणि आता फेक ब्रेकप !
अनुप जलोटा काय देव आनंद स्टाइल डॉयलॉग्ज मारत होता , जसलीssssन कपडोसे इतना प्यार ? Rofl
जस्लीन त्या ब्लाँड कलरच्या २ चंबु पोनीटेल्स मधे कसली डंब महाडंबिका दिसते, अत्यंत लो आयक्यु !
Btw ती wildcard सुरभि कसली दंगेखोर धमाकेदार आहे, मजा येईल आता जरा बघायला, खान सिस्टर्स इन्सिक्युअर झाल्या तिच्याशी बोलून.. दीपिकाची नक्कल मस्त करत होती सुरभि, आल्याआल्या पंगे !
श्रीशान्तला जर एंग्झायेटी इश्युज आहेत, बीपी आहे, त्याला पाठवलय कशाला अशा गेम मधे ? कसलीच टास्क न करता हा दगडोबा कधी मख्ख बसणार तर कधी रडारड करणार सिझन भर आणि दीपिका करणवीर त्याचे बेबीसिटर्स .
नेहाबद्दल किती वाईट बोलत होता श्रीशान्त, हिच्या बाहेरच्या आयुष्याबद्दल मला खूप माहित आहे, नॅशनल टि.व्ही वर रडवेन Uhoh
सलमान खानने वीकेन्डला काहीच म्हंटले नाही तर समजेल ऑडीयन्स जे समजायचय ते !

नेहा बरोबर बोलत होती श्रीशांत बद्दल.. काहि माफी मागता नये होती.. त्याला कदरच न्हवती.. कसा अ‍ॅटिट्युड दाखवत होता.. आपल्याला सांगतो.. ती हे कॅमेर्‍यासाठी करतेय..
हो जसलीन काहितरीच दिसत होती एखाद्या जोकर सारखी Happy

ती सृष्टी चुगलखोर आहे का, परवा दिपिका आणि नेहाबद्दल काहीतरी जाऊन सांगत होती श्रीशांत आणि करणवीरला.

अनुपच्या स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला की नाही, व या स्वातंत्रयज्ञात कुणाची आहुती पडली, हे आपण पुढील भागात बघू... >>>>> नाही झाला त्याचा लढाबिढा यशस्वी. आहुती तर त्याचीच पडलीये नॉमिनेट होऊन. Lol

आधीच उंचीने कमी असलेला अनुप अजुन वाकत - हम तो आपके कैदी है ( बाबारे ती तेच सांगतेय. आप हमके है कौन नाहीये विचारत) जस्लीन त्या ब्लाँड कलरच्या २ चंबु पोनीटेल्स मधे कसली डंब महाडंबिका दिसते, >>>>>>> Rofl

जनरली ज्या नायिका सोज्वळ आदर्श बहू अशी ओ़़ळख घेऊन बिबॉ मध्ये येतात, त्यान्च खर, इव्हिल रुप बाहेर येत. त्याना नन्तर निगेटिव्ह रोल्स मिळू लागतात. आधी हिना (कोमोलिका), आता दिपिका.

ती सृष्टी चुगलखोर आहे का, परवा दिपिका आणि नेहाबद्दल काहीतरी जाऊन सांगत होती श्रीशांत आणि करणवीरला. >>>>> मला कधी कधी तिच्यात स्मिता गोन्दकरचे vibes दिसतात. ती आरशात स्वतःशीच बडबडत असते म्हणे. Lol

खूपच मागे गेला हा धागा...बघत नाही का कुणी?
सुरभीने आल्याआल्या आग लावायला किंवा ऑलरेडी पेटत असलेल्या आगीत तेल ओतायला चालू केलेय. फुटेजसाठी भयंकर हावरट आहे पोरगी. Uhoh
सृष्टीचं काही कळतंच नाही. कन्फ्यूज्ड दिसते.
श्रीशांतमधे टेक्निकल प्राॅब्लेम आहे बहुतेक. लगेच संतापतो.
दिपिकापेक्षा आता नेहा आवडते...पण बिचारी सतत वादाच्या भोवर्यात.
बाकी कुणाबद्दल बोलण्यासारखं नाहीच. 'कॅमेर्यासमोर दिसा' हा सलमानचा सल्ला अगदी कानात तेल घालून सगळ्यांनी ऐकलाय. त्यामुळे आकांडतांडव करण्यातच सगळे धन्यता मानतायत.

श्रीशांतमधे टेक्निकल प्राॅब्लेम आहे बहुतेक. लगेच संतापतो.>>
बिग बॉस बघत नाहीय, पण क्रिकेट फिल्ड वर त्याची तीच ख्याती होती

सुरभिने आल्या आल्या आग लावली , दहशत निर्माण केली अपेक्षेप्रमाणे, खान भगिनी जाम इन्ससिक्युअर झाल्यायेत !
सुरभि काहीतरी घेऊन हाय झाल्यासारखी वागत होती रिंग टास्क मधे ..शिव्या, दंगा, ढसाढसा रडणे.. मेंटली इंबॅलन्स्ड वाटली !
काय शिव्या दिल्या कळलच नाही, बिबॉने सतत म्युट मोड वर टाकल तिला सेन्सरकट सगळ्या शिव्या !
नेहा एकदम स्ट्रॉंग झाली आहे या आठवड्यात, भरपूर दिसली आणि काहीतरी माइंडगेम खेळतेय असं वाटतय..उद्याच्या टिझरमधे तिने सोमीला डिसक्वालिफाय केलं म्हणून दिपिका आणि घतातले बरेच मेंबर्स तिच्या अगेन्स्ट गेले असं दाखवल, ती शान्तपणे स्व्तःच्या डिसिजनवर ठाम दिसली, गुड गोइंग नेहा !
वादात अडकली तर चालेल, चर्चेत असणे इज गुड साइन !
श्रीशन्त टास्क करत नसून गेम खेळतोय, भलत्याच ट्रॅकवर आहे, भाई झालाय स्लेबेज्स चा, ओव्हरॉल आता श्री, नेहा, करणवीर आवडतायेत !
या तिघांनाही उद्या काल कोठरी आहे.
रोमिल आवडतो पण सुरभि पार्टनर झाल्याने निगेटिव जाऊ नये !
दीपिका डल वाटतेय आता.

Pages