बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनश्री,
आज कोणी जाणार नाही, हीच वोट्स पुढे कंटीन्यु होणार आणि नेक्स्ट विक डबल एव्हिक्शन असं ऐकु येतय,खरंखोट माहित नाही नक्की पण जस्लीन मेघाला घालवायचा प्लॅन दिसतोय जर खरं असेल तर !
रोमिल टेक्निकली खूप चांगला खेळत असला तरी नं.१ फेक, कॅक्ल्युलिटेव वाटतो मला.
त्याचं ते श्रीसन्तसाठी रडणं साफ खोटं, श्री च्या टिममधे घुसून आधीच्या बेस्ट बडीज्/हॅपी क्लब्स्च्या मित्रांशी अचानक भांडणे सगळं त्याने ठरवून केलय असं वाटत मला कारण शो मधे हिस्टरी अशीच आहे !
एकाच कंपुत कायम राहून पुढे जाता येणार नाही, अजिबात न रडता , सिंपथी घेतल्याशिवाय सगळ्या इमोशनल साइड्स दिसणार नाहीत हा अभ्यास नक्कीच करून आला आहे रोमिल !
कधी पलटी मारणार आणि पुन्हा जुन्या गृपमधे येणार हे फक्तं बघायचं !

हो, रोमिल फेक आहे. पूर्णतः फेक. त्याला चांगले कळलेय की बाहेर श्रीची चलती आहे, शिवाय दीपक, सुरभीचे राडे महागात पडू शकतात, त्यामुळे त्याने सुमडीत श्री- दीपिका ग्रुपमध्ये शिरकाव केलाय. मला वाटतेय एक श्री आणि काही प्रमाणात जसलीन सोडली तर सगळेच फेक आहेत इथे. तो रोहित आणि ती सोमी तर गूड फॉर नथिंग आहेत चक्क. त्यांच्यासारख्या फुसकुंड्यांना ठेऊन मेघा- जस्लीनला काढले तर बिबॉ बघण्यात काहीच पॉईंट नाही यापुढे.
- बाकी, कुणालाच नारळ न देणे अव्वल दर्जाचा मुर्खपणा आहे.

जस्लीनची सुध्दा सुरवात फेक अशीच झाली अनुप जलोटा प्रकरणामुळे, आत्ता कुठे स्ट्राँग स्टँड्स घ्यायला लागली आहे जलोटा गेल्यापासून !
मला श्री सुरभि प्रकरणात कोणालाच सपोर्ट करावस वाटत नाहीये आता, ती सायको आहेच आणि बहुदा रिहॅब सारखे इश्युजही आहेत जे नशा न मिळाल्यनी होतात अशा पेशन्ट्सना पण श्री सुध्दा काही नॉर्मल नाहीये, रागाच्या भरात स्वतःला हर्ट करून घेणे हे लक्षण नॉर्मल माणसाच नक्कीच नाही !

सोमी दिसत नव्हती, आज चक्क तिला फोन कॉल , ते पण किती आपुलकीने प्रश्न विचारणारा. सोमी आणि रोहित नक्की काय करतायेत. सोमीला दाखवावं म्हणून तिला पंच बनवलं, संचालक बनवलं. बीबॉ तिला दाखवण्यात का डोकं चालवतोय ? आणि तिच्यावर इतकी स्तुतीसुमने , चढली कि हरभऱ्याच्या झाडावर.
रोहित फक्त ग्रुपमध्ये राहून खेळतोय. एकटा श्रीबरोबर बोलायला लागला कि शहाण्यासारखा बोलतो.
मला खरंच जसलीन आवडतेय. मेघाला अजुनहि नेगेटिव्ह दाखवतायेत. श्री सणकी , तापट आहे खरा , पण सुरभी दीपक पेक्षा कितीतरी पटीने चांगलाय. KV चान्स मिळाला कि ऍक्टिंग करून घेतो. दीपिका,रोमिल कधीतरीच आवडतात.
बाकी सलमानभाऊंनी सोडावं होस्टिंग, . होस्टिंग कमी प्रोमोशन्स जास्त असतात. जेवढं होस्टिंग होतं त्यातपण चुकीच्या लोकांसाठी बोलतो. कधीतरी एपिसोडस बघावेत त्याने.

दीपक ने जसलीन बद्दल, कॅप्टन्सी टास्कमध्ये केव्हीसमोर असतांना; ती तर मुलगी पण नाही आणि मुलगा पण... अशी कमेंट केली, ज्यावर केव्हीने "भाई, तुने बहोत बडी बात बोल दी" असा रिप्लाय पण केला... पण दीपक पुन्हा एकदा आपल्या नालायक पणाबद्दल सुमडीत सुटलाय, केव्हीने हे समोर आणायला हवं होतं...

भाई भाई बोलुन एवढा कोण चिकटतं?......बोरिंग आहे दीपीका.
सोमी ला कशाला एवढा भाव....का सलमान ची पर्सनल फ़ेवरेट आहे म्हणून टीकली आहे....
मेघा मस्त खेळतेय...

जसलीन ला दिपक अन रोहीत बर्‍याच वेळा टार्गेट करत असतात त्यावरुन सलमान कधीच बोलत नाहि त्यांना .. तिला मात्र सलमान जाणवुन देतो तिच्या वागण्याचं... बेक्कार होस्टींग करतोय सलमान... खरच तो एकहि एपि बघत नाहि अस एकंदर दिसतय.. ते लिंबुच नंतर बोलतो सांगुन काहि बोललाच नाहि.. तेच जर सोमी असती तर तिला खुप प्रशंसल असतं. तिला खरच तो खुप फेवर करतो अन मेघाने कितीहि चांगला कंटेंट दिला असला तरी काहितरी खोच काढतोच उगाचच तिला बोलायला..

कदाचित तो टास्क सक्सेसफुल झाला नाही म्हणून फार बोलला नसेल सलमान कारण मेघाने इथे तंत्र मंत्र, अघटीत काहीतरी घडतंय हे पटवून द्यायला हवं असं सांगितलं होतं bb ने पण ती पटवून देऊ शकली नाही, त्या श्रीसंतने सुमडीत सर्व उचलून टाकून दिलं आणि दीपिकापण म्हणाली असल्या गोष्टींवर विश्वास नाही माझा. त्यामुळे मेघा तो task जिंकली नाही. फार कोणी घाबरले नाही, त्यावरून हाय हुई, बापरे कोणी ठेवलं काय असा फार तमाशा पण झाला नाही.

जसलीनबद्दल दीपक अपशब्द बोलला त्याला काही बोलला नाहीच का सलमान, श्या कित्ती बायस्ड. मी काहीच बघितलं नाहीये फार. मेघाला task दिला ते voot वर जाऊन बघितलं आणि विकेंड वार शनिवारचा अर्धा बघितला.

सलमान खान अनबायस्ड असायचा पूर्वी असं जे कौतुक करतायेत, आता लोकांच्या ट्विट्स आणि व्हिडीओज येतायेत कि आधीपासूनच सलमान बायस्ड आहे.
मागच्या वर्षी शिल्पा शिन्दे त्याची पर्सनल फेव्ह होती म्हणून तिला अशक्य फेवर केलं, हिना खानला कायम निगेटिव ठरवलं.
काजोलची बहिण तनिषा ज्या सिझनला होती, ती अजिबात अ‍ॅक्टिव्ह नसून तिला सलमानने खूप फेवर करत फिनालेला पोचवलं, अर्थात जिंकली गौहर पण सलमान ट्राइड हिज बेस्ट तनिषाच जिंकावी, गौहरनी हिंमत करून पंगा घेतला होता म्हणे सलमानला वेळोवेळी बायस्ड म्हणायचा (त्याचा तिच्या करिअर वर परिणामही झाला असेल कदाचित )
अर्थात मी हे सिझन्स पाहिले नाहीत पण शिल्पा या सिझनला टास्क् साठी होती तेंव्हा मुळीच आवडली नाही , हिना आवडली उलट, विकास्व्ही बरा वाटला.
शिल्पाच्या ट्विट्स सुध्दा फार उथळ असतात.

काजोलची बहिण तनिषा ज्या सिझनला होती >>> तो अरमान कोहली आणि ही ह्यांचं अफेअर यामुळे मी बघूच शकले नाही. तो तर पार डोक्यात जायचा.

विकेंडका वार रविवार बघितलं मी, पण वुट्ला पळवत पळवत.

बोअर्ड. हा पण सलमानने मेघाच्या टास्कबद्दल सिक्रसी का ठेवली ते कळलंच नाही. सांगायचं ना सर्वांना की बिबिने तिची निवड केली होती आणि तिने हे ठेवलं, किंवा ओळखा कोणी केलं ते असं तरी विचारायचं. काहीही, कॅमे-यांनी टीपलंच नाही म्हणे.

सर्वात जसलीन छान दिसत होती मात्र. जसं स्मिताचं दिसण्यात इंप्रेशन पडायचं तसं जसलीनचं पडतं. मेघाचा ड्रेस छान होता पण समहाऊ ती झाकोळली जात होती आणि लक्ष जसलीनकडे जात होतं.

सोमी अति मेकअप करते मात्र. तिचा ड्रेस छान होता पण त्या अतिमेकअपमुळे तिच्याकडे बघावसं वाटत नव्हतं.

असे समजले की दीपक ठाकूरला मेघा जसलीन पेक्षा कमी वोट मिळाले त्यामुळे या आठवड्यात eviction नाही झाल

युट्युबवर वोटींग दाखवत होते त्यात आलटून पालटून मेघा आणि जसलीन शेवटी होत्या. दिपक ठाकूरचे फॅन्स आहेत बरेच असं उलट दिसतंय. तो नव्हता खाली. आता नविन व्हिडीओ आला असेल तर माहीती नाही.

सर्वात जसलीन छान दिसत होती मात्र. जसं स्मिताचं दिसण्यात इंप्रेशन पडायचं तसं जसलीनचं पडतं. मेघाचा ड्रेस छान होता पण समहाऊ ती झाकोळली जात होती आणि लक्ष जसलीनकडे जात होतं. >>>>>> जसलीनला सुद्दा तेच नाव पडलय 'डम्ब' आणि तेही मेघाकडून

रविवारच्या टास्कमध्ये रोमिला सारा अली खानशी रुडली वागला:

http://www.bollywoodhungama.com/news/bollywood/bigg-boss-12-weekend-ka-v...

https://www.youtube.com/watch?v=8z9YTe8kfbg

हा कालचा दिसतोय ज्यात जसलीन शेवटी आहे.

जसलीनला सुद्दा तेच नाव पडलय 'डम्ब' आणि तेही मेघाकडून >>> तिलापण आधीपासून म्हणतात डंब असं मेघा म्हणाली, मेघा उलट उशीरा म्हणायला लागली टॉर्चर रुम मधे जसलीनमुळे गेली त्यावेळी.

Just hoping Shreesant slapping Rohit video is real and not fake drama !!
If it's true , Shree is going to win gazillion hearts for sure with this gesture , I will be a Shree fan forever for this thappad ki gunj !

मेघा आणि जस्लीन जाणार हे आता फार मोठे सिक्रेट नाही राहिलेले. दिपक, सुरभी, रोहित ह्या नालायकांना बिबी ज्या प्रकारे फेव्हर करतेय त्यावरून ह्या दोघींचाच नंबर असणार आहे. तसं झाल्यावर श्री, दिपीकाची आणखीच वाट लावतील हे चांडाळ चौकडीवाली.

मेघा कित्ती आपल्या मनातलं बोलते !
दीपक रोहितला ती भुखेनंगे, आकालसे आए हुए, भिकमंगे , बन्दर हे जे म्हणते ते अगदी फिट्ट आहे त्यांना.
रोमिलला म्हणत होती ‘ये केव्ही करता क्या है ? दही बनाता है, राशन चुराता है, बस !
उगीच नाही आपल्याला मेघा रिलेट झाली आणि तिला विनर बनवलं मराठी जनतेने !
हिन्दी बिबॉने सडकछाप मवाली भिकारी आणलेत खरच, त्यात तो केव्हीही तसाच वागतोय !
काल जॅकुझीमधे फेस करून कधी न बसल्या सारखे दंगा करत होते अडाणी कुठले !
मला नाही वाटत इथून पुढे कोणी सेलिब्रिटीज यायचं धाडस करतील शो मधे , ज्याप्रकारची ट्रिटम्नेट त्यांना मिळत आहे.

त्यात क्रिएटिव टिम महान, जे प्रत्यक्ष प्रेक्षक म्हणून वीकेन्डकावारला गेले होते त्यांच्याकडून मागच्या आठवड्यात आणि याही आठवड्यात वेगळच ऐकायला मिळालं!
सलमान म्हणे अ‍ॅक्चुअल शुटच्या दिवशी दीपकलाही भरपूर अपमान्स्पद बोलला बराच वेळ , जे कंप्ल्टली कट केलं शनिवारच्या एपिसोडमधे.
कालच्या एपिसोडमधे जस्लीन मेघा म्ह्संटल्याही दीपकला’ तेरी इतनी बेइज्जती हुई बच्चु है इस बार, तू अपनी देख.’
सुरभिलाही सलमान जे बोलला त्यातला अगदीच कमी पार्ट एडीट करून दाखवला गेला.
त्या व्हिल टास्क मधे घरमे सबसे गन्दा महौल कोन करता है प्रश्न होता, ज्यानंतर सुरभिला व्हिलला बांधून बलुन्स मारले, ते पूर्णपणे कट केलं Uhoh
मागच्या आठ्वड्यात म्हणे रोहितलाही झापलं होतं सलमानने जे पूर्ण कट केलं!
आता काय बोलावं यापुढे समजेना झालय! सेलिब्रिटीजचा धाक्/प्रेशर असतं तर समजु शकले अस्स्ते पण कोण हे भिकारी कॉमनर्स ज्यांना चॅनल पाठीशी घालतय ?

अन्जु,
मेघा सिक्रेट टास्क मधे अनसक्सेसफुल झाली असं का वाटतय ?
मुळात ते काही खरं बिबॉ टास्क नव्हतं , तंत्र सिरियलचं प्रमोशन होतं ज्यात तिला फक्त लिंबु मिर्ची ठेवायचं टास्क दिलं होतं, जे तिनी केलं.
काल कोण्या मेघस्टरने शेअर केलय कि तिला त्या टास्क केल्याबद्दल गिफ्ट हँपर मिळालं बिबॉ कडून, बहुदा व्हुट वर आहेत डिटेल्स!
बाकी यावर तुफान विनोदी मत ऐकलं एका युट्युबरचं, अगदीच हहपुवा ऐकून.
तो (सिरियस्स्ली) म्हणे लिंबु मिर्ची लोणावळ्यासारख्या डोंगरदर्यात जे ऑलरेडी भुतिया आहे तिथे मेघाच्या हताने का ठेवायला लावलं? उद्या जर मेघाला भूताने झपाटलं किंवा तिच्या जिवाचं बरं वाईट झालं तर बिबॉ जवाबदारी घेणार का ? Biggrin
काही लोक म्हणे श्री ने ते लिंबु मिर्ची फेकून दिलं म्हणून तो हॉस्पिटलम्धे गेला (आपल्याला दाखवलं नाही, काहीतरी लागलं होतं श्रीला आणि सिव्हिअर पेनमुळे एक्स रे साठी नेलं होतं हॉस्पिटलमधे त्याला परवा.)

मी बघितलं वुटवर त्यात तिला ते तंत्र मंत्र पटवून दे असं सांगितलं होतंना. पण ती पटवून देत होती, हात लाऊ नका सांगत होती तर श्रीने ऐकलं नाही आणि फेकून दिलं, दिपिका पण म्हणाली की ती असं काही मानत नाही. ती त्यावेळी तरी घाबरवु शकली नाही कोणाला. उलट सलमानने सांगितल्यावर सर्व हा हो, मान्य असल्यासारखं म्हणाले.

म्हणून मला ती टास्कमधे सांगितल्याप्रमाणे पटवून देऊ शकली नाही असं वाटलं.

डीजे तू म्हणतेस ते नंतरचं पण मेघावर त्यावेळी तरी कोणी विश्वास ठेवला नाही, हेच दिसलं मला वुटवर.

बहुदा व्हुट वर आहेत डिटेल्स! >>> ओके, चेक करते.

बाकी तू आधी लिहील्याप्रमाणे सलमान असं खरंच वागला असेल तर तो बायस्ड नाहीये, क्रिएटीव्ह टीम आणि चॅनेल बायस्ड आहेत. मी मुर्ख आहेत असं पण म्हणेन कारण सलमानने ह्या लोकांना झापणं बघायला सर्वांना आवडलं असतं आणि टीआरपी वाढला असता. तमाम पब्लिक खुश झालं असतं सलमान, बिबि वर.

मेघाला गिफ्ट हँपर मिळालेलं कट का केलं, एवढं होतं तर तिला कशाला बोलावलं बिबित, तिचं कौतुक किंवा चांगली बाजु दाखवायचीच नाहीये का ह्यांना.

एक दोन आठवड्यापुर्वीच्या वीकेंडच्या वार मध्ये सलमान म्हणाला पण होता बहुतेक की मै सबको जानता हूं.... तुम लोगोंको भी और कलर्स और इंडेमॉलशाईन को भी!
त्याला असा काही रेफरन्स असेल का?

एक दोन आठवड्यापुर्वीच्या वीकेंडच्या वार मध्ये सलमान म्हणाला पण होता बहुतेक की मै सबको जानता हूं.... तुम लोगोंको भी और कलर्स और इंडेमॉलशाईन को भी! >>> हो बरोबर, हे वाक्य म्हणाला ते मी बघितलं होतं.

त्याला असा काही रेफरन्स असेल का? >>> असेलही.

Pages