बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या, दीपक मेघा रोहित सुरभि प्रेमळ कॉन्व्हर्सेशन, पाप्या - मिठ्या Biggrin
https://youtu.be/2-dcBYxDaNo
तात्पुरता दिल का रास्ता पेटसे प्रकार , उद्या भांडतील कचाकचा पुन्हा टास्क आल्यावर !
आजचा एपिसोड बाकी बकवास, श्रीसन्तचा सीन बघून फॉरवर्ड करत ५ मिनिटात संपवला.
कचरा क्लबच्या कचरा क्विन्स सुरभि-सोमि सोडून कोणी फार दिसतही नव्हतं त्यामुळे बघण्यात अर्थ नव्हता.
लेटेस्ट व्होटींग ट्रेंड प्रमाणे रोमिलला सर्वात जास्त, त्या खालोखाल नं २ दीपकला , दीपिका चक्क नं ३ वर, ४. जस्लीन आणि मेघाला सर्वात कमी व्होट्स आहेत लेटेस्ट ऑनलाइन अपडेट्स प्रमाणे, अर्थात हे फक्त ऑनलाइन पोल्स, अजुन ३ दिवस आहेत व्होटींगला .
थोडक्यात या बीबी वरची चर्चा बन्द होणार पुन्हा मेघा गेली तर , त्यापेक्षा मेघाला मल्टीपल आयडीज काढून व्होट्स करा Proud

इथेच कि मागच्या धाग्यात चर्चा झालेली, सर्व इमोशन्स दाखवणारा विनर ठरतो. त्यात मेघा प्रचंड कमी पडतेय असे वाटतेय इथे. म्हणजे, तिची रागीट बाजूच फक्त समोर येतेय सतत. त्याने उगाच स्टिरियोटाईप बनतो, परत वेगळे वागायला गेले तर फेक असा शिक्का मिळतो.

श्री सोडून इतर कोणीही इतक्या इमोशन्स , इतके मुड्स, अनप्रेडीक्टेबल नेचर , इंटरनॅशनल काँट्रोव्हर्सीजचा खुलासा आणि एंटरटेनही केलं नाहीये, आयडीअली फक्त तोच आहे डिझर्विंग विनर !
मी इतर कुठलेही सिझन्स पाहिले नाहीयेत हिन्दीचे पण मला नाही वाटत गेल्या ११ सिझन्स मधे इतका पॉवरफुल स्टार , इतका कन्टेन्ट देणारा काँटेस्टन्ट कोणी आला असेल !

मला दिपिका आणि रोमिल आवडलेत खरं म्हणजे, फक्त तीन एपिसोडस बघून, शुक्र, शनी, रवी. काही म्हणा पण रोमिलकडे लक्ष जातंच, सगळे असले तरी. तो काही बोलला नाही तरी.

मेघा खरं म्हणजे नाही आवडली, एका विनरला शोभेशी खेळी न करता ती दिपकच्या जाळ्यात इझिली अडकली. तिने त्याच्यावर sandle फेकली ह्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही किंवा राग येत नाही पण ती घाण घाण शिव्या देतेय ज्या दाखवूही शकत नाही, असं सलमान म्हणाला तेव्हा खरंचं नाही आवडलं मला.

मी दीपिकापेक्षा इतके दिवस घरात राहिले आहे, किचनवर माझा ताबा होता आणि राहणार हे तिने जायच्या आधी मुलाखतीत सांगितलं होतं. पण दीपिका कमी दिवस हिच्यापेक्षा ह्या घरात राहून ज्या ग्रेसने प्रेशर handle करते ते बघना बायो. तू विनर असून अशी वागते आहेस.

पण मी वोट मेघालाच देणार आहे पण माझ्यावर तिचं impression पडले नाहीये, हे ही खरं.

श्रीने कंटेंट जास्त दिलंय हे डीजे च्या पोस्टवरून समजतं तरी माझे पहिले तीन दीपिका, श्रीसंत आणि रोमिल असतील Lol

जसलीन जायला हवीय खरं म्हणजे. एकच चान्स आहे जसलीनपेक्षा मेघा जास्त पैसे घेत असेल आणि trp फार तिच्यामुळे वाढला नसेल तर तिला आधी काढतील. एरवी वोटस मेघाला जास्त असतील तिच्यापेक्षा असं वाटतंय.

दिलं मेघाला वोट, हुश्श.

खतरोंके खिकाडी बहुदा ऑलरेडी शुट झालाय, श्री २ आठवड्यातच गेला म्हणे ! नॉट सरप्राइज्ड, टास्क्स गिव्हपच करतो तो !
आज दीपिकाने चांगला केला वकिलाचा रोल, दुसर्‍या टिममधे दीपकला कशाला केलं वकिल ? तेही खराखुरा वकिल रोमिल असताना ? Uhoh
असो , पण नवा गृप दीपिका-मेघा - श्री-रोमिल आवडला, रोमिल हॅपी क्लबमधून बाहेर आल्यावर थोडा पॉझिटिव दिसतोय.
मेघाला कालपासून पुन्हा थोडंफार इनव्हिजिबलच केलय , उद्या बघु कशी मांडतेय तिची बाजु !
आज रोमिलला मागच्या आठवड्यात दीपिका श्री वर सैंया भैया जोक मारल्याची एक प्रकारे शिक्षा मिळाली, सुरभिच्या आरोपानंतर !
मला सुरभिच्या बाबतीत तो तसा बघतोय , वाईट इन्टेन्शन्स असतील असं वाटलं नाही पण सोमि रोमिल मैत्री बघून सईपुष्कि प्रकार मात्रं वाटायला लागलाय!
बाकी आज काय कॅरॅक्टर्स दिसत होते सगळे ग्रामपंचायत मधल्या गेटप्स मधे Proud
दीपिका-रोमिल]चांगले दिसत होते त्याही अवतारात!
मेघा- जस्लीन - दीपक - सोमि एकदम नौटंकी दिसत होते, जस्लीन तर मस्त फतकल मारून बसली होती, मजा आली त्या गेटपमधे सगळ्यांना बघताना !

मला सुरभिच्या बाबतीत तो तसा बघतोय , वाईट इन्टेन्शन्स असतील असं वाटलं नाही पण सोमि रोमिल मैत्री बघून सईपुष्कि प्रकार मात्रं वाटायला लागलाय! >>> चला म्हणजे माझ्याव्यतिरीक्त आहे अजुन कोणी ज्यांना असे वाटते.

कालच्या गावच्या गेटप मध्ये दिपक पक्का बिहारी दिसत होता अन जसलीन ला का नेहमी फक्त खाताना दाखवितात की ती खरेच दिवसभर खात असते, बापरे

रोमिल स्वतःच्याच विचारात असतो म्हणून तसं वाटत असेल, घुरता है. मागे पण कोणीतरी आरोप केलेला तेव्हा त्याने सांगितलेलं.

अरेरे सोमी रोमिल, सैड्या पुष्की सारखे वाटत असतील तर रोमिलने मराठी बघून आयडिया घेतली की काय म्हणजे पुष्कीसारखा दुसरा येईल Lol

हे बघा, करणवीर सांगतोय दीपक-रोहितला, रोमिलची टक मारायची सवय !
मागे नेहा सुध्दा म्हंटली होती, सुरभिने आधीही हा पॉइंट रेझ केला होता.
हा केव्ही बाकी ऑफिशियल गुरु बनलाय फुटक्या हॅपी क्लबचा !
https://youtu.be/xf7CnXmQjFM

सोमि रोमिल मैत्री बघून सईपुष्कि प्रकार मात्रं वाटायला लागलाय! >>> +१११ मलाही तसं वाटलं होतं सोमी आणि रोमिल बद्दल. आणि सुरभीच्या बोलण्यावरून एकदोनदा असंही वाटलं की तिला हे माहित असावं.

जसलीन जेवढी वाटते तेवढी मूर्ख नाही. मस्त कॅरी करतेय ती सरपंच म्हणून. सोमी अन ती न भांडता बऱ्याच वेळ बसल्यात असं दिसतंय. चांगली प्रोजेक्ट होतेय ती आजकाल. मेघाला अवघड जाणार दिसतंय या आठवड्यात.
सध्या सर्वाधिक नालायक कंटेस्टंट्स: रोहित, केव्ही आणि सोमी. वेस्ट अक्षरशः.

श्री ख़रच लूझर वाटतोय....प्रत्येक टास्क काय “मै ये नही करूँगा वो नही करूँगा...इसको मारूँगा उसको नही छोड़ूँगा...”
तरीही B.B. त्यालाच जिंकवतील.

रोमिल सुमडीत हिरो झालाय. सुरभी- दीपक अचानक व्हिलन्स बनलेयत बाहेर. मेघाला आता दिपीकाला कॅप्टन बनवावंच लागणार आहे.

चॅनलच्या प्लॅनप्रमाणे रोमिलला एकट्याला पॉझिटिव, बाकी सगळे थोड्याफर प्रकाणात निगेटिव्ह दाखवणं चालुच आहे , श्री पुन्हा निगेटिव जायला लागलाय आणि अशा अ‍ॅटीट्युडने विनर नाही होऊ देणार त्याला चॅनल !
या आठवड्यात जस॑ खाप पंचायत टास्कचा काहीच डिसिजन झाला नाही तसा आता आता म्हणे कॅप्टन्सी टास्कही कॅन्सल झालं, पहिल्यांदाच कॅप्टनलेस हाउस असणार आहे विथ नो इन्युनिटी टु एनिवन.
मेघा कमी दिसली पण छान बोलली ती प्रत्येक शब्द साक्ष देताना पण किती वेळा हाउसमेट्स तिच्यावर तेच जुने आरोप लावत रहाणार ?
कंटाळा आला.
सुरभिचं वेड वाढतच चाल्लय, श्री पुन्हा निगेटिव चल्लाय, दीपक पिसाटलाय, रोहितने तर म्हणे कॅप्टन्सी टास्क मधे जागचं हाललं तर आउट होणार म्हणून सगळ्यांसमोर टास्क चालु असतानाच शु केली Uhoh
माझा इंटरेस्ट ऑलरेडी जात चाल्लाय, रोमिल अजिबात आवडत नाही जो विनर बनणं ऑलमोस्ट पक्कं होत चाल्लय !

जिंकायचे दीपिकाचे चान्सेस तेवढेच हाय आहेत. मला आता ती आवडत आहे. बाकी नेगेटिव किंवा अति बिनडोक लोकच फार जास्त भरलेत.

हो हो, दीपिका चांगली वाटतीये, मस्तं केला तिनी वकिल टास्क आणि कुठल्या वाईट लेव्हलला न जाता, शिव्या न देता क्लिअर आणि लाउड पॉइंट्स रेझ करतेय ती, डिग्निटी -क्लास मेन्टेन करत सगळ्यांना गप्प करायची कुवत आहे तिच्यात !
फक्त श्रीसन्तमुळे तिचा गेम बिघडतो दर वेळी Sad

त्याला एक पण टास्क खेळाता येत नाही. गिव्हप मारतो. त्याचे कॉन्ट्रॅक्ट सीझन चे आहे म्हणे. पहिल्याच आठवड्यात गेला तरी तेवढेच पैसे. त्याशिवाय जितके आठवडे राहील तितके आठ्गवड्याचा काहीतरी इन्सेन्टिव पण मिळतो.
पण दीपिकाला टास्क जिंकता येत नाही याच्यासारख्या रड्यामुळे. तिने केव्हीला तोडायला नको होतं. आधी तो त्यांच्यासोबत होता. तोही स्मार्ट वाटतो आहे.

रोमिल अजिबात आवडत नाही जो विनर बनणं ऑलमोस्ट पक्कं होत चाल्लय ! >>> नाही होणार, दीपिका होईल.

माझा अजूनही अंदाज दीपिका, श्रीसंत, रोमिल.

हो, श्रीसन्त स्वतःच म्हंटला होता कि ७ आठवडे काढले कि माझं काम झालं, सगळी अगदी पहिल्या एपिसोडपासून सगळी टास्क्स गिव्हप करतो !
मला आता रोहितही श्री पेक्षा अ‍ॅक्टिव्ह वाटायला लागलाय, वीकेन्डच्यावारला श्री बद्दल म्हंटला तो कि मेघाजी इतना अच्छा खेल रही थी, इन्होने आके बिगाड दिया ! मेघालाही रोहित त्यावरून चिडवत होता कि तुमची टिम (कोब्रा टास्क मधे)ज्याची वाट बघतेय , त्य्सनीच तर सगळा गेम बिघडवला, स्वतः यायच्या ऐवजी मला पाठवलं आणि मी गेम पलटला ! रोहितची तेंव्हा चिड आली होती पण अगदी प्रत्येक शब्द खराय !
केव्ही माइंड गेम खेळतोय वरवर इनॅक्टिव्ह दिसत असला तरी, हॅप्पी क्लब भल्याभल्यांना फोडता आला नाही तो त्याने फोडलाय आणि स्ट्रॅटजीज सुध्दा तोच आखतो या गरम डोक्याच्या लोकांचा वापर करून !

रोहितची तेंव्हा चिड आली होती पण अगदी प्रत्येक शब्द खराय ! >>> हो जसलीन जाणार होती, ती परोपरीने सांगत होती याला जाऊ देऊ नका तरी श्रीनेच पाठवलं म्हणजे रोहितचा आग्रह, हट्टीपणा मान्य केला त्याने. जसलीनला पाठवायचं ठरलं होतं.

कालही श्री ने स्वतःचं हसं करून घेतलं !
हिंमत है तो बाथरुममे आ म्हणत होता रोहितला Biggrin , त्याचा अर्थ होता मारामारी करायला , पण आधीच टवाळ अस्स्लेल्या सुरभि अँड कंपनीला टिंगल करायला वाक्यं मिळालं Proud
रोहित म्हणे मी कशाला येऊ मारामारी करायला आणि मार खायला , माझ्याकडे नाहीयेत अडीच करोड ( काँट्रॅक्टनुसार मारामारी करणार्यांना अडीच करोड दंड+ जेल होऊ शकते ), तू एकटा कर दंगा !

केव्ही माइंड गेम खेळतोय वरवर इनॅक्टिव्ह दिसत असला तरी, हॅप्पी क्लब भल्याभल्यांना फोडता आला नाही तो त्याने फोडलाय आणि स्ट्रॅटजीज सुध्दा तोच आखतो या गरम डोक्याच्या लोकांचा वापर करून >>> अच्छा.

डीजे तू किती छान अभ्यासू मत मांडतेस. न बघता लक्षात येते.

https://www.youtube.com/watch?v=TxEQYoCe8fc

हे बघितल्यावर दीपकला तर काढायला हवं असं वाटतंय. त्या शिवाशिषला काढलं तसं म्हटलं तर उगाच पण हा दीपक तर फार गयागुजरा आहे.

वोटिंग ट्रेंड्स दाखवत आहेत कि जसलीनला सगळ्यात कमी मतं आहेत. मेघाला काढायचं असावं , कारण वोटिंग लाईन्स उद्यापर्यंत ओपन केल्यात, ज्या नेहमी गुरुवारीच बंद होतात. खूप गडबड आहे हा सीजन. सगळी सायको लोकं आलीत. सुरभीकडे इतकी छान शब्दसंपत्ती आहे , मला ती आवडायची. पण अगदीच काहीही आहे. अगदी सायको.
मला जसलीं आवडते , कारण मेघाला दाखवतच नाहीयेत. ती फक्त भांडताना दाखवतात.
दीपिका श्री ला खेळायला मेघा हवी असते , पण कॅप्टन साठी ते दोघेच , बाकी कोणी नाही.
रोमिला-सोमी प्रकरण भलतच निघालय.
आता डोईजड प्रकार झालाय बीबॉला. आधी सगळ्या कॉमोनर्सला डोक्यावर घेऊन ठेवलं, आता गडबड सुरु झालीये .
बीबॉच असं झालय ना कि आधीच ठरवतात कोणाला पॉसिटीव्ह आणि कोणाला नेगेटिव्ह दाखवायचं. आधीच विनर ठरवायचं], म्हणजे तसं एडिटिंग करता येतं . अगदीच फालतू शो झालाय

दीपिका श्री ला खेळायला मेघा हवी असते , पण कॅप्टन साठी ते दोघेच , बाकी कोणी नाही. >>> मग तो caller बरोबर विचारत होता की मेघाला, तेव्हा तिने मान्य नाही केलं.

सुरभीकडे इतकी छान शब्दसंपत्ती आहे >>> मी बघितलं तेव्हा फक्त भांडायची. अपशब्द पण असायचे जे दाखवत नाहीत. अर्थात youtube वर बघितलं होतं.

Pages