बिग बॉस १२ : After padosis, it's time for jodis vs single

Submitted by अविका on 19 September, 2018 - 04:15

बिग बॉस १२ सुरु झाले आहे
मराठी बिग बॉसचे ईथे खुप चाहते होते
तसेच हिंदी बिग बॉस, खासकरुन सलमानच्या हॉस्टींगचे चाहते पण खुप आहेत
तर त्यावर चर्चा करायला हा धागा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मला श्रीसन्तला घमेलं भरून मेगासाइझची कार्याकयात असतात तशी मोठाली भांडी घासायला लावली भर गार्डन एरीयात तेही बहुदा बिबॉ स्टाफची खरकटी भांडी शिक्षा म्हणून ते अजिबातच नाही आवडलं<<< अगदी अग्दी.. मलाही खटकले हे. काहीही असो, तो कसाही असो... पण आज इन्डीया टीममधला एक क्रिकेटर भान्डी घासतोय आणि ते ही नॅशनल टेलिव्हिजनवर सगळ्यान्ना दिसतेय.. हे वाईट दिसते यार!

शिक्षा चुक की बरोबर हा मुद्दा हवा.

क्रिकेटीयर असला तरी इथे आलाय ना, काहीही होऊ शकतं, करायला लागू शकतं माहीतेय ना त्याला. बरं क्रिकेटमधून ज्या कारणासाठी बाहेर पडावं लागलं ते कारण म्हणजे कलंक नाही का.

हा जर तो शिक्षेयोग्य नसेल आणि सूडबुद्धीने केली असेल तर ते मात्र चूक. मग तो क्रिकेटपटू असो वा सामान्य माणूस.

बरं क्रिकेटमधून ज्या कारणासाठी बाहेर पडावं लागलं ते कारण म्हणजे कलंक नाही का.>>>> +१११११११११११११११११११

मेघा ने राडा घातला का ? >>>>> हो. दिपक आणि रोमिल तिला चिथावत होते. मेघा दिपकवर चप्पल फेकून मारणार होती, पण दिपिका मध्ये आली.

बादवे, करणला सतत सलमान ह्यूमिलेट करतो म्हणून करणच्या बायकोसकट अख्खी हिन्दी टिव्ही इन्ड्रस्टी सलमान/ बिबॉ विरोधात गेलीये म्हणे.

मेघाला दीपक आणि रोमिल चिडवत होते म्हणून तिने चप्पल काढली आणि दिपकला मारणार इतक्यात दीपिका मध्ये आली आणि ती चप्पल दीपिकाला लागली, मग दीपक रोमिल बाजूला झाले आणि मेघाची दीपिकाची चांगलीच जुंपली, केस ओढत एकमेकांना मारत होत्या दोघी, ते पाहून श्रीसंत चांगलाच पिसळला आणि घरावर चढून पळून जायचा प्रयत्न करू लागला, त्याला थांबवायला रोहित जेलमधून बाहेर पडला, मग त्या दोघांना शिक्षा म्हणून केविने त्याच्या लग्नातली खरकटी भांडी दोघांना घासायला लावली.

मेघा ने राडा घातला का ? >>>>> हो. दिपक आणि रोमिल तिला चिथावत होते. मेघा दिपकवर चप्पल फेकून मारणार होती, पण दिपिका मध्ये आली.

>>>> आणि यानंतर पुढची टास्क सुरळीतपणे सुरु झाली.

मला आधी श्रीशांत आवडत नव्हता, पण ते कॉमोनर्स इतक्या खालच्या पातळीला गेलेत कि श्रीशांत बरा वाटतो. दीपिका आवडत नाही. मेघाला अजूनही जास्त दाखवत नाहीत. सृष्टी गोंधळलेली वाटते. रोहित लव्ह स्टोरी करून लाईम लाईट मध्ये राहायचा विचार करतोय. करणवीर कधी आवडतो कधी नाही. शिवाशिष श्रीशांत मुळे झाकला जातोय. आणि चक्क जसप्रीत आवडायला लागलीये.

गोंधळलेली सृष्टि हैपी क्लब ला बोलली ( मेघा ला उद्देशून) ,” is she a winner”..
मेघा ने बरोबर शहानपणा काढ़ला त्या दीपक चा....
हो टीजे सिद्धु (KV च्या बायको) ने बिग्ग बॉस ला लेटर लिहले आहे...

मेघा बोलते एकदम बरोबर.. पण तिने जास्त त्यांच्या चिडीला उत्तरे देत बसु नये... त्यांना तेच हवय... वेळ येणारच त्यावेळी बरोबर सुनवायच

पण तिने जास्त त्यांच्या चिडीला उत्तरे देत बसु नये... त्यांना तेच हवय... वेळ येणारच त्यावेळी बरोबर सुनवायच >>>>> अगदी अगदी. काल सुद्दा तिच रोमिलशी वाजल. बिबॉमध्ये आणि बाहेर तिची 'विनोदी स्पर्धक' इमेज झालीये. लोक तिची राखी सावन्तशी तुलना करत आहेत. Sad

या वीकेन्डच्या वारला बरेच फटाके फुटणारेत (सोर्स : द खबरी ऑन ट्विटर)
रेग्युलर एलिमिनेशन व्यतिरिक्त शिवाशीषला सलमान हाकलणार, त्याने कालकोठरी वरून हंगामा केला, बिग् बॉस्स्ने बरेचदा सांगून ऐकले नाही म्हणून ( घ्या , हे तर श्री नेहेमीच करतो पण तो श्री आहे ना Wink )
जस्लीन ला भेटायला जलोटा येऊन जाणार म्हणे !
करणवीर बोहराची नेहेमी टिंगल होते म्हणून मागच्या आठवड्यात त्याच्या बायकोनी ट्विटरवर वर ओपन लेटर टाकल होत ज्याची मिडीयानी आणि तमाम टि.व्ही कलाकारांनी चांगलीच दखल घेतली, म्हणून सलमान केव्हीशी आता कट्टीच घेणार म्हणे Proud
तो या ओपन लेटरचा उल्लेख करून सांगणार केव्हीला कि तुझ्याशी बोललो तर अजुन लेटर्स येतील !
गंमतच आहे, एथिकली सलमानने तिला ट्विटरवरच उत्तर द्यायचं होतं , तिथे मुद्दे/प्रश्नं बरोबर होते !
त्याच्या बायकोने लेटर लिहिले म्हणून केव्हीवर का खुन्नस ?
असो, लेटर काय होतं मला विचारु नका, शोधा म्हणजे सापडेल नेट वर Proud
रोमिलला बाकी जोरदार बक्षिस वाटप चालु आहे , हॅप्पी क्लबने काही तोडफोड केलेली चालते, खरा राग हा असावा शिवमुळे हॅप्पी क्लब तुटला, म्हणून काढले का त्याला ?

कोण होते रे ते जे आम्हाला बिबॉ मराठीवर सांगायचे हिन्दी बिबॉ मधे कित्ती फेअर जस्टीस होतो म्हणून Biggrin

Lol शेवटच्या वाक्यासाठी.

केवि बायकोने लेटर लिहिलं, तिला तिथेच उत्तर द्यायचं हे बरोबर. त्याला बिचाऱ्याला आतमध्ये कल्पनाही नसेल काय नक्की लिहिलंय त्याची.

डीजे छान खुसखुशीत डिटेल्स, कल्पना आली काय सुरू आहे त्याची.

त्या हॅपि क्लब पेक्षा जसलीन, शिव, श्री, केव्ही हे खुपच चांगले आहेत... शिव जाता नये.... बरोबर केलं त्याने.. उगाच मागचं उकरुन काढुन जबरदस्तीने त्याला पाठवत होता रोमिल.. सोमी त्याच्या साईडची..

दीपांजली मी होते ग Biggrin बहुतेक हिंदी बिबॉस ला स्तुती आवडत नाही वाटतं. हा पहिला सिझन असेल जो मी फॉल्लो करत नाहीये. सगळेच्या सगळे भंगार भरलेत. आपली मेघा सोडून Wink

सुरभी ला काढ़ा यार.....डोक्यात जातेय.>>> ती एकवेळ परवडली, त्या बिहारीला काढा आधी. जॅम डोक्यात जातोय.
मेघा आधीही आवडली नव्हतीच अन आताही नाही. सध्या फक्त श्री, मस्तच आहे तो

www.youtube.com/watch?v=mXoYsM-VPY8

केवीने माफी मागितली, बायकोने बाहेर केलेल्या आरोपांची. सलमान भडकलेला दिसतोय. पण टीजेला पाठींबा आहे, पब्लिक सलमानवर वैतागलेत असं खालच्या पोस्टस वाचून समजतं.

अरे पुढच्या वेळेस लिहून घ्या, तिथे bb मध्ये काही झालं तरी घरच्यांनी ब्र काढायचा नाही असं. किती panic आणि hurt झालाय सलमान आणि bb पण.

दिपिका जाइल वाटतेय शेवटपर्यन्त. >>>>> जाणारच. आफ्टरऑल, ती कलर्सची ऑफिशियल बहू आहे ना. तिला जिन्कवतील सुद्दा.

आस्ताद नीट वागला असता तर तोही मराठी bb त तीनात असता कारण कलर्स मराठीच्या सिरीयलमध्ये होता आणि तिथून त्याला तिथे घेतलं पण त्याने आपल्या वागणुकीमुळे गमावलं. channel चा हिरो होता म्हणून पाचपर्यंत तरी गेला.

दीपिका आरामात जाईल पहिल्या तीनांत, असं वाटतंय.

वीकेन्डका वार पाहिला नाही पण शिवाशीष चा ‘मी शेंगा खाल्या नाहीत मी शिक्षा भोगणार नाही‘ अ‍ॅटीट्युड आवडला Happy
रोमिलने क्लिअरली पर्सनल खुन्नस काढली होती, २-३ आठवड्याची कारणं शोधून शोधून देत होता , सुरभि त्याच्यासमोर वेड्याचा झट्का आल्यागत वागत होती तरी तिला जेल नाही.
बिगबॉसच्या बायस्ड वृत्तिला बगावत करून विरोध केल्याने जाताजाता शिव हिरो बनला !

इथे वाचुन कालचा एपिसोड बघितला , रेग्युलर बघत नसल्याने बर्‍याच लिन्क्स लागल्या नाहीत, मी हिन्दीचा एकच सिझन (आनी मराठीचा एक_)बघितल्याने त्यावेळेची सलमानची बॉडि लॅग्वेज,एनर्जी आणि आताची यात खुपच फरक वाटतोय, आत्ताच्या सिझन्ला सलमान पाट्या टाकतोय अस वाटतय तो अजिबात कॉन्टेस्तन्टशी कनेक्टेड वाटत नाहिये, दिलेल स्क्रिप्ट बोलुन झाल माझ काम टाइप वाटतोय, मी ५ वर्शापुर्वी बघितलेल्या सिझनला सलमान चान्गला एनर्जेटिक वाटत होता.असो ! वय झाल आता त्याच
मेघाला काल बघताना तरी ती अजुनही आउटसाइडरच वाटत होती , (मेघाच्या कालच्या मेकप ड्रेसला फुल्ल मार्क्स)

उद्याच्या एपिसोडबद्दल ट्विटर वर समजल कि अख्या घराला नॉमिनेट केल्याची शिक्षा रद्द करून नॉमिनेशन टास्क घेतलं ज्यात मेघा, सृष्टी, दीपक, सुरभि, जस्लीन आणि केव्ही नॉमिनेट झालेत.
मला उगीच गट फिलिंग येतय कि मेघाला काढणार Uhoh
त्या गुड फॉर नथिंग रोहित आणि सोमिला वाचवलेल दिसतय नॉमिनेशन पासून , अनुक्रमे सृष्टी- दीपक बरोबरच्या फेक लव्ह स्टोरीजसाठी !
आज खर तर वोटींग ट्रेंड पहाता रोहित एलिमिनेट झाला असता पण शिवला कारण देऊन काढलं आणि रोहितला वाचवलं !

मेघा, सृष्टी, दीपक, सुरभि, जस्लीन आणि केव्ही नॉमिनेट झालेत.
मला उगीच गट फिलिंग येतय कि मेघाला काढणार >>> सुरभी जायला हवीय, मी बघत नाही पण ती डोक्यात जाते माझ्या.

शिवला उगाच काढलं.

Pages