खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.

Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही.
दोन दोनक्षरी शब्द मिळून एक चाराक्षरी शब्द बनतो.
एक शब्द संधी देतो, दुसरा निघून जाण्यास सांगतो.
चाराक्षरी शब्दाचा वेगळाच अर्थ.

बिंगो Happy

एका माणसाची दोन मुले.... त्या दोन मुलांचे त्या माणसाच्या शत्रूच्या दोन मुलींवर प्रेम.... पुढे जाउन लग्न .... आणि त्या जोड्यांबाबत त्या माणसाचा होणारा गैरसमज आणि त्यातून उडणारी धम्माल
चित्रपट ओळखा
_ _ _ /रे /_ _ _

वाजवा रे वाजवा
अगेन स्टोरी अशी आहे का माहित नाही Proud

XX
विदेशी माणूस स्टारकास्ट मधे असण्याच्या अगदीच तुरळक (मला तरी दुसरे ऊदाहरण आठवत नाहीये पण असू शकते) मराठी सिनेमांमध्ये हा नावाजलेला सिनेमा असावा

एक संगीत नाटक. मी पाहिलेल्या प्रयोगात शरद तळवलकर आणि भक्ती बर्वे यांनी काम केलं होतं. (ते अर्थात नेहेमी काम करत नसत, भरत नाट्य मंदीरच्या नाट्यसंगीत महोत्सवात त्यांनी हे बसवलं होतं)

सं _ _ Rofl _ _ _ _ _ _
ओह.. हाब चं आत्ता बघितलं. दोन्ही सोडवा Happy

अर्रर्र.. बराच वेळ कोणी टाकले नाही म्हणून मी लाईन मोडून मधेच टाकला. Happy
दोन्ही सोडवा .. मी आणि अमित ने दिलेले Proud

>> XX
विदेशी माणूस स्टारकास्ट मधे असण्याच्या अगदीच तुरळक (मला तरी दुसरे ऊदाहरण आठवत नाहीये पण असू शकते) मराठी सिनेमांमध्ये हा नावाजलेला सिनेमा असावा

#तुक्के (:हाहा: )
श्वास
वळू
दोघी

>> दोघी मध्ये फारिनर माणूस आहे?
नसेलही. म्हणून तर तुक्का म्हंटलं ना ? Happy

_ / _ _ / _

गाणी सुरेल, श्रवणीय. मराठी रंगभूमीवरची यशस्वी जोडी सिनेमात आणण्याचा प्रयत्न.

वळू

Pages