मायबोली गणेशोत्सव २०१८ - काव्य अंताक्षरी

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 03:35

आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
४)दोन किंवा अधिक कविता एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच शब्द/ओळी पासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेली कविता ग्राह्य धरुन पुढील कविता लिहावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गेली अनेक वर्ष,
निवांत आपल्या प्रत्यक्ष गप्पा राहिल्यात,
तुझा किनारा साद घालतोय मला,
मनातली खळबळ नक्कीच पोचलीय तुला.

दोन चारोळ्या होत्या पण पहिलीचा शेवट हिंदी होता म्हणून दुसरी घेतली मी स्पर्धा पुढे न्यायला, ते चालेल का.

तुला तुझ्यातला मी उमजावे
स्वप्न जरी ऐसे मी पहावे
सत्यात ते कैचे घडावे
कोडे मनाचे कधी उलगडावे

कोडे मनाचे कधी उलगडावे
आयुष्य हे सहवासात घडावे
स्वप्नांनी स्वप्नांतच का रमावे
शब्दपुष्पांस नवआयाम मिळावे

मिळावे म्हणोनी कांचनमृग कल्पिले
प्रज्ञापराधि सितेसी श्रीरामाने रक्षिले
कलियुगी लक्ष्मण रेखेसी जर ओलांडीले
अनेक रावण तुझियाभोवती आहेतच गं टपलेले

टपलेले आहे दु:ख मनातच लपुनी
ये पायवाट स्मरणांची चालत जपुनी
रेंगाळू नकोस पळभरही कोठेही
घालेल झडप हे श्वापद संधी बघुनी

बघुनी न बघण्याचे
खेळ जुने पुराणे
टिंडरयुगात भेटण्या
ना लागती बहाणे

बहाणे रुसण्याचे
करती आम्हा दिवाणे
राग अनुराग केवढ्याला?
मोल करण्या न लागे नाणे

नाणे एक दिधले ते म्यां शिरी लावले
दूजे दिले ते हृदयी वसविले
श्रद्धा सबुरीचे हे दान मिळाले
एकच धड़े मी वारंवार गिरविले
― कल्पेश

गिरविले अक्षर प्रथम श्री,
मग झाला साक्षरप्रवास,
पाटीपासून सुरु झालेला,
कीबोर्डपर्यंत पोचला झकास.

झकास झालं बायीं कलियुग आलं
धा त्वांडाचं रावण गल्लीत बी आलं
घरोघरी धुमशान राक्षस निपजलं
अशोकवन हल्ली परसात माजून राहिलं

राहीलं तर राहूदे,
दूर घर तुझं,
वाट दावेल तुला,
जवळंच घर माझं.

माझं काय तुझं काय,
कशाला ठेवावेत हिशेब?
कितीदा तरी झालं सिद्ध
माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच!

(स्वानुभव पुरेपूर उतरलाय चारोळीत Happy )

माझंच चुकलं जास्त,
ठेवला मी अतिविश्वास,
तू मात्र पेरलेस,
माझ्या वाटेवर काटे खास.

(हा अजिबात स्वानुभव नाहीये) .

हा हा अन्जू !

खास असं रोज घडत नाही काही
तेच आकाश तोच सूर्य, तेच तारे अन तोच चंद्र
घरही तेच - थोडं विखुरलेलं, थोडं आवरलेलं
तुझ्या सहवासात मात्र सगळंच जादूने भारलेलं

भारलेलं मंतरलेलं,
सर्व डोळ्यातून वाहून गेलं,
स्वच्छ नजरेने बघितल्यावर,
माझ्यातलं स्वत्व गवसलं.

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१८ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!

Pages