मायबोली गणेशोत्सव २०१८ - काव्य अंताक्षरी

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 03:35

आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.
३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
४)दोन किंवा अधिक कविता एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच शब्द/ओळी पासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेली कविता ग्राह्य धरुन पुढील कविता लिहावी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कहर केला इंधनदराने
थरथर लागली रुपयाला
नोटा मजून दमलो तोवर
कर्जबुडवा भुर्र गेला

कहर फुलत्या ऋतूने मांडलेला
बहर भरगच्च दाटुन सांडलेला
झुळुक रेंगाळलेली गंधवेडी
पदी रंगीत नाजुक घट्ट बेडी

भरत Lol

गेला आधार अनेकांचा
गेली ती जगण्याची भावना
दुःख आप्त दुरावण्याचे
कोणासही साहे ना

ना तरी ठरलेच नव्हते जायचे आहे कुठे
चालली, सरली म्हणेतो वाट वाटेला फुटे
अंत नाही चालण्याला, खंत नाही मानली
थांबला तो संपला ही खूण केवळ पाळली

थांबला तो संपला ही खूण केवळ पाळली
धावलो जागेवरी न फक्त कॅलरी जाळली
ऋतुजाच्या डाएटने काया माझी वाळली
आताआताश्या फक्त ५५ मिनिटे सांभाळली

फक्त पंचावन्न मिनिटे तेवढी सांभाळली
गोडधोडा पाहता दृष्टी किती का भाळली
आग्रहाला निग्रहाने ठाम दिधली उत्तरे
दीक्षितांची भाषणे गीता नि बाय्बल रे खरे!
Proud

खरे खरेसे सारे अता, भास वाटू लागले
भास सारे होउनि खरे, त्रास वाटू लागले
कोवळे हे वय असे, सारे खास वाटू लागले
फसवी ही अंतरे, सारे आसपास वाटू लागले

लागले बोलायला डोळे जरासे, तोच मी
घेतली ओढून सत्वर पापण्यांची ओढणी
जवळ येइल, खोल पाहिल वाकुनी, तेव्हा कुठे
लपवलेल्या सर्व गुपितांची उघडतिल संपुटे

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 September, 2018 - 19:39>>>. जमलंय

मागील पानावरील भरत. यांच्याही चांगल्यात .

संपुटे म्हणजे काय ?

संपुटांवरही अता पुटे चढाया लागली
स्मरणे सारी तुझी विस्मराया लागली
एक होते झाड ज्यावर दोन पक्षी राह्यचे
मधुकुजने ती अताश्या दूर विराया लागली

दीक्षितांची भाषणे गीता नि बाय्बल रे खरे! >> Lol
काय विषय आहेत काव्यांचे एकेक, नोटाबंदी, पेट्रोल भाव, दीक्षित डाएट !!

मस्त. Happy
आता मी 'लागली'वरून लिहिणार नाही! पर्यायी शब्द द्या. Proud

संपुटे कधी न उघडली स्त्रीजन्माची
समतोल राखत माहेर सासरची
जीव गुंतवते चुल मातीची
ज्योत तळपते प्रसंगी झाशीची

उचकी?
स्वरूप, तुम्ही डॉक्टर आहात का? (होपफुली पेशन्ट नसाल Proud ) डायेट काय, उचकी काय! Proud

३) शेवटचा शब्द/ओळ घेताना ती आहे तशीच घेतली जावी. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
<<
या नियमाने स्वरूप यांची कविता बाद आहे. "संपुटे" असेच यायला हवे.
कल्पेशकुमार यांची बरोबर आहे.

उचकी आली कारण नसता, जीव घाबरा झाला
ओठांपाशी पाण्याचा येऊन थबकला पेला
काय कुणी माझेसुद्धा या निर्मम जगात आहे?
आठव होऊन मनी कुणाच्या मीही रहात आहे?

स्वाती Proud
नाही नाही डॉक्टर नाही!
अधिक माहितीसाठी प्रोफाइल बघा Wink

झाशीची ती ज्योत तळपली
विश्वाला आदर्श घालावया
स्त्रीजन्म का फक्त बांधील
चूलमूल कूपमंडुक बनावया

आठव होऊन मनी कुणाच्या मीही रहात आहे?
सलज्जतेने मनीदर्पणी कुणी मजला पहात आहे?
किती सुखद ही जाणीव सजणा; तनमन हासत आहे
खरोखरी की भासच अवघा; स्वप्नच भासत आहे

बनावया मी सज्जच आहे
बनवायाला ये बिन्धास्त
इन्टरनेट जोडणीपलिकडे
काही लागत नाही जास्त!

Proud

आता? Proud

Pages