मजेशीर कोट्या चॅलेंज

Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:44

मजेशीर कोट्या चॅलेंज
एखाद्या सिनेमातला, नाटकातला संवाद असो किंवा कथा कादंबरी मधलं एखादं वाक्य आपण सतत कोट्या करण्यासाठी वापरतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे कोट्यांनी व्यापलेलं आहे. पावला पावला ला आपण दाखले देण्यासाठी एखादी कोटी वापरतोच. बऱ्याचदा आपण उत्साहात केलेल्या ह्या कोट्या मजेदार असतात. कधी कधी कोटी कोटी प्रयत्न करूनही कोटी साधत नाही, तर कधी कधी सहज बोलताना तोंडातून उच्चकोटीची कोटी बाहेर पडते. अश्याच मजेदार, विनोदी, मार्मिक कोट्या करणाऱ्यांसाठी हा चॅलेंज खेळ आहे.
नियम
१) संयोजक एक शब्द देतील.
२) त्या शब्दावरून फालतू कोटी करायची आहे.
३) जो सगळ्यांत आधी कोटी लिहील तो पुढचा क्लू देणार.
उदा. माउस
माउस माऊ स घाबरतो
पहिला शब्द - रेडिओ

Group content visibility: 
Use group defaults

नेमकं काय करायचं हे नाही समजलं.
नाटक-सिनेमा-पुस्तकातलं वाक्य वापरूनच कोटी करायची का?

उदाहरण द्यायला हवं होतं.

चालेल.

कापड का पडले? असे संयोजकाना अपेक्षीत असावे म्हणजे किमान दोन अर्थ एका वाक्यात. पण रेडिओ या शब्दावर मला तसे काही सुचले नाही.

उदाहरण म्हणून मीच कोटी सांगतो यावरील.

तो रात्री गोठ्यात येई व गाय बकरी गायब करी.

@ द्वादशांगुला: अं, एवढं जमलं नाही हे.

संयोजकांपैकी कुणी आयडींनी इथे भाग घेऊन धागा जरा पुश करून पुढे नेण्यास हरकत नसावी. म्हणजे खेळ नक्की काय हे नीट समजेल.

आदू: जमलंय की.

Sad

सगळ्यांचे प्रतिसाद मजेशीर आहेत. आता माझ्या प्रतिसादारकडे वळू. (वळू म्हणजे बैल नव्हे. Lol )
मी वळणावरून वळलो तर समोरच एक वळू माझ्याकडे वळून वळून पहात होता.

शब्द: वळू

उपास करू म्हणता? ते मी कसं करणार? उ शाळेत गेली तर उ पास होईल ना.

उ पास होत नव्हती म्हणून उपास करू लागली

शाली, छान.
पुढला शब्द द्या. ( वळु तुम्ही वापरलाय म्हणून).

मी 'वळू' शब्द वापरुनही पु्न्हा वळू हाच शब्द दिलाय. कारण वळूचे अजुनही बरेच अर्थ आहेत. Happy

कळत नव्हते की वळत का नव्हते म्हणून मी आजीकडे वळलो, तिला कळले की मला वळत का नव्हते, मग तिने मला काही लाडू वळून दाखवले, मग मी पण वळु लागलो.

आगमनाच्या मिरवणुकीत डुरक्या वळू ला हि कळत नव्हते इकडे वळू कि तिकडे वळू ?
शेवटी बाळूकाका आला आणि वळूला डावीकडे वळवून घेतले !
इकडे घरी गणपतीच्या पूजेच्या तयारीची इतकी घाई; कि कळतच नव्हते तो वळू कि ती वळू ! (तो: मोदक ती: समईची वात )

Happy

Pages