अतूट मैत्रीची आठवण

Submitted by NEILSAGAR on 12 September, 2018 - 01:59

निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि आयुष्य चुकत जाते
प्रश्न कधी कधी कळत नाही
आणि उत्तर चुकत जाते
सोडवताना वाटतं
सुटत गेला गुंता
पण प्रत्येक वेळी
नवनवीन गाठ बनत जाते
दाखविणाऱ्याला वाट माहीत नसते
चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते
पण अशा वाटेवरून जाताना तुझ्या मैत्रीच्या
अतूट बंधनाची आठवण येते......

Group content visibility: 
Public - accessible to all site users