बाळू (भाग ३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 March, 2009 - 06:20

बाळू (भाग १) http://www.maayboli.com/node/6700
बाळू (भाग २) http://www.maayboli.com/node/6732

बाळूच अस नाव गाजत असतानाच मामाकडे एक दिवस बाळूला आपल्या मुलीला मागणी घालायला गावातील हरी नावाचा इसम आला. हरीची ही एकुलती एक मुलगी कमळा ही ९वी त शिकत होती. हरीची थोडी शेती होती. त्यात शेती करुन तो घर चालवीत असे आणि मुलीला शिकवीत असे. बाळू बद्दल ऐकुन त्याने आपल्या कमळाला पदरात घेउन पोरीच नशीब उघडतय का ते आजमावण्यासाठी हरी बाळूच्या मामाकडे आला होता. मामा बाळू असताना जिथे नोकरी करत होता त्याच्या बाजुलाच हरीची शेती होती त्यामुळे तो हरीला आणि कमळाला चांगला ओळखत होता. कमळा ही चुणचुणीत, हुषार मुलगी होती. शाळेतून आल्यावर घरकामात मदत करून अभ्यास करत बसायची. हे गुण मामाला माहीत असल्यामुळे त्याने हरीला बाळू हा अजिबात शिकलेला नाही ह्याची कल्पना आहे. पण पोरी चा बाप तो. शिक्षणापेक्षा आपल्यासारख्याला पैसा महत्वाचा हे त्याला माहीत होत. म्हणुन त्याने पसंती दाखवली. मामानेही आपली दर्शवून आपल्या बहिणीला सुचवतो म्हणुन सांगितल. मामाने लगेच पत्र पाठवून बाळूला आणि त्याच्या आईला अशी मागणी आल्याबद्द्ल कळवल आणि जर पसंती असेल तर गावाला लग्नाचा बार उडवायच्या तयारीतच यायला सांगितल.

बाळुची आई मामाच्या पत्राने खुष झाली. आपल्या बाळूचा संसार, आपली नातवंड, आपल घर ही चित्र तिच्या डोळ्यासमोर नाचू लागली. तिने बाळुला आलेल्या पत्रा बद्दल सांगितले. बाळू पहीला मुलगी शिकलेली असल्या मुळे तयार नव्हता. पण आईने तिच्या वडीलांना ते माहित असुन त्यांनी होकार दिल्याचे सांगितले. बाळु कसाबसा तयार झाला आईच्या इच्छेखातर.

आठवड्या भराने बाळूने कामावर १ महिन्याची सुट्टी काढुन आईसोबत तो गावाला गेला. मुलगा आणि मुलीच्या पसंतीचा प्रश्न त्यांच्यात नसल्याने १५ दिवसांतच बाळू आणि कमळाच लग्न झाल. आणि १५ दिवसांनी बाळू आपल्या आई बायको सोबत मुंबईत आला.

आता बाळूने राहायला त्याच्या परीवारासाठी पार्टनरशिप मधली खोली सोडून स्वतंत्र खोली घेतली त्यात ते तिघे राहू लागले. बाळू हा अतिशय लाजाळू आणि भोळा असल्याने कमळाला सुरुवातीला थोड जडच जात होत. पण बाळूची आई वेळोवेळी तिला सांभाळून घेत होती. तिचे कौतुक करत होती आणि बाळूलाही समजावत होती. "आता तू मोठा झालायस, हा पोरकटपना सोडून दे. सारख आय आय करु नगस आता, तुला तुजी बायकू हाय. काय लागल सवरल की तिच्याकडच मागत जा. ती शिकलेली हाय आता समदा पगार तिच्याच हवाली कर. तिच आता घर सांभाळील". बाळूने आईची आज्ञा मानली आणि बाळूचा संसार सुखात चालायला लागला. बाळू रोज कामावर जात आणि बायको संसार सांभाळीत असे. ती खर्च भागवून पैसे साठवुन ठेवत असे. बाळूने आपल्याला घर एक वर्षानंतर बाळूच्या घरी झोली हलली. बाळूला मुलगा झाला. बाळू, आई आणि कमळा तिघ पण खुष होते.

आता बाळूच एक स्वप्न होत ते म्हणजे स्वत:च घर. बाळु आपल्या मित्रांना नेहमी घरा पुरती जागा घेण्या बद्दल बोलत असे. पण त्याला गुंठ्यात जागा परवडणारी नव्हती. त्याच्या इतर काही मित्रांना पण जागा घ्यायची होती. एक दिवस त्याला जागेचा पत्ता लागला. त्याच्या राहत्या जागेपासुन २ किलोमिटर अंतरावर डोंगराळ भागेत झोपडपट्टी वसाहत होती. तिथे १ लाख रुं गुंठ्यावर जागा मिळत होती. मग बाळूच्या मित्रांनी एकत्र जागा घेउन त्याग विभाग करुन घर बांधण्याचे ठरवले. बाळूच्या बायकोने आपले मंगळ्सुत्र गहाण ठेऊन एका सावकारा कडून घरासाठी कर्ज घेतले आणि नुसत्या का़ळ्या मण्यांची सर ती घालू लागली.

थोड्याच दिवसांत बाळुचे घर उभे राहीले आणि एक खोली आणि एक स्वयंपाक घर अशा बाळू आपल्या स्वतःच्या घरात आपल्या परीवारा सोबत राहायला आला. आईला आकाश ठेगणे झाल्याचा भास होत होता. आपली सगळी स्वप्ने पुरी झाल्याने आपण स्वप्नातच आहोत की काय अशी तिला शंका येऊ लागली. अशक्य गोष्ट शक्य झाल्यासारखी वाटत होती. बाळूची बायको आनंदाने फुलली होती. नविन घरात येताच काही दिवसांनी बा़ळूच्या घरात आणखी एक झोळी हलली. बाळूला अजुन एक मुलगा झाला. आनंदी आनंदात दिवस चालले होते.

अचानक एक दिवस बाळू बंदरातील ज्या विभागात काम करत होता तो विभागच बंद पडला. सगळ्या कामगारांच्या नोकर्‍या गेल्या. सगळे इकडे तिकडे मजूरी शोधू लागले. कुणि स्लॅप च्या कामात कुणी मोल मजुरी करुन आपले पोट भागऊ लागले. बाळु ला आणि त्याच्या परीवाराला हा धक्का सहन होत नव्हता. ह्या धक्यानेच बाळूची आई आजारी पडली. आणि थोड्याच दिवसांत वारली. बाळूवर एकावर एक संकट येऊ लागली. पण घरात बसुन बायका पोरांच कस होईल म्हणुन तो मजुरीच्या शोधात निघाला. त्याच्या शेजारची काही माणस इमारतीच्या स्लॅप वर मजूरी साठी जायची. त्यांना त्याने विचारल. पण आधिच भरपूर माणस आहेत तू मालकाला विचार अस त्यांनी सांगितल. मग बाळूने त्याच्या स्वभावाप्रमाणे मालकाकडे कामाची विनवणी केली. मालकाला त्याच्यातील एक आळशी मजूर काढायचा होताच . बाळूचा नम्रपणा पाहून त्याने बाळूला ठेऊन घेतले.

गुलमोहर: 

छान लिहत आहेस जागू, लवकर टाक पुढचा भाग Happy
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

शुद्ध लेखन आणि वाक्यांमधली सुसंबद्धता याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.