कविता माझी सोनपरी
सुवर्णफुले उधळीत आली
आनंदाची खैरात झाली
पणत्या लावा दारोदारी
स्वर्गातून आली सोनपरी
संसाराच्या वेली फुलली
मोगरकळी घरी उमलली
सुगंध उधळीत घरीदारी
स्वर्गातून आली सोनपरी
मंगल मंगल झाले सारे
वदती सर्वां गंधित वारे
आनंद विहरतो खरोखरी
स्वर्गातून आली सोनपरी
नाचू किती गावू किती
वेड लागेल वाटे भीती
भाग्यवान मी या भूवरी
स्वर्गातून आली सोनपरी
पणती आज घरा पेटली
उजळेल उद्या धरा सगळी
धन्य देवा कृपा मजवरी
स्वर्गातून आली सोनपरी
कविता माझी असेल न्यारी
सगळ्यांना हो प्यारी प्यारी
नभी मारण्या उत्तुंग भरारी
स्वर्गातून आली सोनपरी
मातापित्यांची लाडकी भारी
सासूसासर्यांची प्रीत त्यावरी
लाडकी पत्नी पतीची खरी
स्वर्गातून आली सोनपरी
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
(10.09.2018)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita