तार्‍यांनी गजबजल्या रात्री..

Submitted by अनन्त्_यात्री on 8 September, 2018 - 07:49

तार्‍यांनी गजबजल्या रात्री
चांदणवर्खी प्रकाशलाटा
शब्दांच्या घनदाट अरण्यी
अर्थाच्या धूसरशा वाटा

त्या लाटांवर
हरपे जाणीव
त्या वाटांवर
अगणित संभव

जाणिवेतुनी
ठिबके नेणीव
संभव सरता
उरे असंभव

Group content visibility: 
Use group defaults

छान!

असंभावची वाट साजरी
इकडे कडा तिकडे दरी
काटे पसरले वाटेवरी
भय गोठले जागेवरी

शब्दांच्या घनदाट अरण्यी
अर्थाच्या धूसरशा वाटा >>>
केवळ सुंदर...

ज्या नोटवर कविता संपते तेही उच्च ..... Happy