पहिली दाढी

Submitted by थॅनोस आपटे on 7 September, 2018 - 12:38

बाबा दाढी करताना जो वेडावाकडा चेहरा करत त्याची पाठीमागे आईसोबत टिंगल केलेल्या आपणास तारूण्यात पदार्पण करताना दाढी उगवली तेव्हां कसे वाटले होते ? आपल्यावर हा प्रसंग आल्याचे पाहून कसे वाटले ? दाढी उगवल्याबरोबर दाढी केलीत का ? आई ओरडली का ?
कि काही दिवस सोनेरी खुंट वागवलीत ? बहुतेक मित्र पण असेच होते का ?
पहिल्या दाढीबाबतचे अनुभव इथे लिहूयात.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्युनिअर कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला पहिली दाढी केली. मित्राने मदत केली.

सध्या दोन तीन महिन्यातून एकदा दाढी करत असल्याने बाहेरच करायचो.
पण गेल्या महिन्यापासून घरी करायला सुरुवात केली . तब्बल ५-६ वर्षांनी मी घरी दाढी करत होतो. हा अनुभव सुद्धा पहिल्या दाढीसारखाच होता. ५-६ वर्षे प्रॅक्टीसच नसल्याने खूप जखमा झाल्या.
सध्या दर आठवड्याला वा १०-१२ दिवसांनी एकदा करतो आणि घरीच करतो.

भौ एक सवाल हाय.
तुम्ही म्हणत्या कालेजच्या पहिल्या वर्षाला तूमी दाढी केलती. म्हंजे तूमी तवा स्वजो व्हता. (चिकना). आता तूमी १०~१२ दिसानी दाडी करता म्हंत्या मंजी तूमी आता रईस (शाखा) हायसा. आता मला सांगा तूमी हा जांगडगुत्ता काऊन केला? मदी तुमाच्या जिंदगीत स.ता . येऊन गेली का म्हनून तुमचा असा देवदास झालाय?

काय एकेक धागे??
आता लेडीज बायकांसाठी पहिले थ्रेडींग, पहिले वॅक्सिंग धागा काढावा. Happy

काय एकेक धागे?? >> तुम्हाला पुरूष जाणिवाच नाहीत Sad

मायबोलीच काय आख्खे इंटरनेट बायकांच्याच धाग्यांनी भरलेले आहे. मेक अप कसा करावा, साडी कशी नेसावी . कुणीही पुरूष तिथे जाऊन म्हणत नाही काय एकेक धागे. सहीष्णुता ! दुसरे काय ?

पाफा
मला दाढी शोभते म्हणून दाढी वाढवतो. काही वैफल्य वगैरे नाही.

>>>>
आता लेडीज बायकांसाठी पहिले थ्रेडींग, पहिले वॅक्सिंग धागा काढावा.
>>>
त्यापेक्षा पुरुषांनी पहिले वॅक्सिंग कधी केले किंवा कधी साडी परकर पोलका वगैरे घातले का याचे अनुभव रोचक राहतील.