मास्तर म्हणतात पोरांना , पिरेम लय वाईट

Submitted by सिद्धेश्वर विला... on 5 September, 2018 - 04:13

मास्तर म्हणतात पोरांना

पिरेम लय वाईट

करू नका कधी तुम्ही

जाल सर्व खाईत II

झाडे लावा, गुरे चारा

मायबापासी पोसा

पिरमामध्ये हे शक्य नाय

मग का स्वतःस कोसा ?

पिरेम पिरेम करता करता

बिनपाण्याची झाली

सोन्यासारखी नोकरी जाउनी

घंटा हाती आली II

हाती छडी अन टोपी घेऊनि

सायकलवरूनी येतो

डोक्याला मॉप शॉट लावूनी

घरी परत घ्यायला जातो II

पगारपाणी ना येळेवरती

वाढला भांडणतंटा

छडी घेऊनि फक्त बडवितो मी

शाळेमधली घंटा II

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला कवितेरिया झालाय का ????? खूपच कविता पाडून राहिलात, दिवसागणिक एक. इंडेक्स मध्ये कवितेचे टायटल आणि तुमचे नाव वाचून, ओलांडून जातात तसे इंडेक्समधल्या पुढील गोष्टीकडे जाते. पण आज कमेंट टाकण्यासाठी उघडून बघावी लागली.

अजनबी साहेब , नाही ओ , मला कवितेरिया नाही तर कल्पनेरिया झालाय . बोला काय म्हणताय . कुठे उपचार करून मिळतील ? अजून एक नम्र विनंती , ओलांडून जाण्यापेक्षा जरा नजरेखालून घालत जा म्हणतोय मी . आणि विखारी असले तरी चालतील पण प्रतिसाद देत जा .

छान कविता.
खूप आवडली, अजून येऊद्या !