माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<हि खूनी कधी झाली?>>
तिने हे मन बावरे मधे जान्हवी बघितली नि तिला सुचले की आपणहि खून करावा, राधिकावर आळ घ्यावा नि पैसे घेऊन पळून जावे.

बाकी गुरुचा स्मृतिभ्रंश होणार आणि राधाक्का भारतीय सालंकृत स्त्री सारखी त्याची सेवा करणार आणि गुरु तिच्या प्रेमात पडणार. नि मग दोघेहि नागपूरला जाऊन सुखाने रहाणार! कारण गुरूजवळ ३३ कोटी उरलेच आहेत.
आणि गुरू सांगणार की हे असे व्हावे याच उद्देशाने मी सगळे केले. मग राधिका नि गुरुची आई म्हणतील, आमचा विश्वास होताच की गुरू वाईट नाहीये! त्याने काहीच वाईट केले नाही, उलट त्याच्यामुळेच सुखी संसार झाला.
अर्थात हे सगळे व्हायला २०२६ साल उजाडेल. तरी अथर्व लहानच रहाणार! राधिकाची कंपनी तशीच चालू राहील. साखरगावचे शेतकरी प्रचंड श्रीमंत बनून तिथली सगळी मुले प्रोग्रॅमिंग शिकून अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इ. जागी जातील.
पोपटराव नि सोन्या लग्न करून दुबईला जातील.

Ajnabi ,
मानले तुम्हाला! तुम्ही स्वतःच्ज केड्या आ।आट की केड्याचे फाष्ट फ्रेंड? अगदी तुम्ही म्हणालात तसेच चालू आहे! गुरु डोक्यावर पडला!

Ajnabi ,
मानले तुम्हाला! तुम्ही स्वतःच्ज केड्या आ।आट की केड्याचे फाष्ट फ्रेंड? अगदी तुम्ही म्हणालात तसेच चालू आहे! गुरु डोक्यावर पडला!

नवीन Submitted by नन्द्या४३ on 29 May, 2019 - 18:३७>>>>>>>>>>
ओ, प्लिज नन्द्या४३ जी ... मी खेड्या नाही. आणि मी प्रोमो पाहिला होता तेव्हा अंदाज लावला.
हि मालिका केव्हाहि बघा अगदी पुसटसा प्रोमो जरी पहिला तरी स्टोरीत काय चालले आहे हे लगेच कळते शेवटी इतके वर्ष मराठी सिरियल्स आणि त्या केकता च्या सिरियल्स पहिल्या आहेत तो अनुभव गाठीशी असता आपल्या सारख्या पामर प्रेक्षकांना थोडा तरी अंदाज वर्तवणे कठीण नसावे. आणि खेड्याची कॅपॅसिटी कळून चुकली आहे.
या सिरीयल ऐवजी माझ्या घरी 'जीव झाला वेडापिसा' लावते मी कारण स्टोरी जरी लव हेट रिलेशन वाली जुनीच असली तरी त्यात थोडा राजकारणाचा तडका आहे. राजकारणी म्हणून त्यात सुमित राघवनच्या मिसेस आहेत आणि ते सैराट मधले पण एक व्हिलन आहेत. आपले मोजो आणि शीतलीची पूर्वीची मामी पण आहे. छान आहे ती सिरीयल ... सध्यातरी.

काल राधाक्का अगदी जेन्युइनली रडत होती व घाबरली होती...जेव्हा गुरु पडला व त्याला हॉस्पिटल मधे आणले! हिला अजूनही त्याच्याच बरोबर संसार करायचा आहे....बिचारा सौमित्र. !

तो गुरुच्या डोक्यावर पडण्याचा प्रोमो बघितला. शनायाने त्याला फक्त चुकून ढकलल होत. खून बिन नव्हता तो. तरीच म्हटल जी साध्या माश्या मारु शकत नाही ती खून कसली करतेय.

गुरुचा एक्सिडेन्ट इतका सिरियस नाहीये. फक्त चार-पाच जिन्यान्वरुन पडलाय तो. त्याच्या डोक्याला रक्तही दिसत नाही. मग मेमरी लॉस कसा असू शकतो. तसही झीम एक्सिडेन्टस दाखवण्याबाबत कच्चेच आहेत. आठवा होमिसुयाघमधला जानूचा एक्सिडेन्ट.

सुलू अहो मेमरी लॉस झालाच नाहीये. ती गुरूची आयडिया आहे राधिका ला घोळात घेण्यासाठी. आणि मजेचा भाग म्हणजे राधाक्का च्या अ‍ॅक्सीडेंट च्या वेळी तिने डॉक्टर ला विश्वासात घेऊन बेशुद्धी चं नाटक केलं होतं. नि लेखकाकडे कल्पनाच उरल्या नसल्याने ती आयडिया अर्धवट वापरली आत्ता. गुरू बराच वेळ बेशुद्ध असल्याचे नाटक करत होता. आणि मला हे नव्याने कळलं की असं काही डॉक्टर नामक व्यक्तीला नकळत रुग्ण करू शकतो. :

Advertise मध्ये दाखवला शान्या व गुरु बोलताहेत आणि राधिका म्हणते कि हे जर नाटक असेल तर दोघांना खलबत्ता मध्ये घालून कुटते.
एकदाच दाखवा बाबा खलबत्त्यात कुटते ते, सुरुवात इथूनच झाली होती सिरीयल ची..

गुरु किती हलकट आहे. त्याने मेमरी लॉस चे नाटक केले आहे. आणि चक्क तो मूर्ख राधिकाला कसे उल्लू बनवायचे याची स्ट्रॅटेजी बनवतो. अजूनही त्याला kedya , विलक्षणाबाई आणि ती शन्नो पाहिजे. काय तेच तेच दाखवत आहेत अरे बंद करा आणि व्हा मोकळे आणि करा एखाद्या वेबसिरीज मध्ये काम मग तुमची ऍक्टिंग स्किल्स दिसतील.

आनंदाची बातमी.......
ही सिरियल लवकरच संपणार आहे.
कालच नव्या मालिकेचा प्रोमो पाहिला. ती पंधरा जुलैपासून रात्री आठ वाजता लागणार आहे. Happy

गुरूला पैसे पाण्यात फेक्ताना काही लोकांनी बघितलं असतं. पोलिस ऑफिसमध्ये येतात तेव्हा गुरु लपून बसतो. पुढे नाही बघितलं.

हे सगळं पुन्हा तेच ते दाखविताहेत असं नाही का वाटत?
हे राधिकाने शनायाची मदत घेणं.... आधी पण तिने हे केलं होतं.....
Angry
केड्या च्या सगळ्या आयडिया संपल्या आता.............................

तिकडे तुपारे मध्ये विक्याचा बदला घेणार घेणार म्हणतां केड्याने ईशाला आई बनवुन टाकले. पार गोंधळलाय बिच्चारा केडु. आता इशा जर मम्मा बनणार असेल तर राजनंदिनी बदला कशी घेणार ?

परवा केड्याच्या डोक्यात शन्याच्या आईने काठी हाणली त्यामुळे तो बहुतेक इकडची कथा तिकडे टाकणार असेल. संवाद पुढीप्रमाणे..

राधाक्का : - का वो झेंडे असे कामुन भैताडावाणी वागुन राहीले तुमी? तुम्हाला मी ऑफिसमधून येतांना मसाले वाटायला सांगीतले होते ते सोडुन तुम्ही फोटो काढीत बसला?

मायरा:- ए सौमित्र, इथुन निघायचे बघ हं, उगाच मैत्रीचा आव आणु नकोस.

गुरुनाथ : हा लेखक मला सारखा लंडनला का पाठवतोय? आणी चेहेर्‍याने बनेल वाटणारे पण गरीब असणारे ते दोघे नवरा-बायको कोण आहेत?

सॉन्या : ए आनंद, जेनीला माझ्यासाठी केक ठेवायला सांग, आणी गोव्याची तिकीटे पण बुक कर म्हणावे.

शन्या : हा घारोळा कित्ती छान आहे नाही, गुरुपेक्षा तरुण पण आहे. पण याची बायको ती सॉन्या की कोण फार आगाऊ आहे. जाऊ दे मला काय, ती सॉन्या मी शन्या..

रश्मी Lol

ते शनायाचं घारोळा लय भारी आवडलं.

Pages