माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. शनायाने नवर्‍याकडे राहायला यावं म्हणून.

राधिका ने दुसर्‍या लग्नाची पोलिस कम्प्लेंट करणार नाही, हे अनाउन्स केलेलं.
गुरू- शनायाला ती डायव्होर्स हवा तर मी सांगते तसं वागून दाखवा, असं कॅरट देत होती.

आठ वाजता झी युवा बघत चला तुम्ही सगळे, म्हणजे राधिकाच्या सिरेलीचा ताप नको Proud
मी झी युवाची जाहिरात करत नाहिये, पण आठ वाजता लागणारी "सारे तुझ्याचसाठी" ही सिरिअल बरीच बरी आहे. मी रोज नियमित टिव्ही बघतच नाही. मला वेळ मिळाला तर जे काय अस्ले ते जरा वेळ बघते, त्यामुळे अधेमधे कोणत्याही सिरेलीत काहीही भयानक होत असेल तर ते मी मिस केलेलं असूच शकतं, पण तरीही त्या वेडगळ केड्यापेक्षा श्रुती-कार्तिकची लव स्टोरी जास्त फ्रेश वाटते! Happy

त्या वेडगळ केड्यापेक्षा श्रुती-कार्तिकची लव स्टोरी जास्त फ्रेश वाटते! Happy>>>+११११११११११११११११११११११११११

नवीन प्रोमो पाहिला. राधिका आणि शनायाचा महासन्ग्राम होणार आहे म्हणे. काही नाही, कबड्डीची किव्वा क्रिकेटची मॅच असेल त्यान्च्यात. Lol

नवीन प्रोमो पाहिला. राधिका आणि शनायाचा महासन्ग्राम होणार आहे म्हणे. काही नाही, कबड्डीची किव्वा क्रिकेटची मॅच असेल त्यान्च्यात. Lol

त्या गुरुला ( केड्या नव्हे खांडकेकर) आणि जुन्या शनायाला मराठी बिग बॉस दोन मधे आमंत्रण आहे असं काल बघितलं. गुरुने अ‍ॅक्सेप्ट केलं तर मालिका तरी संपेल किंवा गुरु तरी बदलेल Lol

बरयं ना मग. म्हणजे शनया आणी राधिका कचकचा भांडणे तरी सोडतील. Proud

शनया राधिकाला म्हणतेय : मुझे तुमसे कुछ भी न चाहीये, मुझे मेरे हालपे छोड दो..

आता राधिका आणि शनायात म्हणे महासन्ग्राम. Uhoh
धंदा बुडला तर काय करणार तिकडे? ही करतेय महासन्ग्राम.

आणि गुरू टॅक्सी चालवतो? Uhoh सिरियसली? कुठच्या तरी कंपनीचा सी ई ओ होता ना तो? मग अगदी ती पोझिशन नाही पण इतर कोणतीही त्यापेक्षा कमी पगाराची एखादी ऑफिसातली नोकरी मिळू नये याला? Uhoh बरं फूड इंडस्ट्रित राधिकाचा गवगवा आहे मान्य, मग इतर फिल्ड मध्ये प्रयत्न करावा.
टॅक्सी चालवणं हे कमी दर्जाचं नाही, पण त्याने घेतलेल्या शिक्षणाशी ते जुळत नाही म्हणून वाटलं.

सुलु जाम खूश आहे, तिला दोनदा हा संग्राम बघायला मिळेल. >>>>> Biggrin लॅपटॉप लटकल्याचा परिणाम. बाकी त्यान्चा महासंग्राम कम कबड्डीचा सामना किव्वा चमचा- लिम्बू सामना बघायला इथे कोणाला इण्टरेस्ट आहे. Who cares?

टॅक्सी चालवणं हे कमी दर्जाचं नाही, पण त्याने घेतलेल्या शिक्षणाशी ते जुळत नाही म्हणून वाटलं. >>>>>>>> गुरु टॅक्सी चालवण्याचाच काय, प्यून बनण्याच्या सुद्दा लायकीचा नाही.

मला आता गुरू व शनाया आवडतात व राधिका त्रासदायक वा टते. तिला काय हवे ते तिने खरेच घेतले आहे छिनून किवा हक्काने. तर गुरूने वडिलांकडून इस्टेटीचा लीगल हिस्सा घेउन शानाया ला घेउन पार दूर निघून जावे. ह्या पीडेपासून दूर असे मला वाटते. राधिका इन्सफरेबल आहे.
रेवतीने तिला खरेतर बरोबर सुनावले होते पण हिच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. आचरट पणा चालूच आहे.

मी परवा फिरायला गेले होते तेव्हा नाना चे काम करणारॅ कलाकार मागे सिक्युरिटी च्या लायनीत होते. बरोबर बायको होती बहुतेक. तसाच चट्टेरी
पट्टेरी टीशर्ट. माझ्या कलीगने सांगितल्यावर मी मागे वळून त्याच्याशी हस्तांदोलन केले. सर नानांना भेटून खूप आनंद झाल असे त्यांनाच सांगितले. मला घाबरून ते बहुतेक इमिग्रेशन च्या लायनीत गायबच झाले. परत येइ परेन्त नानां ची नात शाळेत जायला लागलेली असेल. व राधिका मसाले ३५०० कोटीची झालेली असून इशा बरोबर टेक ओव्हरच्या बातां करत असेल. ही ही ही

अमा +१
राधिका चे जे काही प्रकार चालू आहेत शनायाच्या बाबतीत ते रॅगिंग सारखे वाटले.. घर सांभाळणं किंवा न सांभाळणं हे गुरु व शनाया बघून घेतील ना... हिचा त्याच्याशी काय संबंध

राधिका रॅगिंग करतेय, राधिका पीडा आहे, गॅनायाने हिच्यापासुन दुर जायला हवं हे फक्त मला नाही तर बरेच लोकांना वाटतंय हे वाचुन बरं वाटलं मला. Happy

अमा... Lol
त्यांना आनंद नाही झाला का कुणी आपल्याला 'नाना' म्हणून ओळखलं याचा? राधिका कुठे आहे असं विचारायचं होतत..म्हणजे अजून इरीटेट झाले असते!!
राधिका खरेच पीडा आहे अगदी! रेवतीने इतके सुनावूनही ही पुन्हा तयारच आहे आचरट पणा करायला....

काय मज्जा
रेवती ने नोकरीवर लाथ मारली राधिकाचा इंटरव्ह्यु घ्यायला लागू नये म्हणून, हेतू काय तर तिची बदनामी होऊ नये. पण बकरा आपण होउन बळी जायला तयार असेल तर रेवती काय करणार? Uhoh कुठूनही तिची बदनामी होणारच्च असेल तर रेवतीने नोकरी सोडून काय साध्य होते? Uhoh
आणि ह्यांची हापिसं इतकी लिबरल आहेत की कधी पण नोकरी सोडा आणि धरा... आव जाव घर तुम्हारा. Angry

ह्यांची हापिसं इतकी लिबरल आहेत की कधी पण नोकरी सोडा आणि धरा... आव जाव घर तुम्हारा. >>>> हो ना खरंय!!
आणि चॅनेल च्या प्रमुखाला इतकं बिनडोक दाखवून झी वाल्यांनी स्वतःचीच लायकी आणि पायरी उघड केलीय वाटतय

काहीही होता महा संग्राम! राधिका ने इल्लॉजिकल उत्तरं दिली...तुला शनायाला गृहिणी बनवायची काय गरज असं विचारलं तर म्हणे..की इतकी वर्षं जपलेला माझा संसार मी जिला देईन तो तिने नीट सांभाळायला नको का? ..... रबिश! कसला संसार....?
डबे, भांडी, टिव्ही, फ्रीज...? कोण लिहीतं हे असले डायलॉग्ज..?

काल बिन्कामाची तिघ राधाक्काच्या ऑफिसमधे अथर्व चा वाढदिवस या गहन प्रश्नावर चर्चा करताना दिसले!

माझंं घर नावाचं नाटक आलं होतं ज्यात सासू राहतं घर सुनेच्या नावावर करते (मुलाचं बाहेर प्रकरण असतं आणि तो बाहेरच राहात असतो) कारण त्यात तिच्या भावना गुंतलेल्या असतात आणि तिने खूप कष्ट केलेले असतात त्या घरासाठी. ज्योती चांदेकर, क्षमा राज, विद्याधर जोशी होते. नाटक गंभीर आणि विचार करायला लावणारं होतं.

राधिका मिटींगमध्ये नेहेमी स्वत:चेे घरगुती प्रश्नच गोंजारत असते, वेळ मिळाला तर ईतरांचेही. गुरूलाही सगळंयासमोर घरगुती प्रश्न विचारत असते, तो तरी तिथे का थांबला होता काय माहित.

रेवती ने नोकरीवर लाथ मारली राधिकाचा इंटरव्ह्यु घ्यायला लागू नये >>>>>> छान, म्हणजे रेवतीला सुद्दा आता पुर्णवेळ गृहिणी बनवतील.

तिनशे कोटीच्या बदल्यात माझा नवरा मला परत दे >>>>>>>> क्काय, अस म्हणाली राधिका?

इतकी वर्षं जपलेला माझा संसार मी जिला देईन तो तिने नीट सांभाळायला नको का? >>>>>>>> तु सांभाळलास ना संसार नीट, पण काय झाल, गेला ना नवरा दुसरीकडे.

बादवे, गोदरेज ब्लॅक हेअर डाय च्या जाहिरातीत गुरु- राधिका चक्क हसून बोलत होते एकमेकान्शी. मॉर्डन कपल वाटत होते.

अथर्वच्या शाळेत भक्ती मिस ही एकच शिक्षिका आहे का? Uhoh
तक्रारी, अ‍ॅडमिशन्स, जेवू घालणे, येऊन रिपोर्ट कार्ड देणे सर्व कामे एकटिच करते ही बाई.

Pages