प्रतिबिंब

Submitted by रमेश रावल on 31 August, 2018 - 08:37

मुसळधार पडणारा पाऊस
अन कोसळणाऱ्या गारा
साद घालतो आहे तुजला
बघ हा बेभान वारा
ये अशी पावसात,
अन चिंब अशी भिज
तुझ्यासवे आहे तुझी सखी
ती लखलखणारी वीज
घे डोळे मिटून
अन होऊन जा जराशी धुंद
जाणवतोय का बघ तुजला
हा मातीचा सुगंध
कितीतरी वेळ,चिखलात खेळ
अन घे पावसात गिरकी दोन्ही बाहू पसरून
कधीतरी वागावं गं असं आपले खोटे मोठेपण विसरून
इतक्यात मी येईन
तुझी काळजी वाटून
म्हणेन बघ आज कस हे
आभाळ गेलंय फाटून
तू लाजशील अन हसशील
म्हणशील चल मी निघते
माझेच मला कळेना आजकाल मी अशी का वागते
मी म्हणेन तुला प्रेम झालंय
तू म्हणशील, धत काहीतरीच काय तुझं मला नाही पटत
कोणाच्याही बद्दल माझ्या मनाला, तसं काहीच नाही वाटत
मी म्हणेन मग सांग अशी वेड्यागत
का पावसात भिजलीस चिंब
अन डोळ्यात का उमटले सांग तुझ्या
हे माझेच प्रतिबिंब हे माझेच प्रतिबिंब

Group content visibility: 
Use group defaults