नवा मेंबर मनीमाऊ झोई (Zoe) उर्फ सगुणा - म्यांव म्यांव

Submitted by भोजराज on 30 August, 2018 - 23:07

मुलांच्या हट्टाला मान देऊन आम्ही एकदाची मनीमाऊ घरी आणली. मुलांनी तिचं नाव ठेवलं झोई आणि पत्नीनं सगुणा.

Zoe1.jpg

ती थोडीशी घाबरट आहे, पण गोड आहे. आमचा आवडता टाईमपास म्हणजे खिडकीत बसून बाहेर पक्षी वगैरे बघणे.
Zoe2.jpg

तिला मसाज करून घ्यायला फार आवडतो. अगदी ब्रह्मानंदी टाळीच लागते.
Zoe3.jpg

स्वतःला आरशात बघण्यात दंगं होतात मॅडम कधी कधी.
Zoe4.jpg

तिची सगळ्यात आवडती झोपण्याची जागा म्हणजे पुठ्ठ्याच्या खोका.
Zoe5.jpg

गेल्या दोन महिन्यात तिने सगळ्यांना एवढा जीव लावला आहे की ती आता घरातलीच एक नवी मेंबर झाली आहे. मुलांपेक्षाही आम्हा दोघांना आता तिचा जास्त लळा लागलाय.

म्यांव म्यांव !!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदे में रहने दो परदा ना उठाओ परदा जो ऊठ गया तो भेद खुल जायेगा
Sleeping_Zoe.jpg