तुम्हाला स्वतःची कधी लाज वाटली काय?

Submitted by प्रीत००९ on 30 August, 2018 - 12:42

माननीय कटप्पा यांच्याकडून स्फुर्ती घेऊन हा उद्योग.
तर मंडळी तुम्हाला आपल्या कृत्यांची कधी एकांतात लाज वाटली का? पश्चाताप होतो का?
१) जवळच्या व्यक्ती वर चोरीचा संशय घेणे,नंतर ती वस्तू आपणच कुठेतरी ठेवलेली आढळणे.
२) कुणाची वस्तू ढापणे.
३)उसने घेतलेले पैसे बुडवणे.
४) जोडीदाराशी प्रतारणा करणे.
पुढचे तुम्ही सांगा.
लहानपणी गावच्या जत्रेत एक आजी तळलेली मटकी विकण्यासाठी आली होती तेव्हा काही पोरांनी तिच्याकडून हिसकावून सर्व मटकी खाल्ली त्यात मीसुद्धा सामील होतो.
एकदा आजोबांनी भावाला व मला खवा खाण्यासाठी विकत घेऊन दिला होता,भाऊ आत साखर आणायला गेला इकडे मी सगळा खवा खाऊन टाकला.
आईबापांनी कष्टाने पाठवलेले पैसे दारू पिण्याकरिता खर्च केले.
मोठा भाऊ पास झाल्यावर त्याचे पुस्तकं त्याला न विचारता रद्दीत विकून त्या पैशांची चैन केली.
अजून भरपूर चुका केल्यात आता फार पश्चाताप होतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत आयडी पण तुमचाच का??? Happy
नवीन Submitted by mr.pandit on 31 August, 2018 - 05:37>>>>नाही हो, बोकलत हा माझा आयडी नाही.
नवीन Submitted by बोकलत on 31 August, 2018 - 19:07

>>>>>

बोकलत जी चुकीच्या आयडी ने प्रतिसाद दिलाय का?

लोक कुणालाही कुणाचाही आयडी आहे का म्हणून विचारतात आणि त्या प्रश्नाला सत्य समजून आणखीन कुणी आपण राष्ट्रपती असल्याच्या थाटात त्रागा करतात हे मजेशीर आहे. Lol

@ नाचणी एखाद्या आयडिला विचारलेल्या प्रश्नाला दुसरा आयडी प्रतिसाद देतो. आणि थयथयाट तिसर्याचा होतो. हे पण फार मजेशीर आहे. Lol

मला कॉलेजला असताना फुशारक्या मारायची सवय होती. आपण खूप पोचलेली व्यक्ती आहोत हे दाखवायची खूप आवड होती. अश्याच काही गप्पा अंगाशी आल्या आणि एका मित्राने एका मुलीचा नंबर दिला. म्हटले लाव हिला कॉल आणि बोलव, हि कॉलगर्ल आहे.
ठिक आहे म्हटले, लावला कॉल. अर्थातच पीसीओ वरून. समोरून खरेच एका मुलीने फोन उचलला. मित्राने जे नाव सांगितले तेच घेतले,
"हेल्लो"
"हेलो, बोलो?"
"कोण? रेशमा क्या?" (ईथे नाव बदलले आहे)
"हा बोलो?"
"मिलना है"
"ये नंबर कहासे मिला?"
"सलीमने दिया.. वो छोडो, मिलोगी क्या"
"कब? कहा?"
"अभी मिलो, दादर या परेल मे?"
"ओके, आधे घंटे मे आ जाओ हिंदमाता"
फोन कट ...
आता काय...
आम्ही तिघे जाऊन पोहोचलो हिंदमाताला. काय करायचे याची मला काहीच कल्पना नव्हती. पण स्वत:ला मोठे तीसमारखान घोषित करून झालेले.
मग तिथे एक मुलगी आली. दिसायला अपेक्षेपेक्षा फारच छान. पाच दहा मिनिटे रेंगाळली. तीच असावी. म्हणून पुन्हा जवळच्या पीसीओवरून कॉल लावला. तिचाच मोबाईल वाजला. ईथेतिथे बघत तिने उचलला,
"हा, आ गये क्या आप?" मी विचारले
"हा कहापे है तू?" तिनेच उत्तर दिले. कन्फर्म झाले ती तीच होती. पण पुढे काय?
"हा, बस पोहोचता हू पाच मिनिटमे, लेकीन पहले पैसे की बात करे क्या?"
"फिक्सड रेट है, सलीमने बताया नही क्या?"
"हा, लेकीन पहली बार है करके दे दो डिस्काऊंट.. आधाही पैसा है मेरे पास.."
"अबे तो आधाही मिलेगा... पहले बोलने नही आता तुझे...."
मला ते आधा बिधा काहीच नको होते, म्हणून मी तिथेच फोन कट केला. उगाच तिला आपले कामधाम सोडून आपला खोटेपणा लपवायला बोलावले याचे वाईट वाटले. पण त्याहीपेक्षा लाज वाटली ती याची की आपण फक्त फुशारक्याच मारू शकतो. त्यातले आधा जरी करायची वेळ आली तर आपली तंतरते Sad

ऋण्मेऽऽऽष भाय मला पण असाच fight or flight प्रसंगात पळ काढायची खोड आहे नंतर स्वतःची खूप निर्भत्सना करत बसतो,लाज वाटते व रागही येतो. प्रत्यक्षात मी चार जणांना भारी पडेल अशी तब्येत आहे पण संस्कारांमुळे भांडणं मारामाऱ्या जमत नाहीत.

Pages