“दहीहंडी”

Submitted by तुषार खांबल on 27 August, 2018 - 07:54

“दहीहंडी”
शब्दरचना:- महेश घाणेकर/तुषार खांबल
काल रक्षाबंधनानिम्मित बहिणीकडे गेलो होतो. सोसायटीच्या आवारात १५-२० लहान मुले दहीहंडीचा सराव करताना दिसली. त्यांच्या एकंदरीत हावभावावरून हा सण कसा करायचा याबाबत चिंतातुर असावे असं वाटत होत.
त्यांच्याच दुसऱ्या बाजूला त्या सोसाटीमधील काही जेष्ठ (३५ ते ४५ वयोगटातल्या) व्यक्ती बसलेल्या होत्या. आम्ही असताना कसे सर्व छान चालायचं, कसे सण साजरे होत असत, आम्ही कसे थर लावायचो यावर फुशारक्या मारत बसले होते.
हे चित्र बघून मनात एक विचार आला, “दहीहंडी हा उत्सव आपल्या मराठी संस्कृती-परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. भारतातील सणांचे वैभव दर्शवणाऱ्या सणांपैकी एक असलेल्या ह्या सणाची आज किती बिकट परिस्थिती झाली आहे. जर आपणच याकडे दुर्लक्ष्य केला तर मग हे जपायचं कोणी????”
“या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देतोच ना??? मग गोविंदा पण आपले कुटुंबच नाही का?? मग जेव्हा हि मुले सर्व करत असतात तेव्हा वाटत नाही का आपणही जावे यांच्या मध्ये?? थराला नाही जमणार तर धरायला तरी जाऊया.”
“आपला अनुभव आणि शिस्त आता दाखवले तरच पुढची पिढी त्याचे अनुकरण करेल. नाही तर पुढचा काळ याहूनही कठीण असेल. आजची तरुण पिढी हि संस्कृती-परंपरा टिकावू पाहत आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं नाही तर हे सण भविष्यात दिसतील ह्याची खात्री बाळगता येत नाही. सर्व सण साजरे होऊ शकतात. फक्त आपल्यात एकोपा असला पाहिजे. कारण बोलून काही होत नाही; प्रत्यक्ष कृतीतून ते समोर आलं पाहिजे.”
असा विचार करता करता सहज पावले त्या मुलांच्या घोळक्याकडे वळली. कारण मला एकच गोष्ट कळते ह्या सणांबद्दल 'सण साजरे करण्यासाठी आपल्याला खाज नाही तर माज असला पाहिजे'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सण साजरे करण्यासाठी आपल्याला खाज नाही तर माज असला पाहिजे>> भावना पोहोचल्या पण शब्द थोडे अग्रेसिव्ह वाटत आहे.

सण साजरे करण्यासाठी आपल्याला नुसती इच्छा नाही तर हौस असली पाहिजे<< हे कसं वाटतयं?