रेवरी

Submitted by Mia on 26 August, 2018 - 06:51

दोन्ही बाजुला असलेल्या दाट वनराईतुन गाडी वाट काढत निघत होती. हिरवीगार झाडी , त्यातुन हळुवार डोकावणारी रंगीबेरंगी रानफुले ! जग इतके सुंदर ,निरागस देखील असु शकते , खिडकीतुन बाहेर डोकावणार्‍या शेखरच्या मनात बाहेरचे दृश्य पाहुन विचार डोकावला. आणि तसा विचार त्याच्या डोक्यात आला नसता तर नवल , सतत घाईत असणार्‍या मुंबापुरीत त्याचे जन्मापासुनचे नाते, आणि त्यात तो मेडियाच्या लाइन मधे शिरला , नेहमी ब्रेकींग न्युजचा पाठलाग करत मुंबईची झोपडपट्टी असो वा पेज थ्री पार्टी त्याने सगळी मुंबई पालथी टाकलेली पण असा निसर्ग आज पहिल्यांदा तोही साक्षात पाहात होता .
आजची ही स्टोरी कव्हर केली की थोडा वेळ इथेच घालवूया असा तो विचार करत असतांना कधी त्याला झोपदेखिल लागली हे कळलेदेखिल नाही .आणि अचानक एका मोठ्ठ्या धक्क्याने आणि आवाजाने त्याला जाग आली . चार-पाच तास झालेले होते त्याला झोपुन , दुपारची सायंकाळ कधी झाले कळालेही नाही. झोपेचा अंमल गेल्यानंतर त्याने बसमधे आजुबाजुला पाहिले तर त्यास कळाले त्या संपुर्ण बसमध्ये तो एकटाच होता , एकही प्रवासी सोडा पण कंडक्टर आणि ड्रायव्हरचाही पत्ता नव्हता. शेखरला हे पाहुन जरा विचित्र तर वाटलेच पण डोक्यात शंकांचे काहुर देखील माजले . पण शेवटी तो एक मुरलेला पत्रकार होता कुठल्याही परिस्थितीत डोके कसे शांत ठेवायचे हे त्याला चांगलेच ठाऊक होते , त्यामुळे त्याने आपले सामान उचलले आणि बाहेर पडला. बाहेर तिच गर्द वनराई जिला पाहुन तो खुष झाला होता . सुर्य पश्चिमेला कलत होता , संधीप्रकाशाने सारा आसमंत उजळलेला होता ,हिरव्या झाडांच्या पानांना संधीप्रकाशाने केशरी रंगाने मुलामा दिलेला होता . खुप सुंदर दृश्य होते ते , ते पाहुन त्याचे पाय तिथेच थबकले . पण अंधार होण्यापुर्वी कसेही करुन त्याला कुठेतरी राहायची सोय करायची होती. म्हणुन त्याने लगेच काढता पाय घेतला. आता तो आपण नेमके कुठे आहोत याचा अंदाज घेत होता . जर वेळेचा अंदाज लावला तर तो आपल्या इच्छित स्थळापासुन फार दुर नसायला हवा होता. झपाझपा पावले उचलत तो आता रस्त्याचा वेध घेत चालत होता.
तेवढ्यात अचानक शेखरला दुरवर एक गावाचे नाव दर्शवणारी पाटी दिसली तिला पाहुन अगदी पळत पळतच तो रस्ता तुडवत तिच्यापर्यंत पोहचला.

"रेवरी" असे त्या जुनाट मोडकळीस आलेल्या पाटीवर लिहिलेले होते.ते पाहुन , वाळवंटात एखाद्या प्रवाशाला समोर पाण्याचा झरा पाहुन जसा आनंद होतो तसा आनंद शेखरला झाला. चला म्हणजे आपला अंदाज खरा ठरला या समाधानाने तो आता गावाच्या दिशेने चालु लागला.एव्हाना अंधार पडलेला होता , काळोखाने सारा परिसर गिळुन टाकलेला होता रस्ता तसा सुनसान होता , दोन्ही बाजुला किर्र जंगल , कुठेच प्रकाशाचे अस्तित्व दिसत नव्हते ,रातकिड्यांची किरकिर , मधेच होणारी पानांची सळसळ जंगलाची सजिवता दर्शवित होती , वाटेवर पडलेल्या पाचोळ्यावर स्वतःच्याच चालण्याने होणारा आवाजदेखील खुप अस्वस्थ करत होता , मधेच अंगावर उडून जाणारे वट्वाघुळ अंगावर शाहारे आणत होते दिवसा सुंदर दिसणारे जंगल रात्री किती भयंकर असु शकते याचा आता शेखरला प्रत्यय येत होता , पण नशिब आज चंद्र्प्रकाश तर आहे कदाचित पौर्णिमा आहे बहुधा असा शेखरच्या मनात विचार आला , मरो ना पौर्णीमा असो वा अमावस्या आपले काम होतेय न बास ! असे म्हणत तो चंद्रप्रकाशात तो रस्ता चालु लागला . आणि अचानक त्या रस्त्यात कसला तरी अडथळा आला , त्याने काय आहे ते पाहण्यासाठी डोके वर केले तर एक समोर एक निश्चल आकृती होती आणि ती त्याच्याकडेच सरसावत होती . एक भयंकर चेहरा दिसला ,कितीतरी व्रण असलेला तो भयावह चेहरा पाहरुन तो हादरलाच , त्याची पार बोबडी वळाली होती , आणि एकदम त्या चेहर्‍यावरचे ओठ हलु लागले , आता हा जबडा उघडुन आपले नरडे फोडणार असा विचार क्षणभर शेखरच्या मनात आला तोच कसल्याश्या विचित्र भाषेत एक आवाज शेखरच्या कानावर आला, पाहतो तर काय समोरची आकृतीच बोलत होती , " सायबं " अस काहितरी म्हणत त्या आकृतीने हात लावताच शेखर भानावर आला , आत्ता त्याच्या लक्षात आलं की हां इथला आदिवासी आहे आणि तो आपली विचारपुस करत होता. स्वत:च्या मुर्खपणाची त्यातल्या त्यात घाबरटपणाची त्याला खुप चिड आली पण तरी चला आता सोबत तर मिळाली असे मनात म्हणत त्याने त्या खेडुताला उत्तर द्यायला सुरु केली ," हो मी ठिक आहे , माझी जरा गाडी खराब झाली रस्त्यावर म्हटले मदत मिळते कुठे का ते पाहत होतो , इथे हा नावाचा बोर्ड दिसला मग चालु लागलो त्या दिशेने , तुम्ही इथलेच का" असे विचारत शेखरने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले कारण शेखरला त्याला मराठी समजले की नाही याबद्दल शंका वाटली . उत्तरादाखल तो शेखरकडे पाहुन हसु लागला , पण ते हास्य प्रसन्न , दिलासा देणारे नव्हते , ते एक गुढ , अस्वस्थ करणारे हास्य होते , त्याला पाहताच शेखर जरासा गोंधळला . मग त्या गावकर्‍याने पुढे बोलायला सुरुवात केली " ह्यो सायब म्या हिथलाच ,आता पलिकडच्या पाड्यातुन परतत होतो , चला म्य तुमास्नी वाट दाकवतु" . तसे शेखरला थोडा धिर आला निदान हा व्यवस्थित बोलला तरी, आणि मग ती दोघे पुढे चालायला सुरुवात करतात . पण शेखर शेवटी हाडाचा पत्रकार , शंका नाही विचारल्याशिवाय कसे चालणार त्याचे. त्याने त्या खेडूताला प्रश्न विचारायला सुरुवात केली.नाव काय , काय करतोस , गाव किती दुर वगैरे वगैरे त्याने आपले नाव भानु आणि व्यवसाय शेती असा सांगितला. ....
शेखरचे थोडे शंकासमाधान झाल्यावर तो शांत बसला पण त्याच्या चालण्यावरुन तो जरा विचित्र वाटला त्याला पण तो आपला चालत राहिला. पण शेखर तिथे शंका त्याने त्या भानुला विचारले "काय हो एव्हढ्या रात्रीचे तुम्ही एवढ्या जंगलातुन एकटे जाणार होतात तर कंदील वगैरे का नाही घेतला सोबत , भिती नाही का वाटत " त्यावर त्याने "आम्ही रानात जगनारी मानंस आमचा जनुमबी हिथ आणि मरण बी...आम्हाला ह्ये जंगल घरआंगण सायब त्याची आम्हाला कसलीया भिती" असे उत्तर दिले . त्याचे बोलणे ऐकुन शेखर शांत झाला तो म्हणत होता त्यात खोटं तर काही नव्ह्ते , मग त्याने ज्या मेन स्टोरीसाठी ज्यासाठी तो इतक्या दुरुन इथे आलेला होता त्या संदर्भात प्रश्ने विचारण्याचा प्रयत्न केला पण भानु ने त्याच्या हाती काही लागु दिले नाही.मग काय शेखर गुमान भानुमागे चालु लागला.
बराच वेळ झालेला होता आता ते गावाच्या वेशीजवळ पोहोचले होते. गाव कसला तो , काही १०-१५ झोपड्या होत्या .झोपड्यांच्या पासुन थोड्याच अंतरावर एक डोंगर आणि बाजुला किर्र जंगल.........त्या डोंगराला पाहुन एक विचित्रशी भिती त्याला वाटली कारण त्याच्या पायथ्याशी कसलीशी गुहा बनलेली होती पण ती गुहा एखाद्या जबड्यासारखी भासत होती , जणु तिथे जो जाईल त्याला गिळुन घेइन असे तिच्याकडे पाहुन वाटत होते ....पण शेखरने परत आपले लक्ष आपल्या कामावर केंद्रीत करायचे ठरवले ..गावात एकुण २०-३० लोक असतील , त्यांचे चेहरे थोडे भयंकर वाटत होते कारण त्या चेहर्‍यांना कसलीशी पिवळया रंगाची पावडरसारखं काही तरी लावलेलं होतं , म्हटल तर आदिवासी लोक ही असेल त्यांचे काहीबाही असा विचार करत शेखरने त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न सुरु केला . पण ती त्याला काही उत्तरे देत नव्हती , उत्तरादाखल फक्त हुंहुंम सारखा काहीतरी आवाज काढत होती .ती त्याच्याकडे बघत हातवारे करीत काहीतरी बोलु लागली . त्यांच्या आवाजात एक विचित्र कुतुहल होते , त्यांच्यातली चुळबुळ वाढली , त्याच्याकडे पाहुन त्यांना जणु खुप आनंद झालाय असे वाटत होते.......ते पाहुन शेखरला एकिकडे भितीपण वाटली आणि एकिकडे आधार पण ...भिती त्यांच्या त्या विचित्र हातवारे आणि बोलण्यामुळे आणि आधार त्यांनी त्याच्या येण्याला स्विकृती दिल्यामुळे जे त्यांच्या चेहर्‍यावर दिसणार्‍या आनंदामुळे स्पष्ट झाले होते......
त्यांच्याशी बोलता बोलता त्याला एकदम भानुची आठवण झाली ,त्याला मराठी समजत पण होते , तो या लोकांत आणि आपल्यात दुभाष्याचे काम करु शकतो याची शेखरला जाणिव झाली म्हणुन तो भानुला शोधु लागला , तर पाहतो तर काय भानु बाजुला नव्हताच तो केव्हाच गायब झालेला होता . शेखर त्याला इकडे तिकडे पाहत असतांना त्याला अचानक भानु दिसला तो त्या डोंगरातल्या गुहेकडे जात असल्याचे दिसले . भानु हळुहळु त्या गुहेकडे सरकत होता , त्याला शेखरने आवाज देउन थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो चालत होता , त्याच्या चालण्यात एक लय होती .. शेखर त्याच्याकडे जाण्यासाठी धावु लागला , त्याला हाक मारु लागला ........पण तेवढ्यात अचानक भानु वळला त्याने मागे पाहिले , त्याच्या चेहर्‍यावरही इतरांप्रमाणे पिवळ्या रंगाचा वर्ख आता लावलेला होता ,लाल झालेले डोळे जणु आग ओकत होते त्याचा चेहरा खुप भेसुर दिसत होता .......तेवढ्यात त्याने कसलाशी विचित्र आवाजात एक किंकाळी ठोकली आणि एक आर्त स्वरात गाणं गात त्याने पाठ फिरवली . शेखर या प्रकाराने पार हादरला होता , त्याने मागे वळण्यासाठी पाहिले तर त्याच्यामगे आता त्या लोकांचा जमाव होता ...कसल्याश्या विचित्र स्वरात ती लोक गाणी गात त्याच्याकडे सरसरावत होती ..खुप भयावह स्वर होते ते , कसलासा हिडीस आर्त हुंकार , त्याला ऐकु येत होता............कानावर पडणार्‍या प्रत्येक स्वरानिशी आतले काही कुरतडले जात होते .....जवळ येणार्‍या त्यांच्या प्रत्येक पाउलागणिक त्यांचा आवाज वाढत होता त्या आवाजासोबत शेखरला आत काही ओरबाडले जात आहे असे वाटु लागले ....त्याने कान घट्ट बंद केले पण तो आवाज कमी होत नव्हता ........ आता तो सैरावैरा धाउ लागला , वाट मिळेल ति़कडे धावु लागला . त्याला अचानक स्वतःचा दोन्ही बाजुंना त्याच्यासोबत प्रवासात असलेली लोक दिसु लागली ती त्याला स्वतःकडे बोलवत होती ....तेव्हढ्यात त्याच्या कानाशी एक आवाज आला "तु आलास , अखेर त्यांनी तुला शोधुन काढलाच , अरे का आलास तू ......तू वाचला होता त्यांच्यापासुन . पळ इथुन ........खुप त्रास देतील रे तुला ते ......खुप छळ करतील रे तुझा ....आम्हाला खुप छळलेत रे ..... खुप.........मेल्यानंतरही एव्हढ्या यातना होतात ठाउक नव्हते रे ....... जा तु नाही तर घोट घेतील रे तुझादेखिल ते तिळतिळ करुन ...आम्हासारखा तडफडशिल रे जा .......दुर जा इथुन .........."
तो आवाज गेला , त्या आवाजाची जागा आता एका आर्त गाण्याने घेतली होती , त्याचे स्वर हे कल्पनेपलीकडचे होते त्या समोरच्या गुहेतुन ते गाणे येत होते , त्यातले हुंकार फार भयंकर होते पण त्यात एक लय होती जी ऐकताच आतुन काहितरी ओढल्यसारखे होत होते .......शेखर आता त्या लयीत गुंतला , त्याने कानांवरचे हात कधीच काढलेले होते आता तो ते स्वर जणु वेडावल्यासारखे ऐकत होता त्यावर डोलत होता ,आत काहीतरी ओढले जात होते ...असंख्य सुया एकसाथ टोचाव्यात अशा वेदना शेखरला त्या हुंकारांनी त्या स्वरांनी होत होत्या , पण तरी त्याला त्या हव्याहव्याश्या वाटु लागल्या .........आता त्याला खुप हलके वाटु लागले , तो तरंगु लागला , त्या गुहेत कुणी त्याला बोलावत होते ......तो झेपावला ..... ...त्याच्यासाठी फक्त त्याच्यासाठी जो त्याची गुहेत वाट पाहत होता , त्याला साद घालत होता .......

ब्रेकिंग न्युज : महाराष्ट्र राज्याचा आदिवासी भागातील रेवारी गावाजवळ पुन्हा एका बसला विचित्र अपघात सारे प्रवासी ठार . अपघाताची कारणे स्पष्ट नाहीत आणि तो खरेच अपघात आहे की नाही याबद्दलही शंका कारण अपघातातील एकाही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची शारिरिक जखम नाही . पोलीस चौकशी चालु.पोलिस चौकशीत काही कारणे स्पष्ट होताच आपणास पुढील वृत्त कळवु .......
---- खबरदार २४ तासमधुन वैदेही

"अरे प्रशांत याच बसमधे आपला शेखर होता ना रे . आय रीयली फील सॉरी फॉर हिम रे ..चांगला मित्र होता रे .... या प्रकरणाचा छ्डा लावायलाच हवा आणि नाहीतरी आपणास शेखरची बॉडी ताब्यात घ्यायला जावे लागेल रे...." इती वैदेही.

"हो एडीटर मॅम , तिकडे जाणार मी , आणि तपास तर नक्कीच घेणार , अरे शेखर माझा जिवलग मित्र होता रे ...बघु तरी शेखरला जिव गमवावा लागले असे आहे तरी काय तिथे" इती प्रशांत ..
काही दिवसांनंतर .......

आज पुन्हा रेवारीजवळच्या घाटात बस बंद झालीये , लोकांना मदत करण्यासाठी आज पुन्हा भानु भेटलेला आहे ,आपल्या पुर्ण जमावासह ....................................

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इन्तेरेस्ति,
फक्त ते गावाचे नाव बदलाल का?
रेवाडी/ रेवारी हे दिल्ली राजस्थान सीमेवरचे खरे गाव आहे,
उत्तरेतला आदिवासी मराठी का बोलू लागला ते कळले नाही सुरवातीला