मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

मायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.

आजपासून मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.

आयफोन आणि आय पॅड दोन्हीवरही हे अ‍ॅप चालेल.
या आवृत्तीच्या चाचणीसाठी मदत करणारे मायबोलीकर शाली, किल्ली, योकु आणि मेधा यांचे आभार. वेळेअभावी त्यांच्या सगळ्या सूचना आणि अडचणी दूर करू शकलो नाही. पण पुढील आवृत्तीत त्यावर काम सुरु राहील.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मायबोलीचे अभिनंदन!
खुप वाट पहात होतो ॲप ची
(ॲप मस्तच आहे. पण सवयीमुळे सफारीवरच जास्त सोयीस्कर वाटतेय अजुन. Happy )

मायबोलीचे अभिनंदन!
खुप वाट पहात होतो ॲप ची>> +१
आत्ताच केलं डाउनलोड. धन्स माबो!

रच्याकने, बॉटम ला अ‍ॅड ची पट्टी येत नाहीय. टेस्ट अ‍ॅप ला होती. विदाऊट अ‍ॅड पाहायला मस्त वाट्त आहे अ‍ॅप.

माझा आधीचा प्रतिसाद वा च ता येतो आहे का कोणा ला?
आयओएस अ‍ॅप मधून टाईप केला आहे
की बोर्ड साठी काही डाऊन लोड करावे लागणार का प्रतिसाद नीट देण्या साठी ?

यू ज र ने म आणि पास. सेव कराय ची सोय असावी असे वाटतेय <<ए क आ ळशी गन्गू >>

यू ज र ने म आणि पासवर्ड दोन्ही अ‍ॅप मधे सेव्ह होत आहेत. IOS मधे बराच काळ सेव होतील . तसे अ‍ॅन्ड्रॉइडवरही अपेक्षित होते. पण तिथे २-३ दिवस भेट दिली नाही तर काही जणांसाठी लॉगआऊट होते आहे. त्यावर शोध चालू आहे.

IOS app वर मायबोलीचीच देवनागरी लिहण्याची सुविधा चालू आहे. Android आणि IOS दोन्हीसाठीही गुगल किबोर्ड अ‍ॅप सोयिस्कर आहे असा बर्‍याच मायबोलीकरांचा अनुभव आहे. कारण त्यात नुसते टायपींग नाही तर तुमच्या लेखनाच्या अंदाजावरून संपूर्ण शब्द सुचवले जातात त्यामुळे टायपींग वाचते. पण युनीकोड टायपींग करणारे कुठलेही अ‍ॅप चालू शकेल.

वेमा, आयओएस वर गुगल किबोर्ड घेतला तरी त्यात मराठी हा भाषेचा पर्याय नाही. त्याऐवजी आयओएसच्याच कीबोर्ड्स मधून हिंदी ट्रान्सलिटरेशन पर्याय त्यातल्यात्यात बरा पडतो वापरायला.
हे दोन्ही पर्याय आयोएस माबो अ‍ॅप वर काम नाही करत त्याऐवजी इंग्रजी कीबोर्ड वापरून देवनागरी लिहिणं जास्त सोपं पडतं (उदा. aahe > आहे )

Pages