का?

Submitted by शब्दरचना on 22 August, 2018 - 09:56

मी अनंतात लोपले
पाश सोडून तुझे मागे
तु ओल्या संध्याकाळी एकटा
सैरभैर होशील का?

ना मी उरले मागे
जाणाया व्यथा तुझी
तसबिरीसमोर माझ्या
तरीही त्या मांडशील का?

मी न आता
गाया भूपाळी
ना कवेत घ्याया तुला
जाणिवेने ह्या तळमळीने
मध्यरात्री दचकुन
तु अचानक उठशील का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults