टिंब टिंब प्रभात आणि निसटते अनुभव..!

Submitted by DJ. on 20 August, 2018 - 11:08

*** प्रसंग पहिला *** (८-१० वर्षांपुर्वीचा)

मी कॉलेज ला असतानाची गोष्ट. नविन अ‍ॅडमिशन घेतलेले असल्याने वर्गात जास्त कुणी ओळखीचे नव्हते. पण थोड्याच दिवसात ओळखी वाढल्या. ८०% विद्यार्थी बाहेरगावचे होते आणि अम्ही ८-१० जणच शहरातले. एकाशी चांगली मैत्री झाली. एकाच बेन्च वर बसु लगलो. लोकलाईड होतो त्यामुळे एकमेकांच्या घरी जायचे ठरवले. तो आमच्या घरी येउन गेला.. घरच्यांशी ओळख करुन दिली. नंतर त्यानेही मला त्यंच्या घरी बोलावले. मीही आगत्याने गेलो..

सिटी मधल्या एका पेठेत त्यांचे घर. घरी गेल्या गेल्या टीपॉय वर 'टिंब टिंब प्रभात' चा अंक दिसला.. आमच्याही घरी कोणीतरी टिंब टिंब साधक जबरदस्तीने हा अंक 'सरकवुन' जायचे. त्यातील साहित्य आम्ही वाचायचो. हसुन-हसुन पुरेवाट व्हायची... असो..
तर मित्राच्या घरी गेल्यावर तो अंक पाहिला.. तोवर त्याची आई आली.. ओळख करुन दिली.. त्यांनी चहा पण आणला आमच्यासाठी. नवीनच घर.. काय बोलायचे सुचेना म्हणुन मी आपलं समोर टीपॉय वर पडलेल्या 'टिंब टिंब प्रभात' अंकातील साहित्यावर बोललो.. हसलो.. आणि अचानक वातावरण बदलले.. Uhoh

मित्राची आई एकदम जहाल झाली... असे कहीपण काय बोलतोस म्हणुन विचारु लागली.. त्या अंकात लिहिलेली प्रत्येक गोष्ट आणि चमत्कार खरे आहेत हे सांगु लागली.. आपल्या धर्मातील लोक असे निधर्मी वागु लागले म्हणुन कोसु लागली.. त्या तिखट मार्‍याने मी पुरता भांबावुन गेलो.. मी मित्राकडे पाहिलं तर तो बिचारा खाली मान घालुन बसलेला... मी कसातरी विषय टाळत तिथुन सटकण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन पाहिला... पण बाई महाजांबाज..! माझे प्रयत्न फोल ठरवुन मला तिच्या दावणीलाच बांधुन ठेवले आणि प्रश्नांचा भडीमार सुरु केला..

तिने मला माझं नाव-पत्ता-घरचे लोक्स काय करतात म्हणुन सगळी माहिती घेतली.. वर मी ज्या ठिकाणी रहातो तिथे आसपास टिंब टिंब चे कुठे कुठे सत्संग चालतात ते सांगितले.. तिथे घरच्यांनाही घेउन जात जा असे ठणकवले.. इश्वरी सत्तेसाठी टिंब टिंब चा साधक हो म्हाणाली आणि माझ्यासारखे 'अविचारी' कुणी मित्र-नातेवाईक असतील तर त्यांनाही योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी अगदी धमकावुनच गळ्यात घातली...

त्या अनाकलनीय भडिमाराने मी पुरता गार पडलो.. सपशेल शरणागती पत्करुन कसंतरी हो ला हो करत तासाभराच्या महाभयंकर शाब्दीक आणि भावनीक बाँबने उध्वस्त झालेले माझे कान, डोळे, मेंदु सावरत मी काढता पाय घेतला...

*** प्रसंग दुसरा *** (वर्षभरापुर्वीचा)

कॉलेज संपवुन नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात सेटल झालो.. लग्न झाले मुलं झाली.. आणि एका सुट्टीच्या दिवशी भर दुपारी दाराची बेल वाजली. दार उघडले तर समोर एक भावनारहीत चेहर्‍याची बाई.. "क्काय?" असं विचारायच्या आधीच बाईंनी पढवल्यासारखे धडाधड बोलायला सुरुवात केली. म्हणे आम्ही ज्या एरियात रहातोय तिथे टिंब टिंब चे सत्संग शिबीर आहे.. तिकडे घरातील सर्वांना घेउन या.. असे आग्रहाचे निमंत्रण द्यायला आल्या होत्या.. आमच्या घरात कोण कोण असते आणि काय काय करतात हेही विचारत होत्या.. सर्वांना घेउन शिबिरात या जेणेकरुन ईश्वरी सत्ता यायला मदत होईल असं म्हणाल्या..

ते ऐकुन मला भारी गंमत वाटली.. मी विचार केला बघु खडा टाकुन.. डुबुक वाजलं तर वाजलं..! मी म्हणालो असं कधी होउ शकेल का..? ईश्वर असतो का..? त्याने कधी अम्हाला दर्शन नाही दिलं अजुन.. तशी तिची वात पेटली.. ८-१० वर्षांपुर्वी मित्राच्या घरी त्याच्या आईने वाजवलेली टेप इतक्या वर्षांनी माझ्याच घरात मला ऐकायला मिळाली.. मला भारीच मजा वाटली.. यांच्या विचारसरणीत काडीचाही फरक पडलेला दिसला नाही (आणि माझ्याही.. Lol Lol Lol ) हे पाहुन अचंबा वाटला..! या प्रकारात १०-१५ मिनिटे गेली.. तोवर अजुन ५-६ जणी तिला शोधत आमच्या घरापर्यंत आल्या.. या बाईने संगितले कि या दादाला (म्हणजे मला..! Blush ) जरा वाइट लोकांची नजर लागलेली आहे.. त्याला अपणाला सुधरवले पाहिजे.. पण मी कर्मावर विश्वास ठेवतो व ईश्वर-चमत्कार मानत नसल्याने मी टिंब टिंब सत्संगाला येउ शकणार नाही असं सांगितल्यावर एकिने तर मला तिचा चमत्कार सांगितला. तिचा शाळेत जाणारा मुलगा परिक्षेत नापास व्हायचा.. खुप क्लासेस झाले, गाईड्स झाले, पहाटे उठवुन अभ्यास करुन झाला पण उपयोग शुन्य..! मग तिने तिच्या मुलाला टिंब टिंब च्या सत्संगाला न्यायला सुरुवात केली.. तो धार्मिक झाला.. त्याने उपास केले, ईश्वराची आराधना केली आणि तो पास झाला.. Uhoh तोवर दुसरीने मला तिच्या मुलीबद्दलचा चमत्कार सांगितला.. ती म्हणे कायम तंद्रीत असायची.. फिटस यायचे.. बरेच डोक्टर झाले पण उपयोग नाही.. मग तिला टिंब टिंब सत्संगाला नेले.. बाइसाहेब लगेच बर्‍या झल्या.. Uhoh

हे ऐकुन मला हसावे की रडावे समजेनासे झाले.. त्या ५-६ जणी घरातुन निघायचे नावही घेइनात.. शेवटी मी आणि माझे घरातले सर्वजण टिंब टिंब सत्संगाला नक्की येउ असे सांगुन त्यांना कसेबसे नमस्कार करत घरतुन बाहेर काढले, दरवाजा लवला आणि हुश्श केले...!!
*****

प्रसंग आठवायचे कारण म्हणजे सध्या एका खुन प्रकरणात येणार्‍या बातम्या आणि संशयाची सुई रोखलेल्या टिंब टिंब प्रभात चे अनुयायी टी.वी. वर करत असलेले लंगडे समर्थन..!

आपणा कोणाला असे काही अनुभव असल्यास सांगावेत..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>आता हे सगळे महान कार्य साध्य करायचे म्हटले तर फुटकळ समाजकार्य केल्याची नौटंकी करावीच लागते ज्याची यादी सनातन समर्थकाने वर दिली आहेच. (बाय द वे हे सगळे "समाजकार्य"करायला हिंदुत्ववादी असण्याची काय गरज आहे ते मात्र त्यांनी सांगितलेले नाही. विसरले असावेत बहुतेक).<< अहो, हे लोक्स दुतोंडी असतात... आमच्या गावी तर हे लोक्स आणि यांच्या सिस्टर कंपन्या गणपती विसर्जनाला नदी तिरावर येउन लोकंना सांगत असतात की गणपती वाहत्या पाण्यात विसर्जन करा.. दुसर्‍या बाजुला आप्ल्याच करातुन कार्पोरेशन ने विसर्जनासाठी हौद बांधुन पगारी माणसे नेमलेली असतात.. पण ह्या तथाकथीत धर्मवाद्यांना आपल्या नद्या घाण होतात याची जराही फिकीर नसते.. एकीकडे होळीला खडकवासल्यात सजीव माणासाला आंघोळ करु देणार नाहीत पण गणपतित मात्र निर्जीव मुर्तीला ज्यात घातक रसायने आणि पदार्थ असतात ते नदीत फेकले तरी चालते.. निर्बुद्धपणाचा कळस नुसता..!!

केरळ मधे हे आणि यांच्या सिस्टर कंपनींमधले कोणि गेलेले अजुन्तरि टी.वी., पेपर किंवा मा.बो. वर तरी दिसले नाहित... उद्या मात्र हेच लोक्स केरळ मधे कसे मदतीला धावलो वगैरे सांगत बसतील..

रंग खेळून आलेल्या तरुणांना पाण्यात जाण्यापासून रोखतात हे लोक. लोकांना मजा करु देत नाहीत. शुद्ध पाण्यासाठी काय आजकाल R.O. असतातच. गेल्या बारा वर्षात किती जलतरणपटू तयार झाले असते.>>>अंनिसचे कार्यकर्ते होळी खेळून आलेल्या लोकांना नद्या, धरणाकडे जाणारे रस्ते दाखवतात का?

3. तिथे काश्मीर मध्ये जाऊन सैनिकांसाठी तणावमुक्त शिबीर का काय ते घेतात. चक्क लष्करास शिकवण्याचा आगावूपणा???>>> देशाची सेवा करायची आहे तर सरळ सैन्यात भरती व्हायला काय अडचण आहे?

विक्षिप्त मुलगा, मुद्दे पटण्यासारखे नाहीत. दहात एखादा बरोबर असेलही तरी या लोकांना कुणाचा खून करायचा अधिकार दिलाच कुणी? की चार चांगली कामं केलीत असं सांगून काही चुकीचं केलेल्यावर पडदा टाकायला किंवा ते चूक नाहीच असं शिकवतात या संस्था? दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे हिंदू नव्हते का?

विक्षिप्त मुलगा, तुमच्या यादीत भर
१०. गणेशमूर्तींचे विसर्जन त्यासाठी निर्माण केलेल्या कर्‍त्रिम तलावांत न करता नदी, तलाव, समुद्रातच करा असा आग्रह धरतात.
त्यांच्या सांगण्यावरून राज्य शासनाचा उच्च शिक्षण विभाग पुणे विद्यापीठाला पत्र पाठवतो आणि विद्यापीठ आपल्या अधीन असलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना तशा सूचना देण्याबद्दल पत्र लिहितं.
मीडियात बोभाटा झाल्यावर ते मागे घेतलं जातं.

११. गणेशोत्सवातल्या मोदकांच्या खोक्यांवर गणपतीची चित्र छापू नका. कारण ते खोके पुढे कचर्‍यात जातात, असं उत्पादकांना सांगतात. आता ईश्वर सार्‍या चराचरातच भरलेला असताना कचर्‍यात तो नसतो, असं कसं होतं, त्याची कल्पना नाही.

गणेशंमूर्तींमधल्या दिव्य तत्त्वा खरं तर नदी-समुद्रांतलं प्रदूषण कमीच होतं, पण देवाचं नाव /चित्र छापलेली वस्तू कचर्‍यात गेली की तिथे हे तत्त्व काम करत नाही.

केरळला मदत पाठवू नका कारण हा पैसा नक्षलवाद्यांना दिला जाणार आहे असे मेसेजेस फिरवले गेलेत. ज्या जिल्ह्यात गाय कापून पार्टी केली त्या जिल्ह्याला पूराचा फटका बसला हे ही व्हायरल झालेय. आपत्तीग्रस्त जिल्ह्यात कुठले सरकार आहे हे पाहून मद्त करायची असते हे समजले. उद्या भगवे सरकार आले तर मदतीचा उपयोग बाँब बनवण्यासाठी होईल असेही मेसेजेस फिरू लागतील.

माणुसकी नष्ट होत चालली आहे.

लष्कराला मनोबल वाढवण्यासाठी सप्रची मदत लागत असेल आणि ती घेऊ दिली जात असेल, तर या दोन्ही गोष्टी अतिशय चिंताजनक आहेत.

रघु राम आणि वैभव राऊत यांच्यातल्या वादविवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.

https://www.clip.fail/video/85erhAit87c

या व्हिडीओत रघु राम यांनी वैभव राऊतचा चांगला क्लास घेतला आहे. त्यात वैभव राऊत ने कायदा हातात घेतल्याचे कबूल केल्याचे दिसते. तसेच पुन्हा कायदा हाती घ्यावा लागेल असेही म्हणतोय. मग हा शांत होता , असे करणे शक्यच नाही हा सनातनचा आणि वकिलांचा दावा किती पोकळ आहे हे इथेच कळतेय. सिद्ध होईल अथवा न होईल हा भाग वेगळा.

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 21 August, 2018 - 17:32

नावाला जागतो आहेस , विक्षिप्तपणाचा कळस आहे

काल ह्या सनाटण्णूच्या समर्थकांनी पुण्यात मोर्चा काढला होता. जी धर्मांध विचारसरणी देशाला एक दिवस सरणावर घेऊन जाणार आहे (आणि हे लिबिया सिरीया अफगानिस्तान सारख्या अनेक देशांत आजवर सिद्धही झालेले आहे), ज्या विचारसरणीने विवेकवादाला कडवा विरोध केला, जी विचारसरणी विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याचे समर्थन करते, ज्यांच्या विरुद्ध मागच्या काही दिवसांत दहशतवादी कृत्यांचे सबळ पुरावे सापडलेत त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ लोक एकत्र येऊन मोर्चा काढतात. म्हणजे स्वत:हून विचार करण्याची क्षमता गमावलेले ब्रेनवाश झालेले आणि मूर्खपणाची निचत्तम पातळी गाठलेल्या लोकांच्या झुंडी देशात तयार होत आहेत, केल्या जात आहेत. हे खरे तर भयावह आहे. सनातन प्रभात हा टाईमपास म्हणून किंवा विनोद म्हणून पाहण्याचा विषय नक्कीच नाही. जितके होईल तितके या टोळीविरोधात जनजागरण करणे हि आपली जबाबदारी आहे.

बरेच वर्षांपूर्वी एका मंदिरात 'देवाला नमस्कार करायची माझी पद्धत कशी बरोबर नाही व शास्त्रोक्त पद्धत कशी' यावर एका साधकाने डोक्याची मंडई केलेली आठवली! Wink
बाकी काही असो...पण ते टनाटन प्रभात जास्त कॉमेडी की संध्यानंद यावर चांगली डिबेट होऊ शकेल.

टनाटन प्रभात जास्त कॉमेडी >>>>>

स प्र कॉमेडी नाही, याना हलके घेऊ नका

नालासोपर्या पाठोपाठ यांनी पुण्यात सुद्धा मोर्चा काढला होता
आणि दुर्दैवाची गोष्टनम्हणजे त्याला लोकांचा पाठिंबा सुद्धा मिळाला .

आज तर प्रेस नोट दिलिय.. औरंगाबाद-पुणे-मुम्बैत शस्त्रास्तसाठा सापडलेले साधक यांचे नव्हेतच म्हणुन....!! Uhoh

>>मग त्यांची पाठराखण करायला मोर्चा का काढला म्हणे?<< तेच तर.. असं दुटप्पी वागणं असतं म्हणुन मला ते भूतकाळात 'त्यां'च्याकडुन आलेले २ अनुभव मला आठवले म्हणुन इथे सांगितले.. पण बहुतेक इथे कुणाला असे अनुभव आलेले दिसत नाहीत..

Pages