टिंब टिंब प्रभात आणि निसटते अनुभव..!

Submitted by DJ. on 20 August, 2018 - 11:08

*** प्रसंग पहिला *** (८-१० वर्षांपुर्वीचा)

मी कॉलेज ला असतानाची गोष्ट. नविन अ‍ॅडमिशन घेतलेले असल्याने वर्गात जास्त कुणी ओळखीचे नव्हते. पण थोड्याच दिवसात ओळखी वाढल्या. ८०% विद्यार्थी बाहेरगावचे होते आणि अम्ही ८-१० जणच शहरातले. एकाशी चांगली मैत्री झाली. एकाच बेन्च वर बसु लगलो. लोकलाईड होतो त्यामुळे एकमेकांच्या घरी जायचे ठरवले. तो आमच्या घरी येउन गेला.. घरच्यांशी ओळख करुन दिली. नंतर त्यानेही मला त्यंच्या घरी बोलावले. मीही आगत्याने गेलो..

सिटी मधल्या एका पेठेत त्यांचे घर. घरी गेल्या गेल्या टीपॉय वर 'टिंब टिंब प्रभात' चा अंक दिसला.. आमच्याही घरी कोणीतरी टिंब टिंब साधक जबरदस्तीने हा अंक 'सरकवुन' जायचे. त्यातील साहित्य आम्ही वाचायचो. हसुन-हसुन पुरेवाट व्हायची... असो..
तर मित्राच्या घरी गेल्यावर तो अंक पाहिला.. तोवर त्याची आई आली.. ओळख करुन दिली.. त्यांनी चहा पण आणला आमच्यासाठी. नवीनच घर.. काय बोलायचे सुचेना म्हणुन मी आपलं समोर टीपॉय वर पडलेल्या 'टिंब टिंब प्रभात' अंकातील साहित्यावर बोललो.. हसलो.. आणि अचानक वातावरण बदलले.. Uhoh

मित्राची आई एकदम जहाल झाली... असे कहीपण काय बोलतोस म्हणुन विचारु लागली.. त्या अंकात लिहिलेली प्रत्येक गोष्ट आणि चमत्कार खरे आहेत हे सांगु लागली.. आपल्या धर्मातील लोक असे निधर्मी वागु लागले म्हणुन कोसु लागली.. त्या तिखट मार्‍याने मी पुरता भांबावुन गेलो.. मी मित्राकडे पाहिलं तर तो बिचारा खाली मान घालुन बसलेला... मी कसातरी विषय टाळत तिथुन सटकण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन पाहिला... पण बाई महाजांबाज..! माझे प्रयत्न फोल ठरवुन मला तिच्या दावणीलाच बांधुन ठेवले आणि प्रश्नांचा भडीमार सुरु केला..

तिने मला माझं नाव-पत्ता-घरचे लोक्स काय करतात म्हणुन सगळी माहिती घेतली.. वर मी ज्या ठिकाणी रहातो तिथे आसपास टिंब टिंब चे कुठे कुठे सत्संग चालतात ते सांगितले.. तिथे घरच्यांनाही घेउन जात जा असे ठणकवले.. इश्वरी सत्तेसाठी टिंब टिंब चा साधक हो म्हाणाली आणि माझ्यासारखे 'अविचारी' कुणी मित्र-नातेवाईक असतील तर त्यांनाही योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी अगदी धमकावुनच गळ्यात घातली...

त्या अनाकलनीय भडिमाराने मी पुरता गार पडलो.. सपशेल शरणागती पत्करुन कसंतरी हो ला हो करत तासाभराच्या महाभयंकर शाब्दीक आणि भावनीक बाँबने उध्वस्त झालेले माझे कान, डोळे, मेंदु सावरत मी काढता पाय घेतला...

*** प्रसंग दुसरा *** (वर्षभरापुर्वीचा)

कॉलेज संपवुन नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात सेटल झालो.. लग्न झाले मुलं झाली.. आणि एका सुट्टीच्या दिवशी भर दुपारी दाराची बेल वाजली. दार उघडले तर समोर एक भावनारहीत चेहर्‍याची बाई.. "क्काय?" असं विचारायच्या आधीच बाईंनी पढवल्यासारखे धडाधड बोलायला सुरुवात केली. म्हणे आम्ही ज्या एरियात रहातोय तिथे टिंब टिंब चे सत्संग शिबीर आहे.. तिकडे घरातील सर्वांना घेउन या.. असे आग्रहाचे निमंत्रण द्यायला आल्या होत्या.. आमच्या घरात कोण कोण असते आणि काय काय करतात हेही विचारत होत्या.. सर्वांना घेउन शिबिरात या जेणेकरुन ईश्वरी सत्ता यायला मदत होईल असं म्हणाल्या..

ते ऐकुन मला भारी गंमत वाटली.. मी विचार केला बघु खडा टाकुन.. डुबुक वाजलं तर वाजलं..! मी म्हणालो असं कधी होउ शकेल का..? ईश्वर असतो का..? त्याने कधी अम्हाला दर्शन नाही दिलं अजुन.. तशी तिची वात पेटली.. ८-१० वर्षांपुर्वी मित्राच्या घरी त्याच्या आईने वाजवलेली टेप इतक्या वर्षांनी माझ्याच घरात मला ऐकायला मिळाली.. मला भारीच मजा वाटली.. यांच्या विचारसरणीत काडीचाही फरक पडलेला दिसला नाही (आणि माझ्याही.. Lol Lol Lol ) हे पाहुन अचंबा वाटला..! या प्रकारात १०-१५ मिनिटे गेली.. तोवर अजुन ५-६ जणी तिला शोधत आमच्या घरापर्यंत आल्या.. या बाईने संगितले कि या दादाला (म्हणजे मला..! Blush ) जरा वाइट लोकांची नजर लागलेली आहे.. त्याला अपणाला सुधरवले पाहिजे.. पण मी कर्मावर विश्वास ठेवतो व ईश्वर-चमत्कार मानत नसल्याने मी टिंब टिंब सत्संगाला येउ शकणार नाही असं सांगितल्यावर एकिने तर मला तिचा चमत्कार सांगितला. तिचा शाळेत जाणारा मुलगा परिक्षेत नापास व्हायचा.. खुप क्लासेस झाले, गाईड्स झाले, पहाटे उठवुन अभ्यास करुन झाला पण उपयोग शुन्य..! मग तिने तिच्या मुलाला टिंब टिंब च्या सत्संगाला न्यायला सुरुवात केली.. तो धार्मिक झाला.. त्याने उपास केले, ईश्वराची आराधना केली आणि तो पास झाला.. Uhoh तोवर दुसरीने मला तिच्या मुलीबद्दलचा चमत्कार सांगितला.. ती म्हणे कायम तंद्रीत असायची.. फिटस यायचे.. बरेच डोक्टर झाले पण उपयोग नाही.. मग तिला टिंब टिंब सत्संगाला नेले.. बाइसाहेब लगेच बर्‍या झल्या.. Uhoh

हे ऐकुन मला हसावे की रडावे समजेनासे झाले.. त्या ५-६ जणी घरातुन निघायचे नावही घेइनात.. शेवटी मी आणि माझे घरातले सर्वजण टिंब टिंब सत्संगाला नक्की येउ असे सांगुन त्यांना कसेबसे नमस्कार करत घरतुन बाहेर काढले, दरवाजा लवला आणि हुश्श केले...!!
*****

प्रसंग आठवायचे कारण म्हणजे सध्या एका खुन प्रकरणात येणार्‍या बातम्या आणि संशयाची सुई रोखलेल्या टिंब टिंब प्रभात चे अनुयायी टी.वी. वर करत असलेले लंगडे समर्थन..!

आपणा कोणाला असे काही अनुभव असल्यास सांगावेत..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>प्रसंग आठवायचे कारण म्हणजे सध्या एका खुन प्रकरणात येणार्‍या बातम्या आणि संशयाची सुई रोखलेल्या टिंब टिंब प्रभात चे अनुयायी टी.वी. वर करत असलेले लंगडे समर्थन..!---

हे काय प्रकरण आहे?, नवीनच ऐकतेय.

डिजे भौ घाब्रू नका ते टिम्ब टिम्ब ऐवजी खरे नाव लिहिले तरी काही फरक पड्णार नाही.
ईथे पण, नी त्यान्च्या बुद्धित सुद्धा

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.hindust...

हे खून प्रकरण नाहीये, 8 बॉम्ब सकट पकडला आहे तो साधक,
गणेशोत्सवात हे बॉम्ब फोडून ईश्वरी सत्ता आणायचा त्याचा प्लॅन होता

एका साध्याभोळ्या साधकाला चुटपुट 8 बॉम्ब , 10 पिस्तुले सकट पकडले हे बाकीच्या साधकांना आणि गोरक्षाकना फारच मनाला लागले
म्हणून चटकन दोन एक हजार साधक एकत्र आले आणि त्याला सोडा म्हणून प्रोटेस्ट मार्च काढला, कथुआ मध्ये बलात्कार्यना सोडा म्हणून काढलेला ना , तसाच

ते देशभक्त बाँब होते. फुटले असते की सात्विक उर्जा बाहेर पडून नागरीक देशप्रेमी आणि बलवान तसेच वांड आणि पुष्ट झाले असते. मग सगळे पाकिस्तानवर चालून गेले असते आणि इम्रान खानच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणले असते आणि माफी मागायला लावली असती..
टाकशील का पुन्हा फास्ट बॉल ? करशील का पुन्हा शेवटाच्या दिवशी लंच नंतर आमच्या संघाचा खात्मा ? '

खबरदार जर बॉल टाकून जाल पुढे गधड्या

सनातन प्रभात Biggrin अजुनही पिवळे कपडे घालतात का त्या कल्टचे लोक? आणि त्यावर वेगवेगळ्या दिशांत सनातन प्रभात लिहिलेलं असतं असे?
त्यांच्याशी कधी बोलायचा योग नाही आला. समर्थन कसं करतायत ते कुणी सर्च केलेला असेल तर लिंक डकवा. मला सर्च करुन असल्याबातम्या फीड मध्ये यायची भिती वाटते.

काहीच माहित नव्हतं सनातन प्रभातबद्दल. हे नावदेखील मराठी आं.जा.वरच पहिल्यांदा ऐकलं. टीकाच करत होते सगळेजण किंवा टर उडवत होते. मलातरी फार काही लक्ष देण्यासारखा प्रकार वाटला नव्हता तो. पण आधी दाभोळकर आणि मग आता हे

> गणेशोत्सवात हे बॉम्ब फोडून ईश्वरी सत्ता आणायचा त्याचा प्लॅन होता.

एका साध्याभोळ्या साधकाला चुटपुट 8 बॉम्ब , 10 पिस्तुले सकट पकडले हे बाकीच्या साधकांना आणि गोरक्षाकना फारच मनाला लागले
म्हणून चटकन दोन एक हजार साधक एकत्र आले आणि त्याला सोडा म्हणून प्रोटेस्ट मार्च काढला, कथुआ मध्ये बलात्कार्यना सोडा म्हणून काढलेला ना , तसाच >

Sad
अवघड होत चाललंय सगळंच!

अमितव, एटीएसनेच ते बाँब तिथे ठेवले, असा त्यांचा दावा आहे. (कोणाला देजा वू होतंय का?)
गोरक्षणाचं काम करणारा करुणेने ओथंबलेल्या हृदयाचा माणूस बाँब बनवूच कसा शकेल.
त्या गोरक्षकाने अनेक धाडी टाकून गोवंशाला वाचवले किंवा बीफ पकडून दिले म्हणून विशिष्ट लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आहे, असंही म्हणणं आहे. या धाडींची आकडेवारी आहे, पाच वर्षांत इतक्या म्हणून. पण एकही पोलिस केस फाइल झालेली नाही.
----------------
सिम्बा, खून प्रकरणांतही नावे आहेतच काहींची.
सनातन प्रभात, शिवप्रतिष्ठान, हिंदू जनजागृती, श्रीरामसेने (पबमध्ये जाऊन दारू पिणार्‍या बायांना झोडणारे) या सगळ्यांशी संबंधित लोकांची नावं येताहेत.
-----------
पण अजून ईश्वरी सत्ता आली नाही का भारतात?

हे फेक्युलर छिद्रांवेशी असतात मेले,

फडणवीस इतके निष्पक्षपणे कारवाई करत आहेत , त्यांचे कौतुक करणे राहिले बाजूला, आणि हिंदुत्ववादी संघटनांना झोडपत बसले आहेत.

या संघटनांचे साप आपण पाळले, ते आता उलटून आपल्यालाच चावणार, आणि आपले राज्य करणे कठीण होनार ही जाणीव झाल्याने कारवाई झाली असावी का?

घाशीराम कोतवाल अमर आहे म्हणतात तो यासाठीच का?

कर्नाटक सरकारने दिलेल्या निर्विवाद पुराव्यांमुळे आणि न्यायालयाने ताशेरे ओढल्याने कारवाई झाली.

समर्थन कसं करतायत ते कुणी सर्च केलेला असेल तर लिंक डकवा. मला सर्च करुन असल्याबातम्या फीड मध्ये यायची भिती वाटते.>>>
लिंक वर क्लिक करणारच ना, तुम्ही काय क्लिक करताय/बघताय हे ही मशिन लर्निंग कडे पोहचत असते. सो नो वर्रिज.. Wink

यांना खरच तस वाटत असत. व्हीआरएस वाले व जेष्ठ बाया हे उद्योग करतात. जगायला काहीतरी नशा लागते हो यांना! जाउ द्यात. अजून त्या पांढर्‍या साड्यावाल्या ब्रह्माकुमारी पण तशाच.

खरंच जाऊद्या त्यांना,
हिंदू बॉम्ब ने मरायचे भाग्य आपल्यापैकी काही लोकांच्या नशिबी आले यात आनंद मनू या

हिंदू बॉम्ब ने मरायचे भाग्य आपल्यापैकी काही लोकांच्या नशिबी आले यात आनंद मनू या>>> दुर्जनांच्या नाशात त्यांना आनंद मिळतो. दाभोलकर गेल्यावर आंतरजालावर सुद्धा न लपवता येणार आनंद ओसंडून वहात होता.

टिंब टिंब का लिहिलंय? सनातन प्रभात ना?
मला सनातन प्रभात बद्दल फक्त माबोवर एखाददोन उल्लेख वाचुन माहित आहे.
एकदा त्यांची साईट पण उघडली होती पण धर्माचा प्रचार प्रसार वाली साईट आहे बघुन बंद केली.
बाकी जास्त काही माहित नाही. मुंबईत जास्त कार्यरत नाहीयेत वाटतं स प्र वाले. पुण्यात जास्त आहे का?

गणेशोत्सवात हे बॉम्ब फोडून ईश्वरी सत्ता आणायचा त्याचा प्लॅन होता.>>>>>>>

एका साध्याभोळ्या साधकाला चुटपुट 8 बॉम्ब , 10 पिस्तुले सकट पकडले हे बाकीच्या साधकांना आणि गोरक्षाकना फारच मनाला लागले
म्हणून चटकन दोन एक हजार साधक एकत्र आले आणि त्याला सोडा म्हणून प्रोटेस्ट मार्च काढला, कथुआ मध्ये बलात्कार्यना सोडा म्हणून काढलेला ना , तसाच >> >>> भयंकर आहे हे सगळं.

श्रीरामसेने (पबमध्ये जाऊन दारू पिणार्‍या बायांना झोडणारे)>>>> Uhoh सिरीयसली???

अजून त्या पांढर्‍या साड्यावाल्या ब्रह्माकुमारी पण तशाच...
Submitted by प्रकाश घाटपांडे on 21 August, 2018 - 11:31

या वाक्याचा तीव्र निषेध!!!
त्यांनी पांढऱ्या साड्या नेसाव्यात की रंगीबेरंगी बिकिनी घालाव्या हा सर्वस्वी त्यांचा विषय आहे. तुम्हाला किंवा मला त्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

एरवी कोणी 'तोकडे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतात' असे वक्तव्य करताच त्यावर तुटून पडणाऱ्या महिलांनो, इकडेही लक्ष द्या!!!

"श्रीरामसेने (पबमध्ये जाऊन दारू पिणार्‍या बायांना झोडणारे)>>>> Uhoh सिरीयसली???"

==> हे जरा लक्षपूर्वक वाचावे लागते. मी पट्कन "पबमध्ये जाऊन दारू पिऊन बाया झोडणारे" असे वाचून गार पडलो होतो. पुन्हा वाचल्यावर लक्षात आले. असो.

हो. हा मुतालिक आणि त्याची सेना यांनी हे स्वयंघोषित संकृती रक्षणाच्या नावाखाली बारबालांना हाणामारी करण्याचे हिडीस उद्योग केल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. सनातन, श्रीराम सेना आणि इतर अनेक जहालवादी छोट्या मोठ्या हिंदुत्ववादी संघटना एकाच माळेचे मणी आहेत. आणि एक मोठा संघ आणि त्याचा प्रणीत राजकीय पक्ष म्हणजे त्या माळेतला मुख्य धागा आहे. सगळे व्यवस्थितपणे ऑर्गनाइझ्ड होऊन काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर "दाभोळकर यांची हत्या करणारे सत्तेत बसले आहेत" हे तुषार गांधीचे कालचे उद्गार अर्थपूर्ण वाटतात:

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/killers-of...

वीस पंचवीस वर्षापूर्वी सनातन जेंव्हा सुरु झाली तेंव्हा त्यांचे मुखपत्र वाचूनच यांचे भविष्यातील इरादे नेक नाहीत हे साफसाफ जाणवत होते. त्याकाळात कोणी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. केवळ एक धार्मिक संघटना आणि एक वृत्तपत्र असे स्वरूप असलेल्या या संघटनेची आजवर सापडलेल्या पुराव्यांमुळे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे दहशतवादी संघटना अशी ओळख निर्माण झाली आहे. वीस वर्षात इतकी "प्रगती". अशाच पद्धतीने यांना काम करू दिले तर या प्रवृत्ती येत्या वीस-पंचवीस वर्षात देशात किती भयाण परिस्थिती निर्माण करू शकतील हे स्पष्ट आहे. यासाठी ह्या लोकांना आर्थिक पाठबळ कोणी दिले असावे हे पाहणे महत्वाचे ठरेल. मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय हे शक्य नाही. अफगाणिस्थान मध्ये तालिबान अशाच पद्धतीने सुरु झाली होती. तिचा एकाक्ष म्होरक्या "धार्मिक तत्ववेत्ता" अशी ओळख मिरवत होता. सध्या सनातनच्या म्होरक्याला तशाच प्रकारची ओळख आहे. त्यामुळे यांचा प्रवास ज्या दिशेने सुरु आहे ते गमतीचे नव्हे तर भयावह आहे. म्हणूनच सनातनच्या प्रमुखाला अटक करावी अशी मागणी विखेपाटलानी केली आहे ती रास्तच आहे:

http://www.esakal.com/mumbai/head-sanatan-sansthan-jayant-athavale-arres...

या मागणीला समविचारी धर्मनिरपेक्ष वृत्तींनी पाठींबा देणे देशहिताचेच ठरेल.

त्यांनी पांढऱ्या साड्या नेसाव्यात की रंगीबेरंगी बिकिनी घालाव्या हा सर्वस्वी त्यांचा विषय आहे>> त्यांनी काय घालाव हा त्यांचा प्रश्न आहे पण ते दृष्यवैशिष्ट्य म्हणून पांढर्‍या साड्या हा उल्लेख आहे. काय घाला किंवा घालू नका हा सल्ला नाही

यांनी हे स्वयंघोषित संकृती रक्षणाच्या नावाखाली बारबालांना हाणामारी करण्याचे हिडीस उद्योग के>>>>>>

करेक्शन, ते बारबाला ( ही टर्म बार मध्ये काम करणाऱ्या बायकांबद्दल वापरली जाते) ना झोडत नव्हते, तर पब मध्ये जाणाऱ्या ग्राहक बायकांना झोडपत होते.

या श्रीराम सेनेच्या मुतालिक ला भाजपा तर्फे निवडणुकीचे तिकीट सुद्धा दिले गेले होते, लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर उमेदवारी कॅन्सल केली.

दिलगिरी. बारबाला नव्हत्या त्या, पण नुलीना/स्त्रियांना मारहाण केली होती. तशा हेडलाईन्स होत्या त्या आठवल्या:

http://whazzupmangalore.blogspot.com/2009/01/attack-on-women-in-mangalor...

ज्याच्या हाती ससा तो पारधी, सनातन संस्थेला बदनाम करण्यात येत आहे, इतक्या वर्षांपासून ही संस्था निस्वार्थ भावनेने लोकसेवा करत आहे, हिंदू जनजागृती करत आहे त्याचे काहीच नाही!

@ अजिंक्यराव पाटील, अहो काहीही काय बोलताय???
1. गेली बारा वर्षे होळीच्या वेळी खडकवासला धरणावर रंग खेळून आलेल्या तरुणांना पाण्यात जाण्यापासून रोखतात हे लोक. लोकांना मजा करु देत नाहीत. शुद्ध पाण्यासाठी काय आजकाल R.O. असतातच. गेल्या बारा वर्षात किती जलतरणपटू तयार झाले असते.
2. काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत या सनातन वाद्यांनी लोकांना प्रथमोपचार दिले. कशाला? किती डॉक्टरांच्या रोजगारावर गदा आणली. आणि मेलीच असती काही माणसे तर चालले असते.
3. तिथे काश्मीर मध्ये जाऊन सैनिकांसाठी तणावमुक्त शिबीर का काय ते घेतात. चक्क लष्करास शिकवण्याचा आगावूपणा???
4. आझाद मैदान दंगलीच्या वेळी अमर जवान स्मारक तोडले, महिला पोलिसांचा विनयभंग केला असे आरोप करुन त्या दंगलीतील लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
5. ओम पंढरपुरी तंबाखू च्या पुडीवरील ॐ काढायला लावला या लोकांनी. का तर म्हणे, रिकामी पुडी टाकल्यावर ॐ कचर्‍यात जातो. विनाकारण त्या कंपनीला त्रास.
6. सरकारला निवेदने देऊन देऊन प्लॅस्टिक चे राष्ट्रध्वज बंद करायला लावले. कशाला??? कागद / कापडी ध्वजापेक्षा किती स्वस्त पडत होते. अजूनही हे लोक 15 ऑगस्ट / 26 जानेवारीला शाळांच्या बाहेर रिकामे खोके घेऊन असतात, खाली पडलेले राष्ट्रध्वज गोळा करत!! यांना तर रस्ते झाडायला दिले पाहिजेत!!!
7. एम. एफ. हुसेन सारख्या प्रख्यात चित्रकारावर जवळपास 1200 तक्रारी करुन त्याचे जिणे मुश्कील केले. का तर म्हणे, त्याने भारतमातेचे नग्न चित्र काढले. Its ok ना! खरोखर कलेची दृष्टीच नाही यांच्याकडे. किती चांगला चित्रकार गमावला आपण!
8. बालसंस्कार वर्ग घेऊन मुलांना काहीतरी outdated श्रावणबाळ, ध्रुव बाळ असल्या गोष्टी सांगतात, आई-बाबांना नमस्कार करावा, शिक्षकांचा आदर राखावा असलं काहीतरी शिकवतात. अहो जग कुठे चाललय आणि आपण काय करतोय याचं काही भान???
9. देवळं वगैरे पण झाडतात हे लोक. यांच्यामुळेच कित्येक सफाई कामगारांना रोजगार मिळत नाही.

खरंच आपण मीडियाचे खूप खूप आभार मानले पाहिजेत, यांचे हे असे वेडे चाळे आपल्याला न दाखवल्याबद्दल!

नसते उपद्व्याप करावेत कशाला माणसाने????
जीवन कसे पाहिजे?
चार लोकांना बोलावून उगाच देवावर टीका करावी, देवाला रिटायर करा अशी मागणी करावी. आपल्या खिशातील एक पैसा जात नसला तरी इतर जण पाळत असलेल्या वास्तूशास्त्राला फालतू वगैरे म्हणता आले पाहिजे. लोकांच्या श्रद्धास्थानाला ठेच पोहोचवता आली पाहिजे. भारतीय दंडविधान कलम 295 कालबाह्य आहे. ते रद्द करण्याची मागणी केली पाहिजे.

वाह वा... चला चला हिंदू राष्ट्र बनवू. धर्मांध राष्ट्र. मग काय अमेरिका किंवा गेला बाजार चीन येईलच हत्यारे वाटायला. जे सिरीया लिबिया अफगानिस्तान मध्ये झाले तेच भविष्य इंडिया चे. धर्मांध हातात तलवारी बंदुका घेऊन धर्मिक दहशत माजवत रस्त्या रस्त्याने फिरू देत. कुणी काय खावे काय परिधान करावे हे हे लोक ठरवणार. नाहीतर गोळ्या घालणार. नंगानाच सुरु होईल. वाताहत होईल. पण होईना का. काही लोकांचा स्वार्थ साधला कि झाले. बाकीचे मरेणात का. नाही का? आता हे सगळे महान कार्य साध्य करायचे म्हटले तर फुटकळ समाजकार्य केल्याची नौटंकी करावीच लागते ज्याची यादी सनातन समर्थकाने वर दिली आहेच. (बाय द वे हे सगळे "समाजकार्य"करायला हिंदुत्ववादी असण्याची काय गरज आहे ते मात्र त्यांनी सांगितलेले नाही. विसरले असावेत बहुतेक). या सगळ्या "महान" सामाजिक कार्यापुढे दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या (केवळ विरोधी विचारांची माणसे आहेत म्हणून) केलेल्या हत्या काय किंवा तब्बल पाचशे सर्वसामान्य मराठी पोरांची डोकी बिघडवून त्यांना दहशतवादी बनवून सोडले आहेत जे अद्याप सापडलेले नाहीत ते काय. किरकोळच नाही का?

Pages