स्फुट - गझलीयत

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 August, 2018 - 05:32

स्फुट - गझलीयत

एक कुंद सकाळ
मधेच उघडीप
मधेच रिपरिप

मुंबई औरंगाबाद नागपूर हायवे

चार चाके
चार कवी

ताशी 100 किमी च्या आतबाहेर धावणारी चाके
आणि दसपट वेगाने पळणारी मने !

विचारांच्या गर्दीच्या मानाने
वाहनांची तुरळक वर्दळ

वाहनांच्या चाहुलीने कान टवकारणार
रस्त्याच्या मध्यभागी
अपघातग्रस्त
मृतवत पडलेलं कुत्रं

त्या क्षीण हालचालीतील
जिवंत गझलीयत
दुर्लक्षून
मुशायरा गाजवायला निघालेले
आम्ही चार
संवेदनशील गझलकार !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users