जाहिरातीमधील गिजगा भात

Submitted by राजेश्री on 18 August, 2018 - 22:44

सातारा डायरी (१२)
जाहिरात :- गिजगा भात

सातारा हायवे वर एका हॉटेलच्या जाहिरातीचा बोर्ड आहे.लक्ष वेधण्याचे गमक फक्त आपल्यालाच सापडले आहे या ऐटीत त्यांनी एकूण तीन चार ठिकाणी हे फ्लेक्स लावले आहेत.एक बोर्ड सातारा हुन इस्लामपूरला येतान बोरगावनजीक आहे या फ्लेक्स वर लिहिलं आहे 'घरच्यासारखे जेवण फक्त दहा किमी अंतरावर पण पलीकडच्या बाजूला'. मुळात कसं सुचत याच्या उलट हे लिहायला कसं काय एवढं बळ येत हा प्रश्न आहे.मुळात घरी जाताना घाई असते.आणि जेवायला म्हणून हायवे बदलून ,पुलाच्या खाली उतरून कुणीही उलट्या बाजूला जायला तयार होणार नाही.पण या जाहिरात कर्त्याची अशी अपेक्षा आहे की हे वाचून कुणी ना कुणी तरी वाट वाकडी करेल.खरच धन्य धन्य ती अपेक्षा.आणि असा पलीकडच्या बाजूला जाणारा तर त्याहूनही धन्य.
दुसरा एक फ्लेक्स म्हणजे एक गंमतशीर नमुनाच आहे.कसं आहे ना,आपल्याला काहीही सुचेल पण हे सुचलेले अस फ्लेक्स वर लिहायला इतका आत्मविश्वास कुठून आणतात ही माणसं हा माझा प्रश्न आहे.फ्लेक्स वर लिहिल आहे 'घरासारखा गिजगा भात फक्त अमुक अमुक हॉटेलात'.गिजगा भात काय घरात ठरवून करतात का?घरातल्या भातात चुकून पाणी जास्त झालं तर तो बापडा गिजगा होतो.मग सांगणार कुणाला म्हणून आपण भात मुकाट्यांने गिळत असतो.गीजग्या भाताचे दोन फायदे असतात एक ज्याने/जिने कुणी भात गीजगा बनवला त्याला गिळ मुकाट्याने असं सांगावे लागत नाही कारण गिजगा भात चावावा लागत नाहीच.तो आपोआप घशात जातो.आणि हा भात खाताना खाऊ की गिळू नजर ज्याला म्हणतात ती या भाताने असा भात चावावा न लागल्याने साध्य होत असते.मला वाटत गिजगा भात आवडत असेल तर तो केवळ दातांना त्यांचे कष्ट वाचतात.
लहानपणी मला भात सरत नसला की भाताचे मुटके तयार करीत बसायचे हे इथे मला लिहिता लिहिता आठवलं.मग मम्मी म्हणायची तुला भात सरत नाही ते सांग ,खेळत बसू नकोस. जा उठ हात धू जा. मग मला तेवढंच पाहिजे असायचे. मग मी त्या भाताचे केलेले मुटके ताटात क्रमाने रचून ठेवलेलं असायचे आणि मग पा पा (खरंतर हा उच्चार वेगळा आहे पा मध्ये रा घालून एकत्रित जो उच्चार निर्माण होतो तो इथे लिहिता नाहीये)करीत कोंबड्यांना बोलवून त्यांना हा गिजगा भात मी खायला द्यायचे.त्या देखील आवडीने खायच्या. तर असो मूळ मुद्दा हा जाहिराती साठी वापरलेल्या संकल्पनेचा होता. त्या हॉटेल वाल्यांचे असे म्हणणे आहे की,आमच्या हॉटेलात घरच्यासारखा गिजगा भात खायला या...हे वाचल्यावर मी लय हसलो होतो.मग माझी मैत्रीण म्हणाली होती त्याला आवडत असेल गिजगा भात.. तुम्हाला असा गिजगा भात खायचा असेल तर तुम्ही जाऊ शकताय...पण स्वतःच्या जबाबदारीवर जाऊ शकता... नाहीच संपला तर ताटात मुटके करून ठेवा पण आधी बाहेर कोंबड्या आहेत का हे देखील बघा

©राजश्री

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात घरी जाताना घाई असते.आणि जेवायला म्हणून हायवे बदलून ,पुलाच्या खाली उतरून कुणीही उलट्या बाजूला जायला तयार होणार नाही.
>>> अहो तुम्ही घरी जातंय, सगळे नाही ना. तो रस्ता पुढे कुठेतरी जात असेलच ना, आणि शंभरातले 2 जरी थांबले त्याला फायदाच आहे ना.

@chraps

@chraps
मी घरी जाताना बोलले
सगळे नाहीत जात घरी माहीत आहे पण हायवे असल्यावर तो बदलून दुसऱ्या रस्त्याला जाणारा आणि पुन्हा वळून मागे येणारी व्यक्ती धन्यच अस म्हणायचंय मला

>>>मुळात कसं सुचतं कसं काय एवढं बळ येत हा प्रश्न आहे.>> अगदी अगदी Wink Proud
हापिसातून आल्यावरही आम्ही 40 मैल दूर फक्त दोन घास खायला जातो आणि घरी मऊ भात ठरवून करतो.

मस्त.
10 किलोमीटर उलट उतरून पब्लिक जेवायला येईल हा आशावाद दांडगा आहे.
'इतकं काय खास आहे बघू तरी' म्हणून येतही असतील

त्या जाहिरातीला अर्थ आहे ताई. कारण कमर्शिअल केटर र्स कि वा हॉटेलातून भात फडफडीत कोरडा करतात. आंध्रा मध्ये घरी फड फ डीत भात असतो तसा नव्हे. सोडा टाकून ही बनवतात. म्हणजे कमी सर्विम्ग मध्ये गिर्हाइकाचे पोट भरून जाते. कच्चा माल वाचतो. तसे हा हॉटेल वाला करत नसावा म्हणून त्याने अगत्या ने लिहीले असेल.

बिर्याणी हाताला चिकटते पण त्यात भरपूर अ‍ॅनिमल फॅट घातलेली असते. मौ भाताचा तांदूळही वेगळा असतो. जीरा राइस वाला चालणार नाही. तो ही तो प्रोक्युअर करत असेल. बाहेर सत त जे व णारे फड फडीत भाताला कं टाळलेले असतात. त्यात आमटी किंवा हॉटेली दाल
तडका घालून काल वले तरी मिळून येत नाही. आपला घरचा आमटी भात कसा मिळून येतो तसे होत नाही. त्यांना असे जेवण जरा घरगुती वाटेल.

साइडला गाडी पार्क करून रोड क्रॉस करून जाता येत असेलच की? का मध्ये डिवायडर आहे?

हायवे असल्यावर तो बदलून दुसऱ्या रस्त्याला जाणारा आणि पुन्हा वळून मागे येणारी व्यक्ती धन्यच अस म्हणायचंय मला>>>>>

मी आणि माझी बायको धन्य व्यक्तींमध्ये मोडतो.
हैद्राबाद हुन नागपूरला जाताना मध्ये निर्मल नावाचे गाव लागते. आणि ते नेमके जेवायच्या वेळी येते. तिथे एक मारवाडी भोजनालय आहे. ७-८ वर्षांपूर्वी नव्या हाय वे मुळे निर्मल हे गाव पूर्ण बायपास केले आहे, ते ही ८-१० किमी लांबून. पण मी अजूनही जेवायला गाडी तिकडेच वळवतो. अर्थात बायकोच्या संमतीने.

हैद्राबाद ते बंगलोरला सुद्धा हीच तऱ्हा आहे आमची. तिथे गुत्ती हे गाव बायपास केलंय, तिथे जातो.

केरळमध्ये तर खास करून, कुठल्या कुठे जातो जेवायला हाय वे सोडून.

@बन्या
हो पण ते एखाद्या हॉटेलची खासियत माहीत असते तेंव्हा जातातच ना

@मानव पृथ्वीकर
खरंच माझ्या मते तर धन्य धन्य आहात

@अमा
हो जाता येते रस्ता क्रॉस करून पण मागे वळून पुलाच्या खालून.

पण मी अजूनही जेवायला गाडी तिकडेच वळवतो. अर्थात बायकोच्या संमतीने.>> निर्मल चे पेंटिंग फार फेमस आहे. काळ्या बॅक ग्राउंड वर खास निर्मल शैलीतली चित्रे असतात तरुणी, फुले फळे इत्यादी. ह्याच्या वस्तू व कपडे टेबलक्लॉ थ वगैरे मिळतात.

हाताशी तगडी एस युव्ही किंवा चांगली कार असल्यास जेवणासाठी एक टर्न घेणे काही च नाही.

हायवे असल्यावर तो बदलून दुसऱ्या रस्त्याला जाणारा आणि पुन्हा वळून मागे येणारी व्यक्ती धन्यच अस म्हणायचंय मला>>>>>
मी पण धन्य कॅटॅगरीत येते...कुठे काही नवीन वेगळं दिसलं की आवडतच ट्राय करायला..
फूड ट्रॅवलींग करत फिरणारी मंडळी असं काहीतरी नवीन नक्कीच शोधत असतात.
त्यामुळे बोर्ड बघुन त्या माणसाकडे जाणारी लोकं असु शकतील....
बाकी गिजगा भात म्हणजे मऊ भात असा पण अर्थ निघतो...बाहेरचा फडफडीत भात न आवडणार्या लोकांना, किंवा सोबत लहान बाळ्,ज्ये.ना. असतील तर आणि घरच्यासारखा मऊ भात कुठे मिळणार असेल तर खातील की खास जाउन Happy

'घरच्यासारखे जेवण फक्त दहा किमी अंतरावर पण पलीकडच्या बाजूला'. मुळात कसं सुचत याच्या उलट हे लिहायला कसं काय एवढं बळ येत हा प्रश्न आहे.मुळात घरी जाताना घाई असते.आणि जेवायला म्हणून हायवे बदलून ,पुलाच्या खाली उतरून कुणीही उलट्या बाजूला जायला तयार होणार नाही.पण या जाहिरात कर्त्याची अशी अपेक्षा आहे की हे वाचून कुणी ना कुणी तरी वाट वाकडी करेल.खरच धन्य धन्य ती अपेक्षा.>>>

मला वाटतय टार्गेट पबलिक तिथे आसपास रहाणार नाहीच आहे . तुम्ही ते वाचून फक्त स्वतःपुरता विचार करताय का ?
हायवे वरून जाणार पब्लिक कित्येक दिवस घरापासून दुर असणार आहे. त्यांच्याकरीता बोर्ड आहे तो. मालकाचा टारगेट ग्रुप तो आहे. आसपासच्या गावातली लोक नव्हे. काहीच चुकीच किंवा धन्य अपेक्षा नाही आहे. उलट मालक हुशार आहे. तो लोकल लोकांच्यात फारसा इंटरएस्टेड नाही आहे .कारण असे येवून किती लोक येणार ? ट्रॅकवर आहे तो बरोबर.
Same goes with गिजगा भात. घरच जेवण म्हणजे मऊ भात. थोडक्यात कंफर्ट फुड. तो जे घरापासून लांब आहेत त्यांना ते ऑफर करतोय.

बोर्ड चुकीच्या दिशेने लावला गेला आहे का? किंवा आधीच लावायला पाहिजे होता म्हणजे आधीचे एक्झीट घेउन जाता आलं असतं अस काही आहे का?

हाटेलवाल्यांना असं लिहायचं बळ उगीच येत नसतं. फ्लेक्सला बोर्डाला पैसे लागतात. कुठलाही हाटेलवाला असं रात्री पदार्थ सुचला की सकाळी फ्लेक्स लावत नाही. एखाद्या हाटेलाची हळूहळू खासियत झालेली असते. तसा पदार्थ दुसरीकडे मिळत नसतो मग लोक आवर्जून मागतात मगच तो पदार्थ जाहिरात करायला सुरुवात होते. तिथल्या काही लोकांनी किंवा गिर्हायकांनी मागितला असेल तसा गिजगा भात, हॉतेलवाल्याने मग मोठ्या प्रमाणावर चालु केला असेल, मग तो खपवायसाठी जाहिरात. सिंपल आहे ते. सेम स्टोरी घरच्या खाण्याबद्दल.
मी तर "अस्सल चुलीवरची मिसळ" "भुश्स्याच्या शेगडीवरचे सावजी मटण" "चुलीवरची स्पेशल बाजार आमटी" "घरच्यासारखी कैरीची चटणी" "सुगरणीच्या हातचीच निखार्‍ञावरची भाकर" असे बोर्ड पाहिलेत. त्यात काय एवढे.

बाजार आमटी हा पंढरपुर, सांगोला, मंगळवेढा भागात मिळणारा पदार्थ आहे. सगळ्या भाज्या हळुवार आचेवर शिजवत रस्सा भाजी टाइप असते. गरगट्ट टाइप घट्ट नाही. पातळ असते. काही ढाबे ह्यासाठी फेमस आहेत.
सोलापूर भागात मिळणारी कडक भाकरी ह्यात कुस्करून खाल्ली जाते.