काॅमनं मॅन

Submitted by ashokkabade67@g... on 18 August, 2018 - 05:30

हे मायभुमी तुझ्या कुशीत जन्मलो मी तुला माझा शतशा प्रणाम.तुझाच पुत्र मी तुझ्या अंगाखांद्यावर वाढलो मी याचा मला आहे सार्थ अभिमान.नमण त्या प्रत्येक स्वातंत्र्यविराला ज्यानी तोडली तुझ्या पायातील गुलामीची बेडी ्रस्तात्यांच्या बलीदानाने होशील सुजलाम सुफलाम तु आशा होती त्यांना वेडी, सिमेवर शाहिद होणा-या प्रत्येक जवानांला माझा सलाम. आणि सलाम त्यांना ही जे झालेत व्यवस्थेचे गुलाम, तत्व सोडुन सत्तेसाठी जातात जे या पक्षातुन त्या पक्षात मुकाटपणे पहात असतो मी सत्तेची नशा त्यांच्या डोळ्यात, निवडणुकीच्या काळात जे करतात आरोपांची बरंसात आणि आश्वासनांची खैरात करीत मिळवतात सत्ता
आणि सत्ता हाती येता विसरतात आपली आश्वासने विसरला जातो मतदार विसरली जाते जनता.वसा ज्यांचा देशभक्तीचा बलिदान देऊन प्राणांचे जे महापुरुष झाले राजकारण्यांनी त्यांना ही आपल्या जातिजमातीत वाटुन घेतले, बळिराजा जो अन्नदाता जगाचा नेत्यांच्या आश्वासनाना भुलत राहीला अनादी अनंत काळापासून मातीचा पुत्र मातीतच गाडला गेला. आज ही होतो अन्याय आजही होतो अत्याचार मग जनता उतरते रस्त्यावर आणि सरकार करते गोळीबार. धर्माचे आम्हाला नाही पडले आम्ही सारेच जण रहातो गुण्यागोविंदाने पण नेते पेटवतात दंगे धर्माच्या नावाने. आणि अंगाची होते लाही लाही संताप येतो या साऱ्यांचा.पण मग आगतिकतेची जाणिव होते आणि मी पहातो दुसर्याच्याकडे तेही खाली घालतात मान कारण आम्ही सारेच आहोत काॅमन मॅन. काॅमन मॅन,

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नंद्या४३.. अहो विश्वास ठेवायला मन धजावत नाही, पण राजकारणी काय आणि बिगर राजकारणी 'कॉमनं मॅन' काय मुळात तत्वनिष्ठ माणसंच सापडणं मोठं दुर्मिळ झालं आहे ह्या जगात. पण जन्म मिळालाच आहे तर करावेच लागते अ‍ॅडजस्ट.