बुरसटलेली वाट

Submitted by अविनाश खरात on 15 August, 2018 - 07:20

====बुरसटलेली वाट====

"स्पर्धा परीक्षाच देणार होतास तर मग इंजिनियरिंग का केलंस...?"
या प्रश्नावर प्रामाणिकपणे उत्तरलेलं माझं मन.. Happy

====बुरसटलेली वाट====

वय वर्ष सतरा असेल जेव्हा कोणीतरी म्हटलं
"काय मग, बारावीनंतर पुढे काय...???" खरंतर प्रश्न तसा गंभीर होता पण..जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यातलं गांभीर्य कळण्या इतपत न माझं वय होतं न तितकी समज..!
आज विचार येतो की दहा वर्षांपूर्वीच माझ्या वयाचा विचार करून तितक्याच सामंजस्याने आणि साकल्याने कोणी या प्रश्नाची उकल माझ्यासमोर केली असती तर...? अर्थात असा विचार येतोय म्हणजे पश्चाताप वगैरे तसला काही प्रकार नाही बरं का... पण आपलं उगीच येतो विचार... Happy
खरंतर माझा निर्णय चुकला (so called तथाकथित समाजधारणे नुसार) ते बरेच झाले, एवढेच फक्त की कधितरी ऐकावं लागतं की,
"एवढा हुशार होतास तू , मार्क्स पण छान होते मग का नाही केलास वेगळा विचार..? का गेलास त्याच बुरसटलेल्या वाटेने..??"
आज संधी नाही किंवा तितकासा वाव नाही (हेही so called समाजधारणे नुसारच) म्हणून त्यांच्यासाठी ती बुरसटलेली वाट असेल कदाचित पण माझे विचार याबाबत काही औरच...
माझ्यासाठी म्हणाल तर ही वाट आणि या वाटेवरचा माझा प्रवास खूपच रम्य होता कारण या वाटेतल्या प्रत्येक वळणावर माझ्या सोबत होते माझे प्रिय 'मित्र' {अर्थात 'मैत्रिणी' सुद्धा Wink } अगदी जीवाला जीव देणारे !
हे जिवलग मित्र-मैत्रिणी हीच माझी या वाटेवरची अमूल्य अशी मिळकत मी समजतो. कारण त्यांची साथ त्यांचा तो सहवास माझ्या त्या निरस आयुष्याला बराच अर्थपूर्ण बनवून गेला, आयुष्याचे बरेच रंग मी त्यांच्यासोबत अगदी मनसोक्त पणे उधळले आणि उधळलेल्या याच रंगांनी माझे ही अंतरंग त्यात पार रंगुन निघाले..!
असं विविध रंगांनी ओतप्रोत भरलेलं माझं रंगीबेरंगी अंतरंग घेऊन मी कॉलेजातनं बाहेर पडलो.. त्या बुरसटलेल्या वाटेवरुन चालतच आणि सोबत घेऊन आलो हा आयुष्य भराचा अमूल्य बहुरंगी असा रंगांचा (मैत्रीचा) ठेवा..
यातला प्रत्येक रंग आजही आयुष्यातील प्रत्येक वळणावर माझी भक्कम साथ देतो, मी घेतलेल्या भल्या-बुऱ्या माझ्या सर्वच निर्णयांवर उत्स्फूर्त अशी दाद देतो आणि वाटलेच कधी भरकटतोय मी तर मदतीसाठी दिलेल्या माझ्या प्रत्येक सादेस तितक्याच कमालीचा प्रतिसाद ही देतो.
म्हणून पुढच्याच क्षणी पुन्हा मनात विचार येतो की बरेच झालं, नाही भेटलं कोणी दहा वर्षांपूर्वी असा करियर..संधी..पैसा..प्रतिष्ठा वगैरेचं गणित मांडून वाट दाखवणारा ( वाट लावणाराच तो..नाही का..? ) ज्या रम्य वाटेवरुन मी चालून आलोय त्या वाटेस बुरसटलेली वाट असं धादांत खोटं लेबल लावणारा...!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगलाच निर्णय घेतलात तुम्ही.
ज्या रम्य वाटेवरुन मी चालून आलोय त्या वाटेस बुरसटलेली वाट असं धादांत खोटं लेबल लावणारा...!>> असे धादांत खोटे लेबल लावून आपली पोळी भाजणारे सगळीकडे भेटतात. मायबोलीवर सुद्धा असे महाभाग आहेत.
तुम्ही अशा लोकांचे दात त्यांच्या घशात घातले हे बरेच झाले.

<<<मायबोलीवर सुद्धा असे महाभाग आहेत.>>>
आता मायबोली वाचून जर कुणि आपले निर्णय घेत असतील, तर धन्य त्यांची! काय बोलणार?
आणि मायबोलीवर लिहून कुणाची पोळी भाजत असेल तर एव्हाना मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस झालो असतो.