हरवणे

Submitted by शब्दरचना on 13 August, 2018 - 12:42

खुप शोधाशोध करतोय मी
मला मी सापडतच नाही
नक्की कुठे हरवलोय
मला ते आठवतच नाही

बोलण्यात तिच्या की
हसण्यात तिच्या
नक्की गुंतलो कशात
कि पुन्हा कधी सुटलोच नाही

पैंजणांच्या घुंगरांत तिच्या
शोधले पापण्यांत तिच्या
असा बुडालो डोळ्यांत तिच्या
कि पुन्हा उठलोच नाही

खरच खुप शोधाशोध करतोय
मला मी सापडतच नाही
नक्की कुठे हरवलोय
मला ते आठवतच नाही...!!!विषय: 
Group content visibility: 
Use group defaults