घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कामवाली साठी आम्ही काय करतो हे सार्वजनिक रित्या सांगणे मला चुकीचे वाटतेच, शिवाय त्या थापा असू शकतात असा समज झाल्यास त्याला जबाबदार मीच असेन.
Submitted by डागदार अड्डावाला on 17 August, 2018 - 13:06
<<

Lol

थापा!

कठीण शब्दांचे अर्थ :

Auto-parrot-ism : स्वतःचा पोपट करणे.
Auto-rubiri-fication : स्वतःची लाल करणे.
Tabelt-forget-ism : गोळ्या घ्यायला विसरणे.

अवांतराबद्दल क्षमक्स्व.

तेच म्हटलं उद्गारवाचक चिन्ह कसं नाही कडमडलं इथं अजून Lol
भारतमातेने इग्नोर करायला सांगितलंय ना ? आता घरात घेणार नाहीत तुला ते . बघ असा खोडी काढायला बघतोस आणि मग गालगुच्चा घेतला की बोंबाबोंब करतोस. तू म्हणजे ना भाजपच्या ट्रोल सारखा आहेस बघ. झेपत नाही तर गप्प बसावं Lol

अवांतराबद्दल क्षमक्स्व. >>> क्षमस्व असं लिही. आणि क्षमा का ?
तुला तुझ्या चुका कळाल्या, त्या तू कबूल केल्यास तर क्षमा का मागायची ? अभिनंदन तुझे. आता सुधारशील बघ तू.
Rofl
भारतमाता चिडेल आता.

<<आता चांगली परिस्थिती आहे. ..... उत्तम चालले आहे तिचे. मुलांना खाजगी इंग्लीश मेडीयमच्या शाळेत घातले आहे.>>
अरेरे. मग आता तुमच्या घरी कामाला कोण?
घरी कामाला नोकर नाही? तुमच्या इभ्रतीचे काय? लोक काय म्हणतील?
अहो "सीता भी यहाँ बदनाम हुवी".
तुमच्याबद्दल लोक म्हणतील - अगदीच कंजुष हो, शी:, स्वतःच काय घर साफ करतात? यांच्या कडे बाई टिकत नाही?! नवरा काही वेडेवाकडे वागतो बाईशी?
शिवाय भारतीय संस्कृती पार खड्ड्यात जाईल ना वरच्या वर्गानी ही कामे केली तर!! हे असेच चालू राहिले तर उद्या ऑफिसात वेळच्या वेळी जाल!

आमच्या कामवाल्या ताईला मी पण १०० रुपये जास्तीचे देते मी .. म्हणजे तिच्या हातात नाही तर तिच्या बँक अकाऊंट मधे. तिला पगारातुन १०० रुपये बाजुला टाकणे शक्य नव्हते म्हणून मग हा प्रकार सुरु केला.

हे तिच्या मेडिकल इमर्गन्सीसाठी आहेत हे निक्षुन सांगितलंय तिला.

१०० रुपयेमहिना ही फार मोठी रक्कम नाही याची जाणिव आहे पण मला हे एवढंच जमतं Happy तिला इतर घारातुन पण अशी मदत मिळाली तर बरं होईल असं मनापासुन वाटतं.

अर्थात आमची ताई चांगली आणि काळजी घेणारी आहे म्हणून मी करते.. अनूच्या बाईसारखी असती तर अजिबात काहीही केलं नसतं तिच्यासाठी (पुर्वीच्या बाईला मी घरातलं जेवण सुद्धा द्यायचे नाही. ज्यांना माज असतो अशांसाठी काही करु नये)

मला मनिमाऊचा टॉयलेट विषयी मुद्दा पटला.. कॉमन बाथरुम अवेलेबल असेल तर तीने माझ्या घरातलं वापरू नये, नसेल तर मी वापरते तसं वापरावं.
आमच्या बायकांना आम्ही टॉयलेट धुवायला सांगत नाही पण आमच्याकडे कॉमन बाथरून नाही त्यामुळे आम्ही वापरु देतो

वरती कोणी तरी ऑफिसातल्या टॉयलेटचं उदाहरण दिलंय - आमच्या बॉसच्या केबिन मधलं टॉयलेट आम्ही वापरत नाही Happy आमच्या सारख्या इतर कर्मचार्‍यांसाठी असलेलं टॉयलेट कॉमन टॉयलेट आम्ही वापरतो Happy हे ही तसंच आहे

मला एक सांगा उद्धट, व्यवस्थित काम न करणारी, न सांगता सुट्ट्या घेणारी, इकडच्या चाहड्या तिकडे करणारी, तुमच्या पर्सन स्पेस मधे ढवळाढवळ करणारी वगैरे मोलकरीण असेल तरी सुद्धा तुम्ही तीला जास्तीच्या सुट्ट्या, जास्तीचा पगार, बोनस, आजारपणातील सुट्ट्या किंवा वर लिहिलेली सगळीच चांगली वागणुक देता का?

तुमच्याकडे अशी मोलकरीण नसेल तर तुम्हाला इथल्या बर्‍याच तक्रारी कळणार नाही.
तुमच्याकडे अशी मोलकरीण असेल तर ती 'मोलकरीण'च रहायला हवी, तिला घरातल्या सारखे वगैरे ट्रिट करण्यात अर्थ नाहीये, त्यामुळे तुम्ही इतरांसारखे वागवत नसाल तर त्यात काही चुक नाही.
अशी मोलकरीण असुनही तुम्ही त्यांना सगळं देत असाल तर तुम्ही फार महान आहात , सगळे तसे नसतात आणि असु शकत नाहीत हे समजुन घ्या

नन्द्या ४३ Lol
त्या उद्गारवाचक चिन्हाला उपहास कळाला नाही तर अनर्थ होईल Lol

इथल्या सगळ्या गप्पा वाचून काल मी आमच्याकडे येणाऱ्या मावशीला विचारले की तुम्हाला महिना अंदाजे किती पगार येतो, अन तिने सांगितलेला आकडा ऐकून मलाच नवल वाटले. सकाळी ७.३0 ते दुपारी - संध्याकाळी साधारणतः ३.३० - ४.०० वाजेपर्यंत काम करून महिना ३०,००० च्या वर जातो तिचा पगार, वर नाष्टा अन दुपारचे जेवण शक्यतो कुठे न कुठे मिळते. आणि इतका पगार तिला दुसऱ्या नोकरीत मिळत नाही आणि म्हणून BA झालेली असून सुद्धा ती हे काम करते.

काल अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे तिला दोन मुले आहेत अन नवरा गेल्या वर्षी अपघातात गेला, मुले खूप लहान आहेत सासू आहे, त्यामुळे काहीतरी काम करणे गरजेचे असल्याने असे काम करते, पण तिने मुद्दाम काही घरी हे कळू दिले नाहीये की आता तिचा नवरा नाहीये अजूनही मंगळसूत्र घालून जाते सगळीकडे, नाहीतर काही घरच्या पुरुषयांची नजरच वखवखलेली असते
हे ऐकून खूप वाईट वाटले. मला कामवाल्या बायांची चीड येतेच पण न कळत माणूस म्हणून एक सहानभूती पण वाटली

VB >> तुम्ही सरासरी ४००० रूपये पगार देता का महिना ? कुठल्या शहरात ? कुठल्या भागात ?

आम्ही 1800 देतो, भांडी अन लादीला
खरेतर तिचे काम पाहता तेही जास्त वाटतात

वरचा आकडा तिनेच सांगितलाय, अन ज्या स्पीडने, भले काम नीट होवो न होवो ते करून ती पळते दुसरी कडे त्यात सकाळच्या 7 30 पासून दुपारी 4 पर्यंत मला ते अशक्य नाही वाटले

30000 कमवत असेल तर गुड फॉर हर. तेवढे डेडिकेशन ,वेळ आणि शारीरिक कष्ट आहेत.
त्याचा तिला योग्य मोबदला मिळो.

त्या वेळेत सात कामे होतील. चहा, नाश्ता, जेवण आणि एका घरातून दुसरीकडे जाण्याचा तासभर सोडून. सरासरी ४०००/- + व्हायला हवेत.

काही मुद्दे दोन्ही बाजूने

• मोलकरणीची जात विचारून कामावर ठेवणे
• काम देणाऱ्यांची जात विचारून त्यांच्याकडे काम करण्यास नकार देणे
• डब्बा, छत्री, फोन वगैरे असलेली कॅरिबॅग घरात, ओट्यापाशी आणू न देणे, बाहेर दरवाज्यात किंवा चपलांच्या रॅकवर ठेवायला लावणे
• त्यांचा चहाचा कप, खायला देतो ती भांडी वेगळी असणे
• आपल्या महागड्या सोफा, खुर्च्यांवर त्यांनी बसू नये अशी अपेक्षा
• १५ तारखेपासून ये बरं का कामाला म्हणून महिना अखेरीस १५ दिवसांचा पगार हातात ठेवणे
एकही सुट्टी घेतलेली नसताना
• महिन्यातून २ च सुट्ट्या ie २८-२९ दिवस कामाचे
• महिन्यातून १०-१२ सुटट्या झाल्यातरी पैसे कट करू नये अशी अपेक्षा
• आपल्या नेहमीच्या बाईने बुट्टी मारली कि दुसऱ्या बाईला बोलवून घेणे पण काम करून झाल्यावर लगेच पैसे न देणे
• सुटटे नसल्याने जास्त पैसे देऊन नंतर तू आणून दे सांगितले तर ते पैसे घेऊन गायब होणे
• दिवाळीला सगळा फराळ बनवून घेऊन मगच बोनस देणे
• दिवाळीची जास्तीची साफसफाई करून घेऊन मगच बोनस देणे
• कुठलातरी सण असेल, पाहुणे येणार असतील, घरातले सगळेच लवकर बाहेर जाणार असतील अशा काही कारणांसाठी बाईला अगदी पहाटे ६-६.३० ला बोलावणे आणि ती सकाळी पटपट आवरून डब्बा वगैरे घेऊन ६.३० ला पोचली तर यांचा काहीतरी प्लॅन बदललेला म्हणून सगळे डाराडूर झोपलेले. बाईला नेहमीच्या वेळेत ये म्हणून परत पाठवून दिले Angry
• स्वैपाकासाठी लावलेल्या बाईने त्याच पैशात ओटा चकाचक साफ करून देन्याची अपेक्षा
• नेहमीच्याच दराने पैसे देत असूनही दररोज सोफा, कॉर्नर टेबल पुढेमागे करून, सगळे कोपरे पूर्ण झाडूनपुसून घेण्याची अपेक्षा
• १०+ वयाच्या लोकांच्या चड्डया-ब्रादेखील बाईला धुवायला लावणे
• चादरी, पडदे असे जड कपडे बऱ्यापैकी नियमित धुवून घेणे
• नवीन रहायला आलेल्या कुटुंबाला ३००₹त सगळे घर साफ करून देतो, इथे तोच रेट आहे असे म्हणून फक्त झाडूफरशी, जाळी काढून देऊन पसार होणे
• आपले जुने पण चांगले असलेले कपडे, पर्स, नकली दागिने वगैरे देऊन दिवाळीच्या पूर्ण पगार बोनसला कल्टी मारायचा प्रयत्न

अजून लिहिते आठवेल तसे....े

VB +१ >>
पुणे- मुंबईत जर efficiently काम केले तर महिना २० - ३० हजार रुपये सहज निघतात.
मुंबईत वडलाकडे येणारी मदतनीस रोज रिक्षाने ये जा करते त्याचा खर्च दिवसा १०० रुपये आहे. सकाळी ७.३० ला काम चालु करुन ५ वाजे पर्यन्त काम करते. दुपारी पार्किंग लॉट मध्ये बसुन जेवण. दहा जणाकडे काम करुन तिचे ३० हजार सुटतात. (काही जणाकडे फक्त झाडु लादी, काही जणाकडे सगळी कामे, दोन ठिकाणी पोळ्या करुन देणे) . डायबिटिक पेशंट असुन तिचा औषधाचा खर्च स्वता काढते. १५ वर्ष झाली एकच मदतनीस आहे.
पिं-चि मध्ये रिक्षा परवडत नसल्याने आमच्या कडे एक घरकाम मदतनिस कडे कार होती. घरी 39" LED टिव्ही पण होता. दोन बेडरुम चा फ्लॅट भाड्याने घेतला होता. कामात एकदम फास्ट , कुणाकडेही जास्तीचे काम निघल्यास लगेच तयार. नवरा लग्नकार्यात मदतनिसाचे काम करायचा. मुलगी पण आमच्याच सोसायटी मध्ये घरकाम करायची. तिच्याकडे पॅन नंबर पण होता, स्वताचे बॅक account होते . ( गाडी घेण्यासाठी पॅन नंबर आम्हीच काढुन दिला होता) . दिड वर्षापुर्वी काम सोडले, गाडी ओला मध्ये लावली असे ऐकले नक्की माहित नाही. पुण्यात येण्यापुर्वी त्याची दोन भावात मिळुन ५ एकर शेती होती. २.५ एकर शेतात जेवढे कमवत होते त्यापेक्षा नक्कीच जास्त कमवतात.

हैद्राबाद कडे एक्स्प्लॉ यटेशन लेव्हल दोन्ही बाजूने जास्त आहे. रेड्डी वगिअरे बंगलेवाल्या लोकांच्यात चार पाच लोक असतात. स्वैपाकी. मालकिणीसाठी मेड वर कामाला मुली हरकाम्या माणूस वाहनचालक एक वा दोन. ह्यांना वेठ बिगार पद्दह्तीने वागवणे. तेलुगु ब्राम्हण घरात अतिश य कडक सोवळे ओवळे. मुस्लिम घरांमध्ये रिटेनर म्हातारे जास्त करून.

तिथे अगदी डाळिंबे सुद्धा सोलून घेणे, सर्व सर्व काम मोलकर णी ने च करणे. म्हणजे एक विचित्र उदाहरण लिहीते. आमच्या खालच्या मजल्यावर एक ज्वेलर फेमिलीतले निकम्मे कपल राहायचे पोरबाळ नाही व दोघांना सीव्ही अर डायबेटीस नवरा एकदम जरत्कारू अब गिरता की तब टाइप. प्रचंड औषधे वगैरे रोज. मालकिणीला मसाजिस्ट हे मारवाडी कपल. जन्मा ष्ट मी ला फक्त घर छान सज्वऊन पूजा वगैरे असे.
मला एक प्रकारे करुणा वा टा यची. पहिले त्याबाईंना चला बरो बरीने जिमला जाउ वगैरे विचारायचा आगाउ पुणेरी पणा करून बघितला होता.
पण ती इतकी ओबेस होती की शरीर धर्मांना पण मेडची मदत लागे. अर्थात आमच्या बाईनेच सांगितल्याने हादरा बसला होता. इतके आपण को णाव र अवलंबून राहायचे नाही जीवनात असा प्रण केला होता.

समोरचे अगरवाल बिहारी मारवा डी. अतो नात शो षण कर णारे. घरी मेड आली नाहीतर सीनीअर अगर वाल लेडी बिल्डिंग मागच्या बस्तीत जाउन हुडकून आणून कामाला लावायची. हिची सून पण तशीच व अतिश य रूड. मुलगी झाली तेव्हा एक बारकी पोरगी ठेवली होती तिला सांभाळ यला. तर एकदा आम्ही मुलांबरोबर गेले लो कुठेतरी तर ती बारकी दोन मिनिटे खुर्चीवर बसली. सर्व मुले पण बसली होती तर सून येउन जे डाफरली तिला. मलाच रडू येउ लागले. तिला पण एक आइसक्रीम घेउन दिले असते तर काय झाले असते? ही बारकी पुढे १४ -१५ वयात लग्न करून दिली व १६ वयात हुंड्यासाठी जळून गेली पण. पूर शामला रेस्ट हर सोल इन पीस.

कामवाल्या ची स्ट्रेटेजी अशी की धावुन धावुन काम करून मालकाला डिपेंडंट करायचे मग पैसे, सोने, जमीन घर अस्या डिमांड करायच्या.
दोन्ही क्डचा रूडनेस व स्वार्थि पणा एकदम काँप्लिमेंटरी. आय डिडंट वाँट टू बी अ पार्ट ऑफ ऑल दॅट सो ऑप्टेड आउट ऑफ द होल रॅकेट.

जेव्हा आईबा प म्हातारे व मुलगी लहान अशी वेळ होती तेव्हा म्हातारे व बाल दोघांचे शी सू साफ करणे जमीन पुसून घेणे इतर घरकाम स्वैपाक ही कामे महिनो महिने केली आहेत. आप ण लाइफ मधे अजून काही करू की नाही असे वैफल्य यायचे कधी कधी. पण ऑब्जे क्टिव्ह वॉज क्लिएअर. आता जीवनातल्या त्या फेजेस संपल्यावर हायसे वाट ते व कमी त्रासाचा सुटसुटीत आटोमेटेड कारभार बरा वाटतो.

<<<उद्गारवाचक चिन्हाला उपहास कळाला नाही >>>
बहुतेकांना कळत नाही. त्यापायी मी एक आय डी उडवून घेतली आहे! पण सवय जात नाही!
पण धन्यवाद.

• पाण्यात हार्पेक घालून त्याने फारशी पुसायला लावणे. ऍसिड असलेल्या पाण्यात हात घातल्याने नंतर दोन दिवस हातांची जळजळ होत असते आणि ती का होतेय हे त्या बाईलापण कळत नसतं
• रोज टेरेस धुवून घेणे. टेरेसमधे निरमा टाकून ठेवणे आणि बाईला न सांगणे म्हणजे ती पाय घसरून पडेल
• आमच्या सोसायटीमधल्या काही होममेकर बायकांनी एकत्र येऊन मेडचे रेट फिक्स करायचा प्रयत्न केला. एका चपातीसाठी २₹, फुलके असतील तर १.५₹, पराठे भाकरी असेल तर ५₹ वगैरे. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, त्यात असे रेट फिक्स करता येत नाहीत असे म्हणत पुरुषांनी तो प्रयत्न हाणून पडला.
• २००७-८ साली पुण्यात खानावळीचा एकवेळचा फुल डब्बा (४ चपाती, एक भाजी, डाळभात) महिना ६००₹ दराने मिळत होता. आमच्या युनायटेड स्टेट्स ऑफ पिंपळेमधे एका माणसाचा एक वेळचा स्वैपाक (३ चपाती,एक भाजी, डाळभात) करायलादेखील कुकने ६००₹च दर सांगायला चालू केला. परराज्यातले भरपूर लोक असल्याने त्यांना तो दर मिळालादेखील. पण आता झालाय असं कि दहा वर्षात बाकी कामाचे दर ३०० वरून ७०० झाले आणि स्वैपाकचे दर ६०० वरून ७०० झाले.
• शिक्षणनोकरीसाठी एकत्र राहणारे बॅचलर्स, चावी देऊन जाणारे अविवाहित पुरुष किंवा DINK यांच्याकडे काम करण्यास मोलकरणी शक्यतो उत्सुक असतात कारण कटकट कमी असते. त्रयस्थ-पांढरपेशा नजरेतून पाहिल्यास पहिल्या दोन केसेसमधे so called रिस्क वगैरे जास्त वाटू शकते पण तसे असतेच असे नाही.
• गावाहून रामागडी किंवा बाळाला सांभाळायला बाई/पौगंड मुलगी आणणे वगैरे प्रकार शक्यतो बिमारु राज्यातले लोक करतात. राहणे, खाणेपिणे, कपडे आणि वर ३.५ ते ५ हजार पगार असे काहीसे डील असायचे ७-८ वर्षांपूर्वी. सध्याचे माहित नाही.
• मागे एका प्रतिसादात कोणीतरी मोलकरणीची 'प्रकरणं'चा उल्लेख केला आहे. तर हे होत असतं. १४-१५ वर्षांची असताना लग्न लावून दिलं जातं,नंतर ४-५ वर्षात २-३ मुलं, बेवडा बिनकामचा नवरा, संसार एकहाती चालवत असतात या बायका. They have right to find love or atleast try finding it.
आणि हो आम्ही हाताला घट्टे पडेपर्यंत अभ्यास केला तेव्हा तुम्ही हुंदडत फिरत होता या समजुतीतून बाहेर या... जमलं तर!

<२००७-८ साली पुण्यात खानावळीचा एकवेळचा फुल डब्बा (४ चपाती, एक भाजी, डाळभात) महिना ६००₹ दराने मिळत होता. आमच्या युनायटेड स्टेट्स ऑफ पिंपळेमधे एका माणसाचा एक वेळचा स्वैपाक (३ चपाती,एक भाजी, डाळभात) करायलादेखील कुकने ६००₹च दर सांगायला चालू केला.> कुकच्या केसमध्ये कच्चा माल तुम्हीच पुरवताय. जागाही तुम्ही पुरवताय. तो वेळ आणि श्रम देतोय . पण त्याला इकॉनॉमीज ऑफ स्केल नाहीत. शिवाय तो तुम्हाला मेड टु ऑर्डर माल देतोय.

अभ्यास करून हाताला घट्टे पडतात हे नवीन आहे. असो.

काल दिलेल्या लिंकमधलं अपार्थाइड वाचलं का मंडळी? वेगळी लिफ्ट, खायला वेगळ्या प्लेट्स. घरगुती कामगारांनी हॅरी पॉटरमधल्या हाउस एल्व्हजसारखं अदृश्य राहून सेवा द्यावात, अशा अपेक्षा असतात का लोकांच्या?

बंगळूरला आमच्या घराजवळ एक एजन्सी आहे, जी मेड्स, ड्रायव्हर कुक इत्यादी पुरवते. कायदेशीर असावी. आपलं. ( लिखित) कॉंट्रॅक्ट एजन्सीशी. ती मेड पाठवणार. आपण पगार एजन्सीला द्यायचा. ती मेडला देणार. मेड आवडली नाही/ तिला आपण आवडलो नाही/ जमलं नाही तर एजन्सी दुसरी मेड पाठवणार. अशा कमाल ३ मेड ६ महिन्यात ती पाठवणार. ( मेडलाही कदाचित ३ घरांचं लिमिट असेल जमवून घेण्यासाठी). १ महिन्याचा पगार अॅडव्हान्स देऊन ठेवायचा आपण. शिवाय एजन्सीला आपण कमिशन देणारच.

' अडला हरी' म्हणून या एजन्सीचे पाय आम्ही धरले होते. एकेक तर्हा बघायला मिळाल्या. एजन्सीवाली बाई महा हुशार, निर्लज्ज आणि खोटारडी होती. ज्या मुलीला लहान मुलांना सांभाळायचा काडीचा अनुभव नाही, तिला २ वर्षांचा अनुभव आहे असं ठोकून देणे, मेड्सना व्याजी पैसे देऊन त्या बेसिसवर त्यांची अक्षरशः पिळवणूक करणे, मालकाने सुट्टीचे पैसे कापलेले नसतानाही मेडला देताना कापून देणे, अशा तिच्या अनेक लीला होत्या.
आमच्या घरी जी मुलगी ३ महिने या एजन्सीकडून आली होती, ती तशी चांगली होती कामाला. पण प्रचंड सिक्रेटिव्ह. पण तिची परिस्थितीच तशी होती. तेलगू होती. आई-वडील लहानपणीच गेलेले. मावशी काकांकडे वाढली. काकांनी या एजन्सीवाल्या बाईकडून उसने पैसे घेतले होते. त्या बदल्यात ही मुलगी काम करायची. आम्ही ९००० द्यायचो. पैकी ४००० व्याजापोटी जायचे म्हणे. ५००० काकांना परस्पर मिळायचे. हिच्या हातात काही नाही. मुद्दल जैसे थे. अशा परिस्थितीत तिने आमच्या इथल्या एका वॉचमनशी थोडं फार संधान जुळवलं होतं. तिचा दोष नाही, पण उद्या काही बरंवाईट झालं असतं तर?

नवे वेठबिगार Sad

मुंबईचं जसंजसं टॉवरीकरण होतंय, तसेतसे निन्म आर्थिक स्तरातले लोक मुंबईच्या बाहेर जायला लागलेत. काही वर्षांपूर्वी घरकामगार स्थानिक असत. सध्या अनेक घरकामगार विरार, नालासोपारा इथून येताना दिसतात.

बंगलोरला स्थानिक बायका कामाला मिळेनाशया झाल्या आहेत. सगळे बांगलादेशी घुसलेत especially नव्या टॉवर्स वसाहतीत. एकदा त्यांचा एकजण घुसला की ते कारटेलिंग करून स्थानिक मदतनीस ना हाकलून लावतात आणि सगळे बांगलादेशी घुसवतात.

एक्सप्लॉयटेशन बद्दल सहमत

माझ्या लांबच्या ओळखीत एक परिवार होता ज्यांनी त्यांच्या मेंटली चॅलेंज्ड (इंकपॅसिटटेड) मुलाचे लग्न त्याला सांभाळणाऱ्या मुलीशी लावून दिले. हे सांगताना, सांगणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल अपार आदरभाव असल्याचे जाणवले. जात वगैरे काही न बघता सरळ मोलकरणीशी तिला सोने वगैरे घालून लग्न केले. पण मला तेव्हा ते एक्सप्लॉयटेशन आहे असेच वाटले होते. नंतर काही वर्षांनी एक दिवस त्या मुलीनी घरातल्या घरात औषधे घेऊन स्वतःचा गर्भपात करायचा प्रयत्न केला. त्यावर "आम्ही तिच्यासाठी एवढे करूनही तिनी असा बाहेरख्यालीपणा केला" असे उद्गार काढले गेले.

मुले सांभाळायला शाळकरी मुली ठेवायचीदेखील पद्धत आहे. यावर, तसेही त्या शाळेत जात नाहीत. तेवढीच आई वडिलांना मदत. नाहीतर हे लोक मुली विकून टाकतात वगैरे कारणे लोक देतात. मुंबईसारख्या शहरात जिथे लहान घरं असतात तिथे या मुली स्वयंपाकघरात चटई टाकून झोपतात. आणि नेहमीच, त्या बाहेरपेक्षा श्रीमंत घरात सेफ असतात असे नाही. खरंतर अशा लहान मुली आणायचे एकच कारण आहे ते म्हणजे इतक्या स्वस्तात २४ तास दुसरे कुणीही काम करणार नाही.

२ बांगलादेशी बायका आमच्या सोसायटीतपण होत्या. पण सगळ्या कामवाल्यांना/ गाडी पुसणार्यांना/ फुलं आणून देणार्यांना आधार कार्डची फोटोकॉपी आणून द्यायची सक्ती केली. ज्यांनी आणून दिली नाही त्यांना सोसायटीत प्रवेश नाही. या सगळ्या फोटोकॉपीज पोलिस ठाण्यात नेऊन दिल्या.

इथे बरीच चर्चा झाल्याने आता डेलिया यांच्या मुद्दामून टाळलेल्या मुद्द्याला उत्तर देतो. मूळ चर्चा एम्लॉयर आणि एम्प्लॉयी अशी होती. तिला स्त्री विरुद्ध पुरूष असा फाटा फोडून आपल्या होमपिच वर आणून मुद्दे मांडणा-या पुरूषांना गप्प करण्याचा हा प्रयत्न वाटला त्यावेळी. मागच्या धाग्यावर मदतनीस म्हण़ए ठेका नाही वगैरे सगळे सांगितले होतेच. तर असो.

त्यांनी म्हटलेय की या डागदार अड्डावाला यांना काय माहीत वगैरे वगैरे >>> काहीही ठाऊक नसताना दुस-याला कसे जज्ज करता येऊ शकते ? माझ्या घरी मेडची यायची वेळ संध्याकाळी सहा नंतर कधीही आहे. माझी बायको दुपारी १ ते ४ घरी असते त्या वेळी क्वचितच ती येते. ती चुकली तर मग संध्याकाळी ६.३० नंतर कधीही ये असा पर्याय दिलेला आहे. तिची दोन लहान लेकरं असल्याने ती ४ वाजता घरी जाऊन येते. त्यामुळे माझ्याकडे येईपर्यंत साडेसात आठ होतात. त्यामुळे मोलकरीण म्हणजे काय हे मला माहीत नसण्याचे कारण नाही. उलट मला तिच्याकडून काम करवून घेताना ज्या अडचणी येतात त्या मागे कुठेतरी लिहीलेल्या आहेत.

मोलकरणींचा पगार ३०,००० /- पर्यंत श्रीमंत वस्त्यात असतो. आमच्या इकडे ७००/- कामाचा दर आहे. दोन कामं लावली कि १४००/- सरासरी होतात. त्यात पाऊण तास मोडतो. १२००० ते २०००० पर्यंत मिळवणा-या मोलकरणी ठाऊक आहेत. बायकोच्या बचत गटात यातल्या बहुतेक जणी आहेत. जिने खानावळ सुरू केली तीच २० हजार कमवत होती. आमच्या भागात इलेक्ट्रॉनिक्स च्या ब-याच कंपन्या आहेत. त्यांना असेम्ब्ली साठी मुली / बायका लागतात. बचत गटाला संपर्क साधून अशा गरजू बायका मिळवल्या जातात. या कंपन्या ८००० पासून पगार सुरू करतात . तो १५००० पर्यंत तीन चार वर्षात जातो. पण या बायका १२००० वरून ८००० वर खाली यायला तयार होतात. अशा कंपन्यात काम करायला त्या उत्सुक असतात.
काय कारण असेल याचे ?

दुसरा मुद्दा पुढच्या पोस्टमधे मांडतो.

समजा कंपन्यांनी कर्मचा-यांचे ऑडीट सुरू केले. टायपिस्टचे दिवसातून एकूण काम १ तास / २ तास /४ तास एव्हढेच आहे हे लक्षात आले.
स्टेनो चे एकूण काम ३ तास आहे / ऑफीस बॉयने आठच्या ठोक्याला येऊन एक तासात त्याचे काम उरकले तर चार कंपन्या मिळून
हे एम्प्लॉयी शेअर करू शकतील का ? असे चालेल का ?

Pages