घरगुती मदतनीसांसंबंधी चर्चा

Submitted by भरत. on 13 August, 2018 - 10:25

स्तनपानाचा धागा पेड मॅटर्निटी लीव्हकडे वळला. पेड मॅटर्निटी लीव्हवरील चर्चेचा धागा घरगुती मदतनीसांना देण्यात येणारा मोबदला, त्यांच्या सुट्या यांकडे वळला.
तर हा धागा त्या चर्चेसाठी.
हा धागा अन्य कुठे वळला, तर पुढे पाहू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजसी म्याडम अगदी खरं आहे. आता आपण जिथे कामाला जातो तिथल्या एम्प्लॉयरला ही हेच सांगायला हवं. कशाला आमच्यावर एव्हढा खर्च करता म्हणून..
बाकी सेवादाता म्हणजे काय, कॉण्ट्रॅक्ट म्हणजे काय, कामगार म्हणजे काय याचा उहापोह आधी केलेला आहे. तो फाट्यावर मारूनच मला वाटते म्हणून या सदराखाली तुम्ही, उपाशी बोका आणि इतर सर्व यांची जी चर्चा चालू आहे त्याला अनंतकाळासाठी शुभेच्छा !

मलाही कर भरायचे नाहीत, लीव्ह अ‍ॅण्ड लायसेन्स करार करायचा नाही. सरकार कोन ठरवणार माझ्या जिवावर ?

π,

हो The Help ची आठवण येणारच. Hidden Figures देखील पहा अजून पाहिला नसेल तर.

===
मानव,

> जरी मांडताना त्यांनी काहींना उद्देशून तो प्रश्न विचारला, जे माझ्यामते योग्य नाही. > "एम्पलॉयरने एम्पलॉयीला कायकाय सोयीसुविधा 'दिल्याच' पाहिजेत, त्या मिळणे हा कसा कामगाराचा 'हक्कच' आहे" हे जे आयडी लिहित होते त्यांनाच उद्देशून मी प्रश्न विचारला होता.
पण ठीक आहे यापुढे specific आयडीचा उल्लेख न करता more general प्रश्न विचारत जाईन/ तसा प्रयत्न करेन.

===
माझा उल्लेख केल्याबद्दल दोघांचे आभार Happy

माझ्याकडे कामवाली नव्हती, नाहीये Happy पण तरीही....

...थोडी उचलेगिरी सोडून द्यायची असते. >> हे वाचून आँऽ असे झाले. याचे स्वरुप वाढत गेले तर कोण जबाबदार?
सावधान इंडिया!!

घरातले बाथरूम वापरू देणे, फिल्टरचे प्यायचे पाणी प्यायला देणे या माणुसकीच्या गोष्टी आहेत. त्यात चर्चा करण्यासारखेही काही नाही. माझ्या घरातली सर्वांसाठी असलेली जी बाथरूमची शिस्त असेल ती पाळली जायला लागेल एवढे मात्र नक्की (इंडियन असेल तर तिथे ठेवलेल्या चपला वापरणे, पाणी टाकणे, बाहेर आल्यावर हातपाय धुणे वगैरे). अर्थात हल्ली बायकांना या सगळ्याची माहिती असते. मला तरी याबाबतीत कधी सांगावं लागलं नाही.
बायका घरात सगळीकडे केर काढतात, फरश्या पुस्तात, धुणी धुतात किंवा निदान वाळत तरी टाकतातच याने पुरेसे इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी वगैरे होतेच की. अजून बाथरूम वापरू देण्याने काय वेगळे इन्वेजन होते मला माहिती नाही.

मला अनूचे सगळे मुद्दे पटतायत.

महिन्यातून ठरलेल्या सुट्ट्या, रोजचे जेवण, बरे वाटत नसताना कामाला आली तर घरी जा किंवा अगदी मोजकी गरजेची कर, बाकी राहूदेत वगैरेला माझी कधीच हरकत नव्हती, नाही. माझ्या सफाईच्या कल्पनाही बेसिक आहेत त्यामुळे एखादा दिवस फरशी झाली नाही तरी मला मानसिक त्रास होत नाही.

ठरलेल्या वेळा, ठरलेली कामे, ठरवल्या पद्धतीने ठरलेली कामे, रोज काम शिकवावे न लागणे, रोज सगळी कामे केलीयेत का हे तिच्यामागे फिरून चेक करायची गरज नसणे, आयत्यावेळेला दांडी मारावी लागली तर किमान येत नसल्याचा फोन करणे आणि घरात नाक न खुपसणे इतक्याच अपेक्षा आहेत.

घरची बाई घरातच आहे (वफ्रॉहो फ्रीलान्सर) तर मग मारा तिच्याशी गप्पा, या हव्या त्या वेळेला हे माझ्याबाबतीत भरपूर झालेले आहे. आत्ता प्लीज मी जरा कामात आहे मला गप्पा नाही मारता येणार असे सांगितल्यावर आमची बेबी पण कॉम्प्युटरवर काम करते तुम्ही शिकवू नका मला असे बाणेदार तडाखे मी य वेळेला झेललेत.
याच बाईंना वेळेवर जेवायला मिळावे म्हणून मी स्वैपाक झाला की लगेच त्यातच जेवून घ्या. त्याचा पगाराशी संबंध नाही. असे सांगितले होते. त्यांचा कणकेचा अंदाज गंडलेला असायचा त्यामुळे रोज पोळ्या उरायच्या. तर ताज्या पोळ्या नवर्‍याला द्यायच्या डब्यात आणि त्यांच्या ताटात असायच्या. शिळ्याची जबाबदारी सर्वस्वी माझी होती. त्यांनी शिळे खावे अशी अपेक्षा नाही पण तिघे जेवणार तर शिळ्याचे ३ वाटे व्हायला हवेत या अपेक्षेत मला काही चूक वाटत नाही. पण ते कधी मी त्यांना सांगितले नाही. २ पोळ्या उरल्या असतील तर एक नवर्‍याच्या डब्यात देत जा असे सांगितल्यावर तिने मला जो काय अ‍ॅटिट्यूड दिला होता. आणि केलं कधीच नाही. ती जेवढे दिवस काम करायची त्यातले अर्धे दिवस तरी मी शिळ्या पोळ्याच खाल्ल्यात.

सध्या माझ्याकडे एकाही कामाला बाई नाही. परवडेल तेव्हा ठेवेनच. कामाची प्रचंड धामधुमी, सततचे प्रवास यामधे सगळी कामे स्वतःच करणे हे झेपण्यासारखे नाही. आणि दोनतीन वर्ष कामवालीशिवाय काढल्यावर हे मला आता नक्की पटलेय की भांडी, केर फरशी, रोजच्या पोळ्या बडवणे यात घालवायचा वेळ-एनर्जी मला खरंतर इतर काहीतरी कामात घालवणे जास्त आवडेल.

मी तत्व म्हणून कोणत्याही मेडला टॉयलेट धुवायला सांगत नाही. फक्त तिला पैशाची गरज आहे म्हणून मी आणि माझ्या कुटूंबाने वापरलेलं टॉयलेट तिने धुवायच हे मला पटत नाही. मी स्वतः दर 2 दिवसाआड आंघोळी आधी टॉयलेटस साफ करून घेते, तरीही मी मेडला घरातलं टॉयलेट वापरून द्यायचं का? दिलं तर ती volunteerly टॉयलेट धुणार आहे का? तर अजिबात नाही कारण ते तिच्या कामाच्या यादीत नाही आणि 'मी चांगल्या घरची आहे, परिस्थितीमुळे काम करते' हे रोज वेगळ्या कारणासाठी पालुपद असतंच.

अशा वेळेस, तिने बिल्डिंगमधील सिक्युरिटी आणि ड्रायव्हर्सच बाथरूम वापरावं ही अपेक्षा चूक आहे का? मी घरच्या दोन सदस्यांनी वापरलेलं टॉयलेट धुतेच की हे लॉजिक मला पटणार नाही. ती घरची नाही, रादर घरच्यासारखीही नाही. मी घरच्या लोकांचं टॉयलेट धुते, तेव्हा घरचे देखील न सांगता माझी कमी अधिक काम मनापासून प्रेमाने करत असतात. ते किती मेड्स करतात? काही अपवाद असतात. किंवा ईच्छा असेल तरी त्यांची एवढ्या घरी काम असतात की त्यांना एक जास्तीच काम करायला वेळच नसतो. त्यामुळे एकमेकांकडून माफक अपेक्षा ठेवूनच राहिलं तर कमी त्रास होतो.

मस्त मज्जा चालू आहे.
आपण आठ तास एखाद्या ठिकाणी काम करतो तिथल्या एम्प्लॉयरने तरी त्याच्या प्रॉपर्टीत, त्याच्या खर्चाने का म्हणून आपल्यासाठी टॉयलेट्स बांधावीत ? आपल्या घरातलं टॉयलेट मदतनिसाने वापरू नये अशी अपेक्षा असेल तर घर घेतानाच एक टॉयलेट एक्स्ट्रा घ्यायला हवे. कायद्यांची अंमलबजावणी चोख नसल्याने हे गृहीत धरले जात नाही. उद्या होऊ लागली तर बिल्डरला सुद्धा व्यवस्था करावी लागेल.

कित्येक सोसायट्यांमधे सर्व्हिस बाथरूम आणि टॉयलेट्सची चावी ही सुप्रवाइजर किंवा वॉचमेन कडे असते. सदनिकाधारकांकडे येणा-या जाणा-या साठी त्यांचा वापर करू दिला जात नाही. कॉण्ट्रॅक्ट वर येणारे स्वच्छता कामगार आणि सोसायटीसाठी काम करणारा स्टाफ यांनाही त्याचा वापर करता येतो. आमच्या इथे हीच पद्धत आहे.

आमच्या सोसायटीत बिल्डरनेच क्लबहाऊस मधे अतिरिक्त चार टॉयलेट्स आणि बाथरूम्स दिले आहेत (प्रत्येक हॉल ला अ‍ॅटॅच्ड आहेत ते वेगळे). त्याचा वापर इमर्जन्सी म्हणून करता येतो. सोसायटीने या सुविधेचा वापर आगंतुक आणि मदतनिसांना करू देण्यास संमती दिलेली आहे. ही सोय असूनही मेडला आपल्या टॉयलेटचा वापर करू देणारे लोक आहेत. पण आमची मेड जवळच राहत असल्याने प्रसंग आलेला नाही. शेजारी आठ तास मेड आहे. शेजारी तिला घरातल्या सुविधेचा वापर करू देतात. तेव्हढ्यासाठी तिने क्लबहाऊस पर्यंत चालत जाणे त्यांना योग्य वाटत नाही. आठ तास ड्युटी करून घेत असल्यास ही सुविधा द्यायलाच पाहीजे किंवा व्यवस्था लावून द्यायला हवी. मग ती कशी का असेना. त्यांचं त्यांनी पहावं असं म्हणणं असेल तर प्रश्नच मिटला.

अनु निधप ओव्हर all प्रतिसाद पटला,

तुम्ही, निधप, आणि बाकीच्यांनी सांगितलेले अनुभव इरीटेटिंग आहेतच. मी अशा प्रत्येक केस मध्ये बाई बरोबर आणि मालकीण चूक असे म्हणतोय असे वाटत असेल तर ते चूक आहे.

ML च्या धाग्यावर जसे भरत म्हणलेले “ यात चूक बरोबर याची सीमा आखता येणार नाही, आपण स्पेक्ट्रम वर कुठे आहोत , आणि कुठे जायचंय हा विचार प्रत्येकाने स्वत:शी करावा. दुसरी बाजू पहायचा प्रयत्न तरी लोकांनी करावा ” तसेच काहीसे मला वाटते.
प्रत्येक बाई ८ घरी काम कर्ते असे धरले तर तुम्ही तिचे फक्त १/८ इम्प्लोयर आहात.
तेव्हा तुम्ही दाखवलेल्या चांगुलपणाचा तिच्यावर होणारा परिणाम ८ने भागून होणार.

बायकांचा उर्मटपणा, भोचकपणा, जबरदस्ती संवाद साधायची वृत्ती, तुमच्याकडे काय केले ते बाहेर सांगणे आणि बाहेरचे तुम्हाला सांगणे हि सगळी त्यांची पब्लिक रिलेशन, सोशिअल मेडिया, सर्व्हायव्हल स्किल्स हे सगळे आहे. त्याच्या जोरावर त्या त्यांच्या परिस्थितीत टिकून आहेत, अन्यथा डीग्निफाईड, सोज्वळ वागायला कोणाला आवडणार नाही,

आमच्या घरी पाहुणे येणार असतील आणि काही पदार्थ (से पराठे) बनवून घेतले तर आमच्या बाई घराबाहेर पडल्यापडल्या समोरच्या घरातल्या बाई ला “आज अमुक अमुक पराठे केले, मस्त झालेत” म्हणून सांगतात ती त्यांच्या स्किल ची जाहिरात, लोकांकडून कौतुक हे सगळे असते, आई ची चिडचिड होते, बायको दुर्लक्ष करते, शेवटी आपण तरी FB वर पोस्टी टाकून काय करतो?

तुमच्या घरी “हातासरशी” कामे सांगत नाही हे कबूल, मात्र बाकीच्या ७/८ घरांमध्ये सांगितली जात नसतीलच याची खात्री तुम्ही कशी देता? तेव्हा त्या बाईने ७/८ मालकाच्या अनुभवावरून १/८ मालकाला (पक्षी तुम्हाला) नकार दिला तो पचवायला हवा.

वैयक्तिक स्वच्छतेचे वेगळे मापदंड, अगदी एका घरातील वेगळी पोटजात असणाऱ्या सासू सुना यावरून भांडतात, मग हि तर टोटल वेगळ्या सोशल क्लास मधली बाई दुसराच्या घरी काम करते आहे, तेव्हा ती ३ इंच पलीकडे झाडू फिरवत नाही कारण ती जागा स्वच्ह हवी हे तिलाच पटलेले नाही. तुम्हाला चमकता ओटा लागतो पण तिचे standard पोळपाट ठेवता येईल इतकी मोकळी जागा = स्वच्छ’ ओटा हेच असेल तर तिच्याकडून तुम्हाला अपेक्षित स्वच्छता पाळली जाईल हे कठीणच आहे नाही का?
पण मग ती करतेय ते काम खपवून घ्यावे का? अजिबात नाही, तिला कायम चांगल्या भाषेत समजावून सांगावे, काम monitor करावे, अगदीच पटत नसेल तर बाई बदलावी, आरारांचा या बद्दल चा प्रतिसाद to the पोइन्त आहे एकदम.

...................पण मी एकदा काम दिले कि ते monitor करायची काय गरज, तिने तिचे काम समजून ते करायला नको का? मी ऑफिसमध्ये नाही का करत? इत्यादी इत्यादी....
बाई, तुम्ही तुम्ही आहात आणि ती ती आहे, आपल्याच सोशल क्लास मधून आलेले , आपल्या इतकेच शिक्षण असलेले लोक ऑफिस मध्ये पाट्या टाकताना पाहतो ना आपण? आपल्याच टीम मध्ये असतील तर ते चालवून पण घेतो. मग सर्वस्वी कमतरतेची backग्राउंड असणाऱ्या बाईने पाट्या टाकल्या तर आपण इतके डिस्टर्ब का होतो? आपण मालक असतो म्हणून?

आम्ही त्यांना खूप काही काही देत असतोच, पण तरी त्या अश्या वागतात
mind you जुने कपडे, जुन्या वस्तू त्यांना देऊन त्यांच्यावर देऊन तुम्ही उपकार करत नाही आहात. तुम्ही तुमच्याकडची रद्दी कमी करत आहात. कामवाली ला दिले नाहीत तर जाऊन गुडविल india इंवा तत्सम कोणाला तरी द्यावे लागतील, कारण ते काढून टाकल्याशिवाय तुम्ही नवीन वस्तू विकत घेऊ शकत नाहि, हि घराच्या घरी जुने समान घेऊन जाणारी सर्विस तुम्हाला मिळते आहे.तेव्हा तुमच्या मजबुरी चा फायदा तुम्हाला मिळत नाही या बद्दल दुखी होऊ नका

बाकी स्वछातागृह वापरु देण्या बद्दल, (या बाबत निधप चा प्रतिसाद fact ला धरून वाटतो)
राजसी तुम्ही सरसकट सगळे जण २- ३ BHK मध्ये राहतायत असे गृहीत धरून बोलताय, १ BHK आणि कॉमन toilet नसणाऱ्या बिल्डींगमध्ये सुद्धा लोक राहतात हो.
परत इकडे प्रश्न तुम्ही देता कि नाही? , माझ्या सोसायटीने काय करायला हवे होते? हा नाही आहे,
स्वच्छतागृहाचा वापर घरगुती कामगारांचा हक्क आहे कि नाही हे मनाशी क्लीअर केले तर त्यावर आधारित stand आपल्याला घेता येईल. (परत एकदा याला चूक बरोबर असे उत्तर नाही)
असो ... पोस्त खूपच विस्कळीत झालीये नंतर जमली तर एडीट करतो

आमचं घरातलं टॉयलेट आमच्या कामवाल्या बाईंनी वापरलं तरी मला चालतं. ( त्या बाथरूम टॉयलेट आठवड्यातून दोनदा स्वच्छ करतात. जर मधे कधी मला वाटलं की खूपच अस्वच्छ आहे तर मी धुवून टाकते)
आधी जेव्हा मुलांना सांभाळायला ( आमच्या घरीच राहणारी) मुलगी होती तेव्हा आम्ही ( मोस्टली माझा नवरा) टॉयलेट स्वच्छ करायचो ( जे तीही वापरायची) . पण त्या बयेने कधीही स्वत:हून एकदाही हे काम केले नाही आणि तिच्या जॉब डिस्क्रिप्शनमधे जे काम बसत नाही ते करायला सांगितल्यावर तिची चिडचिड पाहिलेली असल्यामुळे आम्ही तिला सांगण्याचं डेअरिंग केलं नाही.
आमच्या सोसायटीतही कॉमन टॉयलेट्स आहेत. कामवाल्या बायका ती वापरतात ( ज्या घरांमध्ये चालत नसेल तिथल्या बायका) .

सिम्बा,
"अजिबात नाही, तिला कायम चांगल्या भाषेत समजावून सांगावे, काम monitor करावे"
हे करुन झालेले आहे.

मुख्य मुद्दा 'माझी बाई माझं ऐकत नाही/मी तिला कसं ट्रेन करु' हा नसून ज्या गोष्टींमध्ये अनेकदा ट्रेनिंग देऊन झालेलं असतं त्या अनेक+१ व्यादा न सांगता व्हाव्या अशी अपेक्षा असते. तुम्ही वरती 'कसं बाबा यांना इतकं काम करुन घेता येत नै' हा विचार करुन दिलेले सल्ले अलरेडी घरातली बाई अनुभवातून शिकते, काम सुधारुन घेतच असते.

म्हणजे मी घरात काही काम करतेय.किंवा घरात ऑफिस चे काम करतेय.तेव्हा ते काम सोडून कामवाल्या मावशी हा रोज घरात येणारा पाहुणा समजून मला रोज धावत स्वयंपाकघरात जाऊन 'तो बघा, तिथे टेबल खाली कचरा दिसतोय, प्लिज जरा साफ करणार का?' ही रेकॉर्ड वाजवावी लागू नये.

बाय द वे परत एकदा: इथे अन्यायाबद्दल जाण असणारे किती लोक बायांबरोबर प्रायमरी स्टेक होल्डर आणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून रोज काम करतात?अ‍ॅमी आणि भरत करत असावेत.त्यांना पास.बाकीचे?

('माझी बायको/आई डायरेक्ट इन्ट्रअ‍ॅक्ट करते ना, माझं लक्ष असतंच तिकडे' हे उत्तर फाऊल समजलं जाईल.)

दुसराच्या घरी काम करते आहे, तेव्हा ती ३ इंच पलीकडे झाडू फिरवत नाही कारण ती जागा स्वच्ह हवी हे तिलाच पटलेले नाही>> तिला पटण्याचा काय संबंध? तिच्या घरी तिने तिला पटेल ते करावं, माझ्या घरी मला पटेल ते.

मनिमाउंचं लॉजिक वाचून आपण ज्या ऑफिसात आठ तास असतो, तिथे टॉयलेटचं कसं करायचं हा प्रश्न पडला.

राजसी, मी बाबांसाठी बोलवलेल्या अटे़ंंडंटचं ते पहिलंच काम होतं. हॉस्पिटलमध्ये एक रात्र ठेवल्यावर अंदाज आला.
बाबांना नेमका दुसऱ्याच दिवशी डिस्चचार्ज मिळाला. त्याला आणि एजन्सीलाही सांगितलं की त्याला ट्रेनिंग मिळाल्याशिवाय कोणीही ठेवणार नाही. हे सगळं ( बेडरिडन माणसाचं करणं ) माझ्यासाठीही नवीनच होतं. नाहीतर मी शिकवलंही असतं. मला एजन्सीकडून दुसरा अटे़डंट मिळाला.

आपण आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांतून आपण कसं वागायचं याचा बार सेट करतोय का? एक स्टँडर्ड, दिला घांसाठी रीझनेबल बार ठरवून समोरच्याप्रमाणे तो वर खाली करता येईल का?
आपण वागतो ते रीझनेबलच आहे, असं प्रत्येकालाच वाटत असेल.
त्यासाठीच अशा धाग्यांचा प्रपंच.

बाय द वे परत एकदा: इथे अन्यायाबद्दल जाण असणारे किती लोक बायांबरोबर प्रायमरी स्टेक होल्डर आणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून रोज काम करतात?अ‍ॅमी आणि भरत करत असावेत.त्यांना पास.बाकीचे?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हा प्रश्नच फाउल समजला जावा,
गोराक्षांविरुध्ह तक्रार करणारे किती जन स्वत: याने अफेक्त झाले आहेत?
मुस्लिमांची बाजू घेऊन बोलणारे किती जन मुस्लिम आहेत ,
या प्रकारचा प्रश्न आहे हा

जावेचे मोठे घर आहे. त्यात गार्ड, ड्रायव्हर्स, कामवाल्या यांच्यांसाठी मागच्या अंगणात दोन भारतीय पद्धतीचे संडास बांधले आहेत.
घरात चपला काढायच्या जागेजवळ पण एक रेस्टरूम ( कमोड -बेसिन) आहे.
पण घरातले बाथरूम वापरले तरी चालेल. त्यांनाच कमोड आवडत नाही ही गोष्ट वेगळी.

आमच्याकडे तिन्ही बेडरूम ना ऍटॅच आहेत बाथरूम-टॉयलेट. घराच्या बाहेरचे सगळे गेस्टरूम वाले वापरतात. ड्रायव्हर, बाया, पाहुणे, मैत्रिणी, सुतार... इतर सगळेच
मला खरे तर बाथरूम वापरणे हा इश्यू असेल असे वाटले नव्हते. मागे एक मुलगी झाडणे-पुसणे करायला यायची. आमच्याकडून पुढे अजून एका ठिकाणी 3-4 तास काम करायची.

तर ती माझ्याकडून येताना आणि जाताना रोज न चुकता बाथरूम वापरायची.
मग लक्षात आले , वस्तीत कॉमन बाथरूम, आणि दुसऱ्या घरातील लोक वापरू देत नाहीत.
Around same time I watched that movie the help. Then I started observing who allows maids for washroom and realised.. very few ppl allow.
We don't have gated society. These are builder floors or bangalow. So common washroom for maids/ drivers is not present in entire Colony. Market has public urinals... For men.

But what abt maids. I see them eating lunches ( packed from home, or given by someone or from lunger) in public parks, resting in public parks..
But no place for toilet.

सिंबा,
हँडस ऑन किंवा ऑन जॉब अनुभव नसेल तर इश्यूज चे बारकावे कळणार का?
सेम अप्लाईज इव्हन टू गोरक्षण आणि मुस्लिम इश्यूज.

बाकी चांगल्या-वाईट दोन्ही पद्धतीच्या कामवाल्या अनुभवल्या आहेत.
आठवडाभर काम कसे करायचे हे सांगितल्यावर परत रोज सांगावे लागणाऱ्या बाईला कामावरून काढून टाकलेय. पलंगाखाली किंवा घरातल्या 1-2 कोपऱ्यात रोज नाही झाडले बाईने तर हल्ली चालते मला . पूर्वी वाटायचे सगळे काने-कोपरे, अडगळीच्या जागा रोज स्वच्छ व्हायला हव्यात. एकदा 2000 चौ फुटी घरात झाडणे-पुसणे 3 महिने स्वतःलाच करावे लागले. (बाईचे काम न आवडल्याने काढून टाकले होते तिला कामावरून) रोज 2 तास लागायचे हवे तशी स्वच्छता कारायला.
1500 रुपये महिना पगारात रोज 2 तास लावून घर स्वच्छ करणारी मिळू शकत नाही. त्या बाईलाच परवडणार नाही.

पण त्याच बरोबर न सांगता बुट्टी, ( आजारी असल्यास सकाळी तरी फोन करावा ही अपेक्षा आहे. सांगून महिन्यातून 2 ऐवजी 4-5 सुट्ट्या घेतल्या तरी चालते मला), खरकटी, डाग असलेली भांडी, झाडतानाचा कचरा मशीनच्या मागे, कॉटखाली ढकलणे, ओटा अगदीच सारवलेला असणे हे खपत नाही.
असे काम असेल तर बाई बदलते मी .

अगदी वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे सार्वजनिक धाग्यांवर विचारावीत का ? एक तर बरं दिसावं असं लिहीणारेही असतात. त्यामुळे थापा देखील मारल्या जाऊ शकतात. दुसरं म्हणजे आपण कुणासाठी काही करतो हे सांगणे जिवावर येऊ शकते. लोक मात्र आपत्तीच्या काळी मला मदत करायची आहे , कुठे करावी असे जाणूनबुजून विचारतात.

माझ्याच बाबतीत संध्याकाळी मी घरी असतो. आमच्या बाईला तीच वेळ जमते. मी पुरूष असल्याने तिच्या मागे फिरून काम करून घेणं मला शक्य नाही. विश्वास टा़कावा लागतो. चुका असतील तर दुस-या दिवशी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. नाहीच आली तर मी फोन न करता बायकोला फोन करायला सांगतो. या अडचणी देखील असतात.

कामवाली साठी आम्ही काय करतो हे सार्वजनिक रित्या सांगणे मला चुकीचे वाटतेच, शिवाय त्या थापा असू शकतात असा समज झाल्यास त्याला जबाबदार मीच असेन.

माझे मत असे आहे की अ व्यक्ती मेड शी कसा वागतो, ब कसा वागतो, क कसा वागतो हा धाग्याचा विषय नसायला पाहीजे. तर स्टँडर्ड काय असावे हा हवा आहे. त्यासाठी विविध देशातले कायदे काय आहेत हे पाहतोय. किमान शिक्षित व्यक्तींना हा उद्देश समजला असावा अशी आशा होती. आम्ही कसे ग्रेट आणि तुम्ही कसे भाबडे अशी चर्चा नाही होऊ शकत.

एकसमान नियम म्हणजे कायदे काय आहेत ? बरं जाऊ द्या ते. इग्नोर मारायचंय नाही का ? Lol
चालू द्या , चालू द्या.

स्टँडर्ड काय असावे हा हवा आहे

याबद्दल शंकाच नाही.
फक्त 'विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबलिटी' हे स्पायडरमॅनिय बोल अशी बेसिक पे/वीकली लीव्ह आणि बाकी सर्व स्टँडर्ड बनताना लक्षात घेतले जावे या मुद्द्यावर इथल्या बायका बोलत आहेत. (विषय थोडा साईड ट्रॅक झाला तरी मूळ मुद्दा तो आहे.)

स्टँडर्ड बनलेले आहेत फक्त ते अंमलात आणता येत नाहीत हा मुद्दा मी गेले दोन धागे पहिल्या पोस्ट पासून मांडतो आहे. एकतर कुणाला तो समजून घ्यायचा नाही किंवा ते माझे मत आहे असा समज सर्वांनी करून घेतला आहे. किमान रेडीमेड माहिती दिलीय तर वाचावी असे न करता इग्नोर करून उड्या मारून पुन्हा भोपळे चौकात जाण्याचा पराक्रम ही अनेक जण करत आहेत. आता पुन्हा त्या धाग्यावर जाऊन माझे प्रतिसाद क्रम लावून वाचावेत.

अनू+१
वावे +१

"अजिबात नाही, तिला कायम चांगल्या भाषेत समजावून सांगावे, काम monitor करावे"<<< किती ते मॅन्स्प्लेनिंग!!

जे काम (कामवाल्या बायकांना मॅनेज करणे) तुम्ही प्रत्यक्षात कधी केलेले नाही त्याबद्दल तेच काम १०-१५ वर्षे केलेल्यांना उपदेश करणे यामधे फाऊल दिसत नसेल तर मग विनोदच विनोद आहे.

बायकांचे मुद्दे चुकीचे आहेत. त्या स्वतः काम करत नसतील तरी घरातील कुणी ना कुणी कुठे तरी एम्प्लॉयी असेलच. तो काय सुविधा एम्प्लॉयर कडून घेतो त्या आपल्या एम्लॉयी ला आपण का द्यायच्या नाहीत हा प्रश्न आहे. ऑफीस मधे टॉयलेट वापरल्यावर आपण ते साफ करतो का ? घरात येणारे मदतनीस हे आपल्या दृष्टीने "घरी" येत असतील, मात्र त्यांच्या दृष्टीने ती "कामाची जागा" आहे. हा प्रतिसाद मला देजावू फीलिंग देतोय.

आपल्या घरात काम करून टॉयलेट साठी त्यांचा त्यांनी बंदोबस्त करावा असे म्हणणे किमान माणुसकीला धरून नाही. किंवा ही "सुविधा" वापरू "दिली" म्हणून त्या "बदल्यात" एखादे काम करावे... दुनियादारीपासून कोसो दूर असलेली विचारसरणी आहे ही. इथे स्त्री विरुद्ध पुरूष असा विषय दिसत असेल तर वेगळा धागा काढावा. आपण एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी याबद्दल बोलूयात.

आपल्या करीयर मधे यशस्वी होण्यासाठी सपोर्ट सिस्टीम हवी असेल तर किमान वेतन आणि किमान सुविधा देता आली पाहीजे. तशी सपोर्ट सिस्टीम परवडत नसेल तर ठेवू नये. मग करीयर मधेही कॉम्प्रोमाईज करावे. दुर्दैवाने आपल्या देशात लेबर स्वस्त आहे. असंघटीत आहे म्हणून आपल्या अंगवळणी ज्या गोष्टी पडल्या आहेत त्या चुकीच्या आहेत याची जाणीव आपल्याला नाही.

थोडं लाइट नोटवर - घरच्या पुरुषाने मेडच्या कामात जास्त लक्ष घालण्याचे साइड इफेक्ट्स पण असतील.

स्टँडर्डस हे फक्त एका बाजूने बनलेले आहेत. कामाच्या, कामावर येण्याच्या स्टॅण्डर्डसचे काय?
१ तासाच्या कामाला ८ तासाचा पगार द्यायला हवा हे स्टॅण्डर्ड असेल तर हा मोठा विनोद आहे.
बाकी कामवाल्या बायका हा अनऑर्गनाइज्ड सेक्टर व्यवस्थित ऑर्गनाइज्ड झाला तर इथे कुणाला नकोय?
पण त्याचे नियोजन करताना संघटना कामवाल्यांच्या गरजा, त्यांचे बेनिफिटस, त्यांच्या सोयी यापलिकडे जात नाहीत.
कामवाल्यांना काम देणारे लोक हे भरपूर नफा मिळवणारे उद्योगपतीच केवळ नसून लोअर मिडलक्लासपासूनचे लोक आहेत हे लक्षातच घेतले जात नाही यात.

१ तासाच्या कामाला ८ तासाचा पगार द्यायला हवा हे स्टॅण्डर्ड असेल तर हा मोठा विनोद आहे. >>> असे कुणी म्हटले आहे, रादर काय म्हटले आहे ते कॉपी पेस्ट करा. उगाच विपर्यास.

Pages