माझ्या आजीच्या कुशीत

Submitted by धनुर्धर on 13 August, 2018 - 00:46

माझ्या आजीच्या कुशीत
होता मायेचा उबारा
तोंडावरतून फिरे
तिचा हात तो कापरा

माझ्या आजीच्या कुशीत
होता स्वप्नांचा गाव
गोष्टीतून तिच्या
भेटे रंक आणि राव

माझ्या आजीच्या कुशीत
चांदोमामाची अंगाई
पेंगुळलेले डोळे
तोंडभरून जांभई

माझ्याआजीच्या कुशीत
नसे कसलीही भिती
तिच्या मायेच्या मिठीत
नीज सुखाने नांदती

माझ्या आजीच्या कुशीत
रात्र होत असे साजरी
ती नाही आज जरी
तिची आठवण उरी...

....धनुर्धर....

Group content visibility: 
Use group defaults

वाह! मस्तच!

माझ्याआजीच्या कुशीत
नसे कसलीही भिती>> लहानपण आठवले.