तिच्यासाठी

Submitted by विवेक मोकळ on 12 August, 2018 - 02:35

त्या पुरुषाच्या धाकात अडकली ती काळजीच्या चौकटीत,उंबरठ्याच्या नादात तिचे अवघे तारुण्य झिजले अंधारात, मला माहीतच नव्हता पुरुष सामर्थ्याचा हा उन्मत्तपणा...त्याच्या या गैरवर्तुणुकीत कित्येक फुललेल्या कळ्या सुकून गेल्या अगदीच आयुष्यातूनच उखडून गेल्या..
मनुष्या तुझा पुरुषार्थ तिनेच तर सांभाळला होतो,तुझ्या प्रत्येक अंधार वाटेवर तीच तर पणती म्हणून तुझ्या पायाखाली जळत होती, शेवटी तूच पेटवले वासनेपोटी
तिच्या सुंदर देह वातीला अखेर जळून केली तिची राख,पुरुषार्थाच्या गुर्मीत गुरगुरून माणसा झाला तू किती हरामी,कोण माई...कोण बहीण सारं काही विसरून अमाणुसकीने तूच जाळला ममता-मायेचा तो उबदार पदर....तेव्हा मात्र तिच्या नितळ प्रेमाचा मन तळ सारा गढूळ होऊन दलदली आयुष्य दारात अक्रोशांचा चिखल होतो....तसा ही तू रानटी श्वापद तिच्या देहावर नखे ओरबाडून नखांनीच तिच्या रक्ताचा एक एक घोट घोटतो ...
मला ही देता येत नव्हती तिला कोणती ग्वाही तिची आनंद सुखासाठी फुलेल तरी दिशा कोणती ...बस मला एवढंच समजत होतो निदान मन भरून रडण्यासाठी तरी तिचं आभाळ मोकळं करावं...जाता जाता एवढंच मला वाटते माझ्या मातीच्या देहात पांग न फेडत्या येणाऱ्या तिच्या अस्तित्वाच्या रुजलेल्या कवितांनी तिच्या आयुष्याला नव्याने फुलण्याची नवी संजिवनी मिळावी....
==================©विवेक मोकळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users