रस्ता आणि मी

Submitted by ashokkabade67@g... on 11 August, 2018 - 06:13

आताशा रस्ता ही अस्वस्थ होतो माझ्या सारखा एका हातात ‌‌‌कुठल्याही रंगाचा झेंडा आणि एका हातात दगड घेऊन रस्ता व्यापुन टाकणारा मानसाचा झुंड उरात धडकी भरते माझ्या आणि रस्त्याचयाही आणि मग आठवतात मागिल आठवणि चिमुरड्यांच्या बसवर झालेली दगडफेक भेदरलेली मुलं आणि रस्त्याला आठवतात त्याच्या अंगावर वाहिलेले रक्ताचे ओहोळ तर मला आठवत रस्त्यावर वहानारा दुधाचा महापुर आणि डोळ्यासमोर येतात ती कुपोषित मुले रस्त्याला आठवतो तो त्याच्या अंगावर फेकलेला भाजीपाला आणि मग दीसतात त्याला खपाटीला गेलेली उपाशी पोट तर पेटत्या टायर मुळे त्याच भाजलेले शंरीर पेटलेली दुकानं आणि जळणारी वहान अनावर झालेला जमाव आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मेलेली माणसं संताप येतो आम्हाला आमच्या नाकर्तेपणा चा‍ रस्ता ओसाड होतो आणि आम्ही दोघे एकमेकांच्या कुशीत आसवे गाळत झोपुन जातो कारण मी रस्त्यावर रहातो

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वा:! सुंदर लिहिलंय.

आम्ही दोघे एकमेकांच्या कुशीत आसवे गाळत झोपुन जातो कारण मी रस्त्यावर रहातो >>> शेवट अगदी हृदयस्पर्शी आहे. लिहीत रहा!

पूर्णविराम, स्वल्पविरामचं तेव्हढं पहा.