आई (शतशब्दकथा)

Submitted by धनुर्धर on 11 August, 2018 - 03:35

कडेवर लहान मुल, डाव्या हातात मोठ्या मुलाचा हात आणि पोटात भूक घेऊन ती कशीबशी पाय ओढत चालली होती. चार दिवस तिला कुठेही काम मिळाले नव्हते. भीकेतही पदरी निराशाच पडत होती."आयेऽ भूक लागलीना", हाताला धरलेलं पोरग करवादत होत. ती उत्तर देत नव्हती. शेवटी ती त्या हाॅटेल जवळ आली. क्षणभर विचार करूण तिने आत पाऊल टाकले. दात कोरायची काडी कानात घालून म्हातारा गल्ल्यावर बसला होता. दोनी मुलांना टेबलाजवळ बसवून ती समोरच्या खोलीत शिरली. "दोन आम्लेट पावऽऽ" अशी आरोळी टाकून म्हातारा गल्ल्यावरून उठून खोलीत गेला. धाडकन् दार आपटले. कडी लावल्याचा आवाज झाला.
खवळलेल्या भूकेसह ती मुले त्या आम्लेट पाववर तुटून पडली होती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काळीज चिरून गेली कथा. >>>> +१

कळल नाही.. >>>> मुलांची भुक शमवण्यासाठी स्वत:च्या सत्वाचा त्याग केला त्या माऊलीने Sad

Sad
७२ मैल एक प्रवास हा पिक्चर आठवला >>>+१११

_/\_