खेळू आयुष्य

Submitted by Asu on 10 August, 2018 - 01:20

खेळू आयुष्य

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

वयाची झूल फेकून देऊ
तारुण्य थोडे उधार घेऊ
जगणे जरा जिवंत करू
भय मरणाचे दूर सारू

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

चौपाटीवर जाऊ, भेळपुरी खाऊ
नाचू गाऊ, गोळा खाऊ
दंगा करू, मस्ती करू
पावसात पळू, रेतीत लोळू

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

थट्टा करू, मस्करी करू
बागेत जाऊ, घसरगुंडी घेऊ
खेळता खेळता कानात बोलू
हळूच बायकोला डोळा घालू

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

मळ्यात जाऊ, तळ्यात पोहू
झाडावर चढू, चिंचा काढू
गाडीत बसू, खूप खूप हसू
भांडण काढून, खोटे खोटे रुसू

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

नट्टा करू, पट्टा करू
सिनेमाला जाऊ, नाटक पाहू
माकड होऊ, सर्कशीत जाऊ
वाट्टेल ते गाऊ, पट्टेल ते लेवू

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

रात्र होता झूल घेऊ
घरी जाऊन झोपी जाऊ
तारुण्य पुन्हा उधार घेऊ
वयाची झूल फेकून देऊ

खेळू आयुष्य आनंदाने
रसभरल्या तारुण्याने

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults