ओढ

Submitted by पंकज२२८४ on 7 August, 2018 - 06:52

कसे सावरु सजना ,मन बावरे रे झाले
घेते हिंदोळे उंच,तुझ्या आठवांचे झूले

डोळे शोधती उगाच,तुझी सावळी सावली
भेट क्षणची करते ,चिंब डोळ्यांची बाहुली

तुझ्या एका भेटीसाठी,तुझी आतुर ही राधा
नाहि सोडवे तुला,तुझी जडली रे बाधा

वारा येऊन सांगतो,तुझी निरोपाची गाणी
रात सरता सरेना,तुझी जागीच ही राणी

सारे तुझ्यापाशी सुरु,सरे तुझ्यापाशी सारे
सख्या किती वाट पाहू,देह नुसता काहुरे

व्हावी उत्कट,आवेगी,तुझ्या करांची ती मिठी
रोज आठवेल मनी ,हसु येईल मग ओठी

बोटे करतात उगा ,केसांशि हां चाळा
कुणा कळेना , तप्त मनाच्या या झळा

सख्या भेट ना एकदा,खुप लागली तहान
व्हावे एकरूप माझे,तुझ्या प्राणाशि रे प्राण

Group content visibility: 
Public - accessible to all site users