माणुसकी स्पर्श

Submitted by विवेक मोकळ on 6 August, 2018 - 06:40

माणसातली माणुसकी करूनी नष्ट
अरे माणसा तूच आज होतोय भ्रष्ट,

जगवण्या नको करू कुठलेच कष्ट
उगाच नको समजू स्वतःलाच श्रेष्ठ,

माणसा वागला आहे तू खूप खाष्ट
म्हणून माझी लेखणी बोलतेय स्पष्ट,

माणुसकी जगवण्यास राहा तू एकनिष्ठ
म्हणून जोडतोय लेखनिशी संबंध घनिष्ठ,

तुझ्या अश्या वागण्याने तिची ममता सुटे
काळजातून प्रेमाचे एक सुंदर प्रतीक तुटे,

आता सोडून दे ती निरर्थक मतलबी वाट
वाहतील मग तेव्हा निस्वार्थी प्रेमाचे पाट,

आता येऊ दे घरला ती चिमुकली पाहुनी
फुलेल आनंद देणारी बाग तुझ्याच अंगणी,

आता करू देत तिला या जगण्याला स्पर्श
तेव्हा नक्कीच तुझ्या जीवनात येईल हर्ष...
===============©विवेक मोकळ
#art_by_me

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users