स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण...

Submitted by राजेश्री on 4 August, 2018 - 11:19

स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण....

मागच्या आठवड्यात आमच्या अधिकारिणी या व्हाट्स ऍप ग्रुप वर याच विषयावर आमची चांगलीच जुंपली होती.जुंपली म्हणजे साहजिकच तात्विक वाद आणि प्रतिवाद,ग्रुप वर एक फोटो पोस्ट share झाली त्या फोटोत युरोपियन संसदेतील एक महिला संसद सदस्य संसदेत आपलं मत मांडायला किंवा भाषण करायला उभ्या होत्या.आणि उभ्या उभ्या ,बोलता बोलता त्या आपल्या बाळाला अंगावर पाजत होत्या किंवा त्या आपल्या बाळाला स्तनपान करीत होत्या.कुणी खूपच छान अशी दाद दिली तर कुणी अंगठा वर करून आपली सहमती दर्शवली.त्या बद्दल एक msg आला त्यामध्ये म्हंटल की स्तनपान करविणे हा त्या आईचा आणि मुलाचा वैयक्तिक प्रश्न होता.तिला तिच्या मुलाला दूध पाजयच होत तर पाचेक मिनिटांचा प्रश्न होता ती कुठे दुसरीकडे(आडोश्याला)जाऊन बाळाला पाजून आली असती तर कुणी काही हरकत दर्शवली नसती.मला हे म्हणणं मांडणाऱ्या अधिकारिणी चे म्हणणे पटले आणि मी हो सहमत आहे अशी या प्रतिक्रियेवर माझा प्रतिसाद व्यक्त केला.मग या मताशी बिलकुल सहमत नसणाऱ्या इतर अधिकारिणी या प्रतिसादावर प्रतिवाद करायला सज्ज झाल्या.कुणी म्हणाले का ती जाईल बाहेर बाळाला दूध पाजायला .बाळ तीचे दूध तिचे ती ठरवेल बाळाला कधी आणि कुठे पाजायचे. मग मी मत मांडल एक सामाजिक शिष्टाचार किंवा आपल्या अवतीभोवतीची माणसांचा काही वैचारिक गोंधळ उडू नये किंवा मग एक awkwardness येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी अस मला वाटत.यावरही प्रति म्हणणं मांडल गेलं का?आपण का विचार करायचा या गोष्टीचा मला बाळाला दूध पाजायचे आहे मी आत जाते किंवा आता तुम्ही बाहेर जा असे का सांगू मी?माझ्या आजूबाजूचे ठरवतील ना काय करायचंय ते.थांबले तर थांबतील,त्यांना जाऊ वाटलं ते पांगतील. मला हे म्हणणं ,हा विचार नाही पटला मग मी म्हणाले स्तनपान हा आई आणि मुलाच्या अनुभूतीचा प्रश्न आहे.आई ज्यावेळी आपल्या मुलाला अंगावर पाजत असते त्यावेळी तिने आपल्या मुलाशी, त्याच्या भुकेशी ,त्याच्या त्या सुखाशी तादात्म्य पावणे अभिप्रेत असते.
आता हा लेख लिहिताना जेवढं आठवलं तेवढं आणि तस नाही आठवलं पण माझं हे मत किंवा विचार मी त्यावेळी दुसऱ्या शब्दात व्यक्त केले.त्यालाही झालाच विरोध,गर्दीमध्ये जिथे आईला कुठेच बाजूला जाणं शक्य नसते तिथे तिने खुशाल पाजावे बाळाला,शिवाय जी ती आई ठरवेल काय करायचं आईला आपल्या बाळाची भूक भागविणे महत्वाचं असते.किंवा आजूबाजूला गोंगाट असला की बाळ बावचळते,विचलित होते,स्वतःला अस्वस्थ करते त्यावेळी बाळाला अंगावर पाजणे हा त्याला स्थिर करण्याचा,त्याच्यासाठी आश्वासक परिस्थिती निर्माण करण्याचा चांगला उपाय आहे.असेही विचार मी ऐकले.मी या चर्चेतुन त्यावेळी हे म्हणून माघार घेतली की मला तुमच्या सर्वांच्या मताचा आदर आहे आणि माझं मत चुकीचे आहे असं मला अजूनही वाटत नाही.

स्त्रीत्व ही गोष्ट जगाला दाखविण्याची नाही तर ही एक अनुभूतीची गोष्ट आहे.त्यावर पुन्हा असे प्रतिवाद झाले की जाहिरातीत स्त्रियांचे अंतर्वस्त्र जाहिरात असेल आणि इतर कामुकता वाढविणाऱ्या इतर जाहिराती असतील तर याला का कधी विरोध होत नाही.सहज असेल किंवा मनाविरोधी असेल तरी अश्या गोष्टी का स्वीकारल्या जातात,बघितल्या जातात मग स्तनपान सर्वांसमोर केलं तर विरोध का?मी याला काही उत्तर नाही दिले मी त्या चर्चेतून माघार घेतली होती.

माझी जेंव्हा एखाद्या गोष्टीबद्दल, विचाराबद्दल मनाची द्विधा अवस्था निर्माण होते तेंव्हा माझं एक मन याच नेमकं उत्तर ,या गोष्टींबद्दल माझ्या मनाचा नेमका कल शोधण्याच्या पाठी असतं. एक सल मनाला सतत सलत असते.आणि मला स्वतःला त्याच नेमकं उत्तर हवं असत.आणि मला या बद्दल नेमके उत्तर मिळायला दोन गोष्टी/घटना अश्या घडल्या की माझ्या मनाने नेमके एक म्हणणं कोणत्याही अटी शर्तीशिवाय मान्य केलं.
पहिली घटना घडली ते स्थळ साताऱ्यातील शेंद्रे फाटा ,वेळ सायंकाळची आणि रस्त्यावर रहदारी होती.मी ज्या गाडीने प्रवास करीत होते ती गाडी होती आमच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकाऱ्यांची.ते सांगलीचे ते स्वतः गाडी चालवित होते.गाडीत मागे आणखी दोघेजण होते ज्यांना पेठ नाक्यावर उतरायचे होते.रहदारीतून संथ गाडी चालली होती.आणि आमच्या गाडीच्या पुढे एक बाईक होती नवरा बायको आणि लहान मुलं होत त्या गाडीवर.अचानक त्या बाईने आपल्या गर्दीने हैराण आणि रडवेल्या झालेल्या मुलाच्या तोंडात आपला पदर बाजूला सारून स्तन दिले. हे सगळं फक्त काही सेकंदात घडलं,आजूबाजूला सगळं पूर्वीसारख सुरू होत.गर्दी, गोंधळ,हॉर्नचे कर्ण कर्कश आवाज आणि त्यात माझं लक्ष वेधले होते त्यागर्दीत स्तनपान करविणार्या मातेकडे. रस्त्यावर बऱ्यापैकी खड्डे होते आणि ती बाई जराही विचलित न होता,स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत आपल्या मुलाला छातीशी कवटाळून स्तनपान देत होती.एक प्रकारे त्याला आश्वस्त करीत होती. तिचे वागणे त्यावेळी मला खूप सहज वाटले .आजूबाजूला,गाडीत पाहिलं मला या गोष्टीने कुणी विचलित झाले आहे अस नाही जाणवलं.ती स्त्री कष्टकरी होती.ती तिच्या वागण्याबद्दल यत्किंचितही गोंधळली नव्हती,ती संयंत होती.त्यांच्या गाडीला मागे खोरं आणि घम्याले पाटी अडकवली होती. आम्ही हायवेला लागलो पण ते दृश्य माझ्या मनातील द्विधा मनस्थितीला मात्र चांगलाच धडा शिकवून गेलं.मी मनातून पक्क ठरवलं की संसदेतील ती स्त्री आणि ही रस्त्यावरील कष्टकरी स्त्री दोघीही आजूबाजूच्या परिस्थिचा ,विचारांचा ,अवधानाचा,कुचेष्टेचा,अभिमानाचा,शाबासकीचा कोणत्याही चांगल्या किंवा वाईट विचारांचा विचार न करता त्या केवळ एक विचार करतायत तो म्हणजे मातृत्वाचा आपल्या बाळाच्या उदरभरणाचा.स्तनपान आडोश्याला केले पाहिजे असे काही नाही.ज्या ठिकाणी त्या आईला आपल्या मुलाला स्तनपान करावेसे वाटेल तिथे तिने तितक्याच सहजतेने खुशाल करावे.माझ्या मनातील किंतु परंतु नष्ट झालेच होते या घटनेने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला एक आणखी एक घटना कारणीभूत झाली.

ती म्हणजे आमच्या घरात अवचित अवतरलेली छोटीशी मणी.हे मांजराचे छोटेसे पिल्लू मम्मीला आणि मला पटकन आवडून गेले आणि तेही आमच्या घरात मोतीशी पंगा घेऊन,गरज पडली तर मला कस फुगता येत हे रागाने मोतीपुढे रागाने शेपटी फुलवून दाखवू लागलं.त्याचे काळेभोर केस आणि सोनेरी डोळे आम्हाला विशेष आवडून गेले.त्याच्या सोनेरी डोळ्यात लहान मुलांची निरागसता,व्याकुळता दिसत होती मला आणि स्पर्शाला आसुसलेले हे छोटंसं पिल्लू स्वतःहुन आपलं अंग माझ्या हाताला घासू लागत.त्याची आणखी एक खोड अशी की मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर हळुवार हात फिरवत बसलं की ते डोळे मिठून आपल्या पायाचे पुढचे पंजे फुलवीत आणि आकसत राहतं.त्यामुळे मग त्याच्या पंजाची नखे मला किंचितसी रुतत होती.मी मम्मीला दाखवलं बघ हे पायाची हालचाल कशी करते तर मम्मी उत्तरली हे लहान आहे ग अजून ते मनात आपली आई आपल्याला अंगावर दूध कशी पाजत होती ते आठवत असेल.ही पिल्ली अंगावर दूध पिताना आपल्या आईच्या पोटावर असा पंजा रुतवतात.मला हे ऐकून आमच्या मणीबद्दल जास्तच प्रेम दाटून आलं. आईवेगळ हे दूध पित छोटस पिल्लू आईला विसरलं नाही,तिचे स्तनपान विसरलं नाही. खरंच जगात भुकेशिवाय सुंदर अशी गोष्ट नाही.आणि स्तनपान हे केवळ कर्म नाही ते तर लहान मुलांचे उदरभरण आहे. आई आणि मुलं ठरवूदेत कसं ,कधी आणि कुठे स्तनपान करायचे.

अधिकारिणी या व्हाट्सएप ग्रुपवरील चित्रलेखा खातू-राणे, मिनाक्षी थोके-वाकडे,नूतन सावंत-पारधी व इतरही मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार या सगळ्या अधिकारिणी नव्या युगाच्या आणि नव्या विचारांच्या माता आहेत.आधुनिक विचारांच्या असल्या तरी आपल्या बाळांसाठी तितक्याच सजग आहेत.याच माझ्या मैत्रिणींनी मला स्तनपान या विषयावर विचार करायला भाग पाडले.त्यांचे मनपूर्वक आभार.

खरंच स्त्री विधात्याची सर्वात सुंदर कलाकृती.तिचे शरीर घडवीत असताना त्या विधात्याने किती सुंदर गोष्टी योजल्या आहेत.आपल्या बाळाचे पोषण त्या स्तनातून तर होते.जन्मास आलेलं प्रत्येक मुलं, ती स्त्री असो व पुरुष याच स्तनाला प्रथम बिलगून आपलं भूक भागविते या गोष्टीकडे सदा सर्वकाल बघताना एक निर्व्याज भावना आपल्या मनात अवतरली पाहिजे.स्त्रीच्या छबीचा वापर कित्येक उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी केली तरी स्त्री ही पोषणकर्ती आहे ही बाब विसरली नाही पाहिजे.प्रत्येक स्त्री कडे आदराने बघितले पाहिजे.शेवटी युगंधर मध्ये कृष्ण म्हणतो की,स्त्री ही कुणाची माता,पत्नी,भगिनी,प्रेयसी,भाभी,काकी,मामी,वहिनी आहे म्हणून केवळ वंदनीय नाही तर सर्वप्रथम स्त्री ही केवळ स्त्री आहे म्हणूनही वंदनीय आहे.मला वाटत अशी स्त्री आपल्या मुलाला स्तनपान करवित असते तेंव्हा तर जास्तच वंदनीय असते नाही का? उत्तर तुम्ही द्या...

||श्रीकृष्णार्पणमस्तू ||

© राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०३/०८/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती + 1.

काही प्रतिसाद बायकांचे खरच आहेत का प्रश्न पडतोय. रिकव्हरी काय आहे, डिलिव्हरी मधले त्रास, सी सेक्शन वाल्यांचे वेगळे त्रास, नॉर्मल पण जास्त टियर वाल्यांचे वेगळे त्रास, 3rd डिग्री, 4th डिग्री , incontinance प्रॉब्लेम्स... हे किमान बायकांना माहीत असायला हवे.
9 महिने शरीरातील बदल, झीज भरून काढायला 3 मंथ असायलाच हवेत.
आणि मोस्ट important हा वेळ newborn शी bonding साठी पण महत्वाचा आहे.

मी पाहिलेल्या देशांत बाळंतपण, दीर्घ आजार, अपघात, काम गेल्याने (राजिखुषीने सोडल्याने नाही) नविन काम मिळेपर्यंतचा काळ हे सगळं एकाच तागडीत तोलुन त्यावर सुट्टी आणि पगाराचा काही भाग (१००% अजिबात नाही, अप टू ५०-५५% ) मिळतो. पण तुम्ही कामावर आहात हे धरलं जातं आणि दीर्घ सेवेमुळे जे लाभ मिळतात की वेतनवाढ इ. त्याला तुम्ही पात्र असता.
व्हेकेशन डेज मध्ये बाळंतपण उरका हे मला क्रुर वाटलं.
च्रप्स +१ हे त्रास स्पेल आउट करुनही हे त्रास निम्नस्तरालाही होतात हे उत्तर अड्ड्यावर मला मिळालं. असो.

इथे लोकसंख्या नियंत्रणाचा उपाय म्हणुन मॅटर्निटी लीव्ह बंद करणे हा मुद्दा चर्चेला घेतला गेला. नंतर त्यातला फोलपणा दाखवून दिल्यानंतर लोकसंख्या नियंत्रण बाजूला पडले आणि कंपन्यांच्या आर्थिक हिताचा प्रश्न आला. आता काय तर इतरांना मिळणारी मॅटर्निटी लीव ज्यांना बाय चॉइस मुले नकोयत त्यांना न मिळण्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय पुढे आला! नक्की प्रॉब्लेम काय आहे? यालाच कोल्ड लॉजिक म्हणतात का? Happy

खरं सांगायचं तर माझे डोळे इथल्या चर्चा वाचून बरेच उघडले.
चित्र बदललं आहे वगैरे असं काहीतरी वाटत होतं ते भास दूर झाले.

आता निम्नवर्गाला मिळत नाही, पगारी लोकांच्या घरी काम करणार्‍या स्त्रीयांना मिळत नाही असा मुद्दा झालाय. त्यांना मिळत नाही, तर त्यांना मिळायला काय करता येईल ही चर्चा व्हायला हवी का ज्यांना मिळत्येय ती कशी चुकीची आहे/ गरजेची नाही ही?

आता निम्नवर्गाला मिळत नाही, पगारी लोकांच्या घरी काम करणार्‍या स्त्रीयांना मिळत नाही असा मुद्दा झालाय.

हा मुद्दा योग्यच आहे. अर्थात त्यांना कशी मिळेल यावर चर्चा व्हायला हवी.

इथे नव्हे, वेगळ्या धाग्यावर.

त्यांना मिळत नाही, तर त्यांना मिळायला काय करता येईल ही चर्चा व्हायला हवी का ज्यांना मिळत्येय ती कशी चुकीची आहे/ गरजेची नाही ही? >>> टोटली Happy हे सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे विशिष्ठ वर्गाचे चोचले असून त्यात काही दम नाही, हे लॉजिक लावायचे असेल तर दुष्काळग्रस्त विस्थापित लोक, वीटभट्टी ते वीटभट्टी कुटुंब फिरवत संसार हाकणार्‍या बायका यांच्यापुढे शहरातील मोलकरणीही सुखवस्तू वाटतील. आदिवासी वगैरेंना तर नोकर्‍याच नसतात, मग कसली मॅटर्निटी लीव्ह - तेथून सुरूवात करावी काय?

मॅटर्निटी लिव किंवा पॅरेंटल लिव जी आहे तीच्या कडे बघताना पुढील पिढीत केलेली गुंतवणूक म्हणून बघावे. यातुन अनेक गोष्टी खरे तर साध्य होतात. जन्म देणार्‍या स्त्रीचे शारीरीक आणि मानसिक आरोग्य, अर्भकाचे आरोग्य आणि निकोप वाढ ज्यात सुरवातेचे काही महिने हे खूप महत्वाचे असतात, मुल दत्तक घेतले असेल तर अजून वेगळे प्रश्न ही उद्भवू शकतात. त्याशिवाय मूल आणि पालक यामधील संबंध दृढ होणे, वाढत्या जबाबदारीतून येणारा ताणतणाव कमी होणे याचा दीर्घकालीन परीणाम बघता सशक्त समाज म्हणून हिताचेच आहे. अपत्य जन्मानंतर योग्य आधार खरे तर सर्वच थरातील पालकांना मिळायला हवा. तसा मिळत नाही ही खेदाची गोष्ट.

काही प्रतिसाद बायकांचे खरच आहेत का प्रश्न पडतोय. रिकव्हरी काय आहे, डिलिव्हरी मधले त्रास, सी सेक्शन वाल्यांचे वेगळे त्रास, नॉर्मल पण जास्त टियर वाल्यांचे वेगळे त्रास, 3rd डिग्री, 4th डिग्री , incontinance प्रॉब्लेम्स... हे किमान बायकांना माहीत असायला हवे.
9 महिने शरीरातील बदल, झीज भरून काढायला 3 मंथ असायलाच हवेत.
आणि मोस्ट important हा वेळ newborn शी bonding साठी पण महत्वाचा आहे.>>>>

अगदी सहमत.
बाकी कैच्याकै अवांतरं चालू आहेत इथे. Uhoh

मग काय ठरले?
मॅटर्निटी लीव्ह मिळावी म्हणून मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेतला जातो तेंव्हा ती सुट्टीच दिली नाही तर लग्गेच मुलेच जन्माला येणार नाहीत या मुद्द्यावर एकमत झाले का?
जे अतिशय श्रीमंत लोक आहेत, ज्यांना वर्षभर सुट्टीच असते, ते तर घालतीलच मुले जन्माला!

म्हणजे सिक लीव्ह बंद केली तर आपोआप कुणि आजारीच पडणार नाही! छानच की.

वर कुणि सक्तीची नसबंदी हा उपाय सुचवला होता. अज्ञ आहेत लोक. तो प्रयोग करून झाला आहे भारतात. फार गोंधळ वाढले. पुनः लोकसंख्या कमी झालीच नाही. फक्त सरकारचे बरेच पैसे काही डॉक्टर लोकांना नसबंदी न करताच फक्त केली असे कागदावर लिहून मिळाले. दंगली झाल्या. तश्या भारतात नेहेमीच दंगली करतात, अमेरिकेत बेसबॉल खेळतात, तिथे दंगल दंगल. तोड, मोड हाणामारी! लै धम्माल!

५० वर्षांवरील लोकांना वैद्यकीय सेवा न देता तसेच मरू द्यावे हा मुद्दा पण मांडला होता. त्याचे काय झाले?

भारतात खरे तर कुठलाहि कायदा आणला तरी काही फरक पडत नाही. लाचलुचपत, वशिला यांच्या जोरावर कुणालाहि काहीहि मिळते.
नसेल तर बँकेतले स्वतःचेच पैसे स्वतःला मिळत नाहीत!

Pages