स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण...

Submitted by राजेश्री on 4 August, 2018 - 11:19

स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण....

मागच्या आठवड्यात आमच्या अधिकारिणी या व्हाट्स ऍप ग्रुप वर याच विषयावर आमची चांगलीच जुंपली होती.जुंपली म्हणजे साहजिकच तात्विक वाद आणि प्रतिवाद,ग्रुप वर एक फोटो पोस्ट share झाली त्या फोटोत युरोपियन संसदेतील एक महिला संसद सदस्य संसदेत आपलं मत मांडायला किंवा भाषण करायला उभ्या होत्या.आणि उभ्या उभ्या ,बोलता बोलता त्या आपल्या बाळाला अंगावर पाजत होत्या किंवा त्या आपल्या बाळाला स्तनपान करीत होत्या.कुणी खूपच छान अशी दाद दिली तर कुणी अंगठा वर करून आपली सहमती दर्शवली.त्या बद्दल एक msg आला त्यामध्ये म्हंटल की स्तनपान करविणे हा त्या आईचा आणि मुलाचा वैयक्तिक प्रश्न होता.तिला तिच्या मुलाला दूध पाजयच होत तर पाचेक मिनिटांचा प्रश्न होता ती कुठे दुसरीकडे(आडोश्याला)जाऊन बाळाला पाजून आली असती तर कुणी काही हरकत दर्शवली नसती.मला हे म्हणणं मांडणाऱ्या अधिकारिणी चे म्हणणे पटले आणि मी हो सहमत आहे अशी या प्रतिक्रियेवर माझा प्रतिसाद व्यक्त केला.मग या मताशी बिलकुल सहमत नसणाऱ्या इतर अधिकारिणी या प्रतिसादावर प्रतिवाद करायला सज्ज झाल्या.कुणी म्हणाले का ती जाईल बाहेर बाळाला दूध पाजायला .बाळ तीचे दूध तिचे ती ठरवेल बाळाला कधी आणि कुठे पाजायचे. मग मी मत मांडल एक सामाजिक शिष्टाचार किंवा आपल्या अवतीभोवतीची माणसांचा काही वैचारिक गोंधळ उडू नये किंवा मग एक awkwardness येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी अस मला वाटत.यावरही प्रति म्हणणं मांडल गेलं का?आपण का विचार करायचा या गोष्टीचा मला बाळाला दूध पाजायचे आहे मी आत जाते किंवा आता तुम्ही बाहेर जा असे का सांगू मी?माझ्या आजूबाजूचे ठरवतील ना काय करायचंय ते.थांबले तर थांबतील,त्यांना जाऊ वाटलं ते पांगतील. मला हे म्हणणं ,हा विचार नाही पटला मग मी म्हणाले स्तनपान हा आई आणि मुलाच्या अनुभूतीचा प्रश्न आहे.आई ज्यावेळी आपल्या मुलाला अंगावर पाजत असते त्यावेळी तिने आपल्या मुलाशी, त्याच्या भुकेशी ,त्याच्या त्या सुखाशी तादात्म्य पावणे अभिप्रेत असते.
आता हा लेख लिहिताना जेवढं आठवलं तेवढं आणि तस नाही आठवलं पण माझं हे मत किंवा विचार मी त्यावेळी दुसऱ्या शब्दात व्यक्त केले.त्यालाही झालाच विरोध,गर्दीमध्ये जिथे आईला कुठेच बाजूला जाणं शक्य नसते तिथे तिने खुशाल पाजावे बाळाला,शिवाय जी ती आई ठरवेल काय करायचं आईला आपल्या बाळाची भूक भागविणे महत्वाचं असते.किंवा आजूबाजूला गोंगाट असला की बाळ बावचळते,विचलित होते,स्वतःला अस्वस्थ करते त्यावेळी बाळाला अंगावर पाजणे हा त्याला स्थिर करण्याचा,त्याच्यासाठी आश्वासक परिस्थिती निर्माण करण्याचा चांगला उपाय आहे.असेही विचार मी ऐकले.मी या चर्चेतुन त्यावेळी हे म्हणून माघार घेतली की मला तुमच्या सर्वांच्या मताचा आदर आहे आणि माझं मत चुकीचे आहे असं मला अजूनही वाटत नाही.

स्त्रीत्व ही गोष्ट जगाला दाखविण्याची नाही तर ही एक अनुभूतीची गोष्ट आहे.त्यावर पुन्हा असे प्रतिवाद झाले की जाहिरातीत स्त्रियांचे अंतर्वस्त्र जाहिरात असेल आणि इतर कामुकता वाढविणाऱ्या इतर जाहिराती असतील तर याला का कधी विरोध होत नाही.सहज असेल किंवा मनाविरोधी असेल तरी अश्या गोष्टी का स्वीकारल्या जातात,बघितल्या जातात मग स्तनपान सर्वांसमोर केलं तर विरोध का?मी याला काही उत्तर नाही दिले मी त्या चर्चेतून माघार घेतली होती.

माझी जेंव्हा एखाद्या गोष्टीबद्दल, विचाराबद्दल मनाची द्विधा अवस्था निर्माण होते तेंव्हा माझं एक मन याच नेमकं उत्तर ,या गोष्टींबद्दल माझ्या मनाचा नेमका कल शोधण्याच्या पाठी असतं. एक सल मनाला सतत सलत असते.आणि मला स्वतःला त्याच नेमकं उत्तर हवं असत.आणि मला या बद्दल नेमके उत्तर मिळायला दोन गोष्टी/घटना अश्या घडल्या की माझ्या मनाने नेमके एक म्हणणं कोणत्याही अटी शर्तीशिवाय मान्य केलं.
पहिली घटना घडली ते स्थळ साताऱ्यातील शेंद्रे फाटा ,वेळ सायंकाळची आणि रस्त्यावर रहदारी होती.मी ज्या गाडीने प्रवास करीत होते ती गाडी होती आमच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकाऱ्यांची.ते सांगलीचे ते स्वतः गाडी चालवित होते.गाडीत मागे आणखी दोघेजण होते ज्यांना पेठ नाक्यावर उतरायचे होते.रहदारीतून संथ गाडी चालली होती.आणि आमच्या गाडीच्या पुढे एक बाईक होती नवरा बायको आणि लहान मुलं होत त्या गाडीवर.अचानक त्या बाईने आपल्या गर्दीने हैराण आणि रडवेल्या झालेल्या मुलाच्या तोंडात आपला पदर बाजूला सारून स्तन दिले. हे सगळं फक्त काही सेकंदात घडलं,आजूबाजूला सगळं पूर्वीसारख सुरू होत.गर्दी, गोंधळ,हॉर्नचे कर्ण कर्कश आवाज आणि त्यात माझं लक्ष वेधले होते त्यागर्दीत स्तनपान करविणार्या मातेकडे. रस्त्यावर बऱ्यापैकी खड्डे होते आणि ती बाई जराही विचलित न होता,स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत आपल्या मुलाला छातीशी कवटाळून स्तनपान देत होती.एक प्रकारे त्याला आश्वस्त करीत होती. तिचे वागणे त्यावेळी मला खूप सहज वाटले .आजूबाजूला,गाडीत पाहिलं मला या गोष्टीने कुणी विचलित झाले आहे अस नाही जाणवलं.ती स्त्री कष्टकरी होती.ती तिच्या वागण्याबद्दल यत्किंचितही गोंधळली नव्हती,ती संयंत होती.त्यांच्या गाडीला मागे खोरं आणि घम्याले पाटी अडकवली होती. आम्ही हायवेला लागलो पण ते दृश्य माझ्या मनातील द्विधा मनस्थितीला मात्र चांगलाच धडा शिकवून गेलं.मी मनातून पक्क ठरवलं की संसदेतील ती स्त्री आणि ही रस्त्यावरील कष्टकरी स्त्री दोघीही आजूबाजूच्या परिस्थिचा ,विचारांचा ,अवधानाचा,कुचेष्टेचा,अभिमानाचा,शाबासकीचा कोणत्याही चांगल्या किंवा वाईट विचारांचा विचार न करता त्या केवळ एक विचार करतायत तो म्हणजे मातृत्वाचा आपल्या बाळाच्या उदरभरणाचा.स्तनपान आडोश्याला केले पाहिजे असे काही नाही.ज्या ठिकाणी त्या आईला आपल्या मुलाला स्तनपान करावेसे वाटेल तिथे तिने तितक्याच सहजतेने खुशाल करावे.माझ्या मनातील किंतु परंतु नष्ट झालेच होते या घटनेने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला एक आणखी एक घटना कारणीभूत झाली.

ती म्हणजे आमच्या घरात अवचित अवतरलेली छोटीशी मणी.हे मांजराचे छोटेसे पिल्लू मम्मीला आणि मला पटकन आवडून गेले आणि तेही आमच्या घरात मोतीशी पंगा घेऊन,गरज पडली तर मला कस फुगता येत हे रागाने मोतीपुढे रागाने शेपटी फुलवून दाखवू लागलं.त्याचे काळेभोर केस आणि सोनेरी डोळे आम्हाला विशेष आवडून गेले.त्याच्या सोनेरी डोळ्यात लहान मुलांची निरागसता,व्याकुळता दिसत होती मला आणि स्पर्शाला आसुसलेले हे छोटंसं पिल्लू स्वतःहुन आपलं अंग माझ्या हाताला घासू लागत.त्याची आणखी एक खोड अशी की मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर हळुवार हात फिरवत बसलं की ते डोळे मिठून आपल्या पायाचे पुढचे पंजे फुलवीत आणि आकसत राहतं.त्यामुळे मग त्याच्या पंजाची नखे मला किंचितसी रुतत होती.मी मम्मीला दाखवलं बघ हे पायाची हालचाल कशी करते तर मम्मी उत्तरली हे लहान आहे ग अजून ते मनात आपली आई आपल्याला अंगावर दूध कशी पाजत होती ते आठवत असेल.ही पिल्ली अंगावर दूध पिताना आपल्या आईच्या पोटावर असा पंजा रुतवतात.मला हे ऐकून आमच्या मणीबद्दल जास्तच प्रेम दाटून आलं. आईवेगळ हे दूध पित छोटस पिल्लू आईला विसरलं नाही,तिचे स्तनपान विसरलं नाही. खरंच जगात भुकेशिवाय सुंदर अशी गोष्ट नाही.आणि स्तनपान हे केवळ कर्म नाही ते तर लहान मुलांचे उदरभरण आहे. आई आणि मुलं ठरवूदेत कसं ,कधी आणि कुठे स्तनपान करायचे.

अधिकारिणी या व्हाट्सएप ग्रुपवरील चित्रलेखा खातू-राणे, मिनाक्षी थोके-वाकडे,नूतन सावंत-पारधी व इतरही मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार या सगळ्या अधिकारिणी नव्या युगाच्या आणि नव्या विचारांच्या माता आहेत.आधुनिक विचारांच्या असल्या तरी आपल्या बाळांसाठी तितक्याच सजग आहेत.याच माझ्या मैत्रिणींनी मला स्तनपान या विषयावर विचार करायला भाग पाडले.त्यांचे मनपूर्वक आभार.

खरंच स्त्री विधात्याची सर्वात सुंदर कलाकृती.तिचे शरीर घडवीत असताना त्या विधात्याने किती सुंदर गोष्टी योजल्या आहेत.आपल्या बाळाचे पोषण त्या स्तनातून तर होते.जन्मास आलेलं प्रत्येक मुलं, ती स्त्री असो व पुरुष याच स्तनाला प्रथम बिलगून आपलं भूक भागविते या गोष्टीकडे सदा सर्वकाल बघताना एक निर्व्याज भावना आपल्या मनात अवतरली पाहिजे.स्त्रीच्या छबीचा वापर कित्येक उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी केली तरी स्त्री ही पोषणकर्ती आहे ही बाब विसरली नाही पाहिजे.प्रत्येक स्त्री कडे आदराने बघितले पाहिजे.शेवटी युगंधर मध्ये कृष्ण म्हणतो की,स्त्री ही कुणाची माता,पत्नी,भगिनी,प्रेयसी,भाभी,काकी,मामी,वहिनी आहे म्हणून केवळ वंदनीय नाही तर सर्वप्रथम स्त्री ही केवळ स्त्री आहे म्हणूनही वंदनीय आहे.मला वाटत अशी स्त्री आपल्या मुलाला स्तनपान करवित असते तेंव्हा तर जास्तच वंदनीय असते नाही का? उत्तर तुम्ही द्या...

||श्रीकृष्णार्पणमस्तू ||

© राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०३/०८/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कधीकधी आयुष्यातले अनेक तास, नोकरीसाठी केलेल्या तडजोडी, भलता रोल अंगावर पडून वेगळी कामे करावी लागणे याच्या मानाने नोकरीने आपल्याला जास्त दिलेले नाहीये असा फील येतो>

हे सगळं करून सवरून झाल्यावरच बोलतोय मी. पर्सनल गोष्टी लिहायच्या नाहीत असं ठरवलेलं. पण ऐनवेळी ऑडिटर येणार म्हणून सुटी कॅन्सल करून परत जाणं, इततरांना सुटी हवी म्हणून जास्त वेळ थांबून त्यांच काम करणं, आपण सुटीवर असताना आपली कामं मात्र खोळंबून राहणं आणि इतकं झाल्यावर मोठ्या आजारपणात मेडिकल ऑफिसरकडे जाऊन ते सिद्ध करावं लागणं, त्याचवेळी इतर लोक परीक्षांसाठी, परदेशी जाण्याची तयारी म्हणून सुट्या घेताना पाहणं, या सगळ्यातून गेलोय.
पण मी (आणि अ‍ॅमी) इथे कोणताही पर्सनल, भावनिक, सामाजिक मुद्दा न घेता फक्त कोल्ड लॉजिकने प्रश्न विचारतोय.

समान कामासाठी समान लाभ यात पेड मॅटर्निटी लीव्ह बसत नाही. तुम्हाला तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा, असं म्हटलं तर हा प्रश्न येणार नाही.
लक्षात घ्या. मॅटर्निटी लीव्ह किंवा पेड मॅटर्निटी लीव्ह देऊच नका असं मी (अजूनपर्यंत) म्हटलेलं नाही.

याची दुसरी बाजू - एम्प्लॉयरकडून दिला जाणारा आरोग्य विमा हा अनेक ठिकाणी फक्त (लग्नाचा) जोडीदार आणि मुलांसाठी असतो. अन्य नातेवाईक (अनेक ठिकाणी डिपेंडंट आईवडील, भावंडे, थोडक्यात ज्यांची जबाबदारी आहे, अशी नातेवाईक असलेली किंवा नसलेली व्यक्ती यांचा समावेश असतोच असं नाही.

दोन्ही पालकांसाठी सारखीच पॅरंटल लीव्ह हे फक्त ऐकलं आहे. प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येत नाही.

कोल्ड लॉजिक ने वाद करण्याच्या बाबत माझा पास Happy
आयुष्यातले सगळे निर्णय ८०% भावना २०% डोकं वापरुन घेतले आहेत.काही चुकले काही बरोबर आले.नो रिग्रेटस.

अनु, मी आधीच लिहिलंय, इथे फक्त तात्त्विक चर्चा करतोय.

एक तत्व् म्हणून paid maternity leave समान कामासाठी समान वेतन +
या तत्त्वात बसत नाही, एवढंच सांगायचंय.

आमच्या इथे दोन्ही पालकांना मिळून 52 आठवडे सुट्टी मिळते. तुम्ही हवी तशी घ्या.
उत्पन्नमिळकत कर वजावटी आणि एकूणच स्ट्रक्चर जोडीदार ( लग्न गरजेचं नाही, कॉमन लॉ पार्टनर चालेल) आणि त्यातही मुलं असतील तर फेवरेबल असतात. मुलांचे खर्च वजावटीत जातात. कॅनडात तर युनिव्हर्सल चाईल्ड केअर बेंनिफिट मिळतो. सर्व पालकांना एक (करपात्र)रक्कम दर महिना मिळते. मुलं नसतील तर नाही मिळत. जी एस टी परत मिळण्याचं स्ट्रक्चर परत कुटुंबाच्या आकारावर अवलंबून असत. हे जन्मदर वाढावा मुलं जन्माला घालावी म्हणून काही प्रमाणात आहे हे मान्यच पण हे आर्ग्युमेंट साठी टोकाचं डिस्क्रिमीनेशन आहे.
दत्तक मूल घेतलं तरीही 52 आठवडे बॉंडिंगला सुट्टी मिळते.

यावा कॅनडा आपलाच आसा. Happy

अहो मग दीर्घ किंवा लघु अकस्मित आजारपणासाठीचे बेनिफिट ही समान काम मध्ये बसणार नाहीत.
प्रत्यक्ष कर भरला नाही/ कमी भरला तरी सरकारने काळं गोरं करायला हवं. कर भरला नाही... राज्य परिवहन बस मध्ये जागा मिळणार नाही. पार्क मध्ये घसरगुंडी वर चढा पण घसरायचं नाही.

>> यावा कॅनडा आपलाच आसा. Happy
आता अ‍ॅमी (आणि त्यांचं लॉजिक पटलेले भरत) म्हणतील , "खरंच, ज्या ज्या भारतीय वर्कींग महिलांनां पेड मॅटर्निटी लीव्ह हवी आहे त्यांनीं कॅनडात जाऊन मुलं जन्माला घालावीत; भारतात फार गर्दी आहे! एकतर मुलं जन्माला घालता येतील किंवा नोकरी करून पगार मिळवता येईल. दोन्ही जमायचं नाही , कारण पुरूषांनां मुलं जन्माला घालता येत नसल्यामुळे हा समसमान न्याय नाही ".

काही लोकांना विषय सोडून भलत्याच विषयावर चर्चा करायची आणि आपलेच घोडे दामटण्याची सवयच असते. कोण कुणाचा ड्युआय इ. चर्चा धागा काहीही असो, तिकडे करायचीच. फक्त तो ड्युआय आपल्या गोटातला असला की ओळखता येत नाही.
उदा. रावपाटील हा आयडी उदयन आहे हे ठाऊक नसणे.

पुन्हा लिहितोय - तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

यात कोणाला काय प्रॉब्लेम आहे?
आजारपण, अपघात कोणाला हवा असत नाही, ठरवून घेता येत नाही. तेव्हा ते यात घुसवू नका.

आणि इये देशी सिक लीव्हपण मर्यादित असते.

नोकरी देणारी कंपनी कल्याणकारी राज्यात आहे की कुठे? भारत कल्याणकारी नाही का? शिकून सवरून भारताच्या जीडीपी ला हातभार लावणार्‍या महिलांनां (मुलं काय गम्मत म्हणून एकटी बाई जन्माला घालत नाही) मुलं जन्माला घालण्याचा अधिकार बजावण्यासाठी नोकरीवर पाणी सोडण्याची गरज भासावी का कारण भारतात लोकसंख्या फार जास्त आहे? मुलं जन्माला घालणं ही चैन आहे का? तुम्हाला उद्या सर्दी ताप खोकला झाला तर तुम्ही बिनपगारी रजा घेता का?

अवरली वेजेस आणि सॅलरीड एम्प्लॉयमेन्ट ह्यातला फरक काय आहे? एम्प्लॉयर ला सॅलरीड एम्प्लॉइज् ठेवण्याची गरज का भासावी? तासाच्या हिशोबावर काम करून त्याची मोलमजूरी देणं बेस्ट !

>> तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,
यात कोणाला काय प्रॉब्लेम आहे?

ह्यात कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधीलकी नाही!
रोबॉट्स ठेवावेत त्यापेक्षा!! हाडामासाची माणसं तरी कशाला?

पुन्हा लिहितोय - तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

यात कोणाला काय प्रॉब्लेम आहे?
सध्यातरी हेमाशेपो.

अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा ---- युरोप-अमेरिका टूरला पगारी रजा घेऊन जाणे / घरांत सहा महिने लोळत पडून पुस्तके वाचणे आणि Maternity leave ह्यात फरक आहे.

मला वाटते टू बी फेअर मॅटर्निटी लीव्ह ६ महिने पगारी फेअर्/अनफेअर चा वेगळा धागा बनवून इथले प्रतीसाद त्यावर वळवावेत.

आता इथेच स्वतः निनावी राहून किंवा आपल्या मर्जीतल्या आयडींचे अस्तित्व गुप्त ठेवून इतर आयड्या कोण आहेत हा खेळ खेळणे योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू करू. किंवा नवा धागा काढत असाल तर तिकडे सुरू करू. विषय आणि चर्चेचा संबंध असायलाच पाहीजे असे नाही हे आमचा खड्डा कडून शिकण्यासारखे आहे.

मायबोलीवर चर्चा भरकटणे हे गुडलक आहे Happy
मी किती प्रयत्न करते माझ्या धाग्यांवर वाद करण्याचा किंवा चर्चा भरकटवण्याचा.पण मेले सरळमार्गीच राहतात.

@ भरत माझं म्हणणं तुम्हाला परस्पर विरोधी कसं वाटलं लक्षात आलं नाही.हा लेख मुळात लिहिण्याची प्रेरणा ही की संसदेतील स्त्रीने अस सर्वांसमोर स्तनपान करू नये हे माझं पूर्वीचे मत होतं.मग अश्या दोन घटना घडल्या की मी या विषयाकडे नैसर्गिक रित्या विचार करू लागले. संसदेतील स्त्री ज्यावेळी अस वागते म्हणजे ती त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे काम करते आणि गरज ही जर नैसर्गिक असेल तर त्यामागोमाग आलेली सहजता म्हणजे ती रस्त्यावर गाडीबर बसून दूध पाजणारी महिला.मला दोघीही त्या ठिकाणी योग्य वाटल्या.आणि स्त्रियांचा इतर ठिकाणी जाहिरातीत केलेला वापर बघता आपल्या लक्षात हे येत की जे नैसर्गिक नाही ते विकल जात.नैसरर्गिकता मात्र कायम अनमोल आहे.

{संसदेतील स्त्री ज्यावेळी अस वागते म्हणजे ती त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे काम करते}
तुम्ही 'बातमी' वाचलीत का?
मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात लिंक दिली आहे.
त्या बाई हा प्रश्न मांडण्यासाठी उभ्या होत्या किंवा त्यासाठीच त्यांनी असं केलं असं दिसत नाहीए.

त्या बाईंनी नैसर्गिक रित्या त्यांचं नाव पुकारलं गेल्यावर फार वेळ घालवून किंवा थोड्यावेळाने बोलु असं सांगून विषयाची लिंक न घालवता आहे त्या स्टेट मध्ये बोलणं प्रिफर केलं. हर चॉइस.

पुन्हा लिहितोय - तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

यात कोणाला काय प्रॉब्लेम आहे? >>>

यात बाळंतपणाची रजा इतर रजांसारखी employer discretion वर असू नये. वेगळ्या कॅटेगरीत असावी.

समान कामासाठी समान लाभ यात पेड मॅटर्निटी लीव्ह बसत नाही. >>> हे इन प्रिन्सिपल बरोबर आहे. पण एकूणच धोरणे कौटुंबिक गरजांच्या बाजूने झुकलेली असणे हे मला पटते आणि त्या दृष्टीने ही असमानता योग्य आहे. अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन, डायव्हर्सिटी हायरिंग मधेही अशी असमानता असते, आणि ती ही योग्य आहे.

आजारपण, अपघात कोणाला हवा असत नाही, ठरवून घेता येत नाही. तेव्हा ते यात घुसवू नका. >>> हे मान्य आहे. पण cold corporate culture च्या दृष्टीने जर पाहिले तर कर्मचार्‍याचे आजारपण ही कंपनीची जबाबदारी नाही. त्याबद्दल जेव्हा कन्सेशन दिले जाते तेव्हा 'समान' तत्त्वाला तेथेही अपवाद होतो. रजा कर्मचार्‍याच्या चॉईस ने आलेल्या गोष्टीमुळे आहे की नाही हा फॅक्टर कॉर्पोरेट लॉजिक ने नगण्य आहे.

किमान ६ महिन्याची मॅटर्निटी लिव्ह कंपल्सरी असावी पण ती भरपगारी असावी कि नाही हे ठरवण्याचा अधिकार कंपनीला असावेत किंवा बालसंगोपन हे LTD (long term disability) सारख्या सदरात आणून कंपन्यांना महिना ठराविक पगार देण्यास भाग पाडता येईल.

स्तनपान हे स्थलकालनिरपेक्ष बाळाच्या गरजेनुसार होणारी नैसर्गिक क्रिया आहे, त्यात सामाजिक संकेत, शिष्टाचार वगैरे आणण्याऐवजी लोकशिक्षण आवश्यक आहे. स्त्रीचा तो अवयव हा झाकून ठेवायचा असतो ह्या मानसिकतेतून आलेला हा एक विरोधाभास आहे.

मी किती प्रयत्न करते माझ्या धाग्यांवर वाद करण्याचा किंवा चर्चा भरकटवण्याचा.पण मेले सरळमार्गीच राहतात.
>>> प्रक्षोभक विषय पाहिजे. स्त्री vs पुरुष अशी चर्चा वळवता आली पाहिजे. जमेल तुम्हाला पण. Light 1

स्त्रीचा तो अवयव हा झाकून ठेवायचा असतो ह्या मानसिकतेतून आलेला हा एक विरोधाभास आहे.

स्पॉट ऑन. अंदमानातील जरावा समाजात असले डिबेट कदापि उद्भवणार नाही.

>>> तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

भरत, हे 'फॅमिली लीव्ह' अशा सदरात म्हणत असाल, तर एकवेळ मान्य. म्हणजे मग त्यात कोणत्याही कारणाने शारीरिक आणि/अथवा मानसिकदृष्ट्या आजारी वा परावलंबी असलेल्या/झालेल्या व्यक्तींसाठी किंवा तिची काळजी वाहणार्‍यांसाठी ठराविक मुदतीची भरपगारी रजा. ('एकवेळ' म्हटलं कारण मग एकदा मॅटर्निटी लीव्ह घेतलेल्या स्त्रीवर कोणाची काळजी घ्यायची वेळ आली तर तेव्हा तिने काय करायचं?)

पण मौजमजा करण्यासाठी घेण्यात येणारी 'व्हेकेशन' आणि ही रजा यात तुलना होऊ शकत नाही.

मॅटर्निटी हा चॉइस असला तरीही त्याचे शारीरिक / मानसिक परिणाम असतात, रिकव्हरी ही प्रोसेस असते - यात दुमत असेल असं वाटलं नव्हतं. असो.

भारतात लोकसंख्या जास्त आहे म्हणून बायकांना पीनलाइज करा, त्यांना रिकव्हरीला वेळ देऊ नका हे काय लॉजिक?

Pages