स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण...

Submitted by राजेश्री on 4 August, 2018 - 11:19

स्तनपान कर्म नोहे जाणिजे उदरभरण....

मागच्या आठवड्यात आमच्या अधिकारिणी या व्हाट्स ऍप ग्रुप वर याच विषयावर आमची चांगलीच जुंपली होती.जुंपली म्हणजे साहजिकच तात्विक वाद आणि प्रतिवाद,ग्रुप वर एक फोटो पोस्ट share झाली त्या फोटोत युरोपियन संसदेतील एक महिला संसद सदस्य संसदेत आपलं मत मांडायला किंवा भाषण करायला उभ्या होत्या.आणि उभ्या उभ्या ,बोलता बोलता त्या आपल्या बाळाला अंगावर पाजत होत्या किंवा त्या आपल्या बाळाला स्तनपान करीत होत्या.कुणी खूपच छान अशी दाद दिली तर कुणी अंगठा वर करून आपली सहमती दर्शवली.त्या बद्दल एक msg आला त्यामध्ये म्हंटल की स्तनपान करविणे हा त्या आईचा आणि मुलाचा वैयक्तिक प्रश्न होता.तिला तिच्या मुलाला दूध पाजयच होत तर पाचेक मिनिटांचा प्रश्न होता ती कुठे दुसरीकडे(आडोश्याला)जाऊन बाळाला पाजून आली असती तर कुणी काही हरकत दर्शवली नसती.मला हे म्हणणं मांडणाऱ्या अधिकारिणी चे म्हणणे पटले आणि मी हो सहमत आहे अशी या प्रतिक्रियेवर माझा प्रतिसाद व्यक्त केला.मग या मताशी बिलकुल सहमत नसणाऱ्या इतर अधिकारिणी या प्रतिसादावर प्रतिवाद करायला सज्ज झाल्या.कुणी म्हणाले का ती जाईल बाहेर बाळाला दूध पाजायला .बाळ तीचे दूध तिचे ती ठरवेल बाळाला कधी आणि कुठे पाजायचे. मग मी मत मांडल एक सामाजिक शिष्टाचार किंवा आपल्या अवतीभोवतीची माणसांचा काही वैचारिक गोंधळ उडू नये किंवा मग एक awkwardness येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी अस मला वाटत.यावरही प्रति म्हणणं मांडल गेलं का?आपण का विचार करायचा या गोष्टीचा मला बाळाला दूध पाजायचे आहे मी आत जाते किंवा आता तुम्ही बाहेर जा असे का सांगू मी?माझ्या आजूबाजूचे ठरवतील ना काय करायचंय ते.थांबले तर थांबतील,त्यांना जाऊ वाटलं ते पांगतील. मला हे म्हणणं ,हा विचार नाही पटला मग मी म्हणाले स्तनपान हा आई आणि मुलाच्या अनुभूतीचा प्रश्न आहे.आई ज्यावेळी आपल्या मुलाला अंगावर पाजत असते त्यावेळी तिने आपल्या मुलाशी, त्याच्या भुकेशी ,त्याच्या त्या सुखाशी तादात्म्य पावणे अभिप्रेत असते.
आता हा लेख लिहिताना जेवढं आठवलं तेवढं आणि तस नाही आठवलं पण माझं हे मत किंवा विचार मी त्यावेळी दुसऱ्या शब्दात व्यक्त केले.त्यालाही झालाच विरोध,गर्दीमध्ये जिथे आईला कुठेच बाजूला जाणं शक्य नसते तिथे तिने खुशाल पाजावे बाळाला,शिवाय जी ती आई ठरवेल काय करायचं आईला आपल्या बाळाची भूक भागविणे महत्वाचं असते.किंवा आजूबाजूला गोंगाट असला की बाळ बावचळते,विचलित होते,स्वतःला अस्वस्थ करते त्यावेळी बाळाला अंगावर पाजणे हा त्याला स्थिर करण्याचा,त्याच्यासाठी आश्वासक परिस्थिती निर्माण करण्याचा चांगला उपाय आहे.असेही विचार मी ऐकले.मी या चर्चेतुन त्यावेळी हे म्हणून माघार घेतली की मला तुमच्या सर्वांच्या मताचा आदर आहे आणि माझं मत चुकीचे आहे असं मला अजूनही वाटत नाही.

स्त्रीत्व ही गोष्ट जगाला दाखविण्याची नाही तर ही एक अनुभूतीची गोष्ट आहे.त्यावर पुन्हा असे प्रतिवाद झाले की जाहिरातीत स्त्रियांचे अंतर्वस्त्र जाहिरात असेल आणि इतर कामुकता वाढविणाऱ्या इतर जाहिराती असतील तर याला का कधी विरोध होत नाही.सहज असेल किंवा मनाविरोधी असेल तरी अश्या गोष्टी का स्वीकारल्या जातात,बघितल्या जातात मग स्तनपान सर्वांसमोर केलं तर विरोध का?मी याला काही उत्तर नाही दिले मी त्या चर्चेतून माघार घेतली होती.

माझी जेंव्हा एखाद्या गोष्टीबद्दल, विचाराबद्दल मनाची द्विधा अवस्था निर्माण होते तेंव्हा माझं एक मन याच नेमकं उत्तर ,या गोष्टींबद्दल माझ्या मनाचा नेमका कल शोधण्याच्या पाठी असतं. एक सल मनाला सतत सलत असते.आणि मला स्वतःला त्याच नेमकं उत्तर हवं असत.आणि मला या बद्दल नेमके उत्तर मिळायला दोन गोष्टी/घटना अश्या घडल्या की माझ्या मनाने नेमके एक म्हणणं कोणत्याही अटी शर्तीशिवाय मान्य केलं.
पहिली घटना घडली ते स्थळ साताऱ्यातील शेंद्रे फाटा ,वेळ सायंकाळची आणि रस्त्यावर रहदारी होती.मी ज्या गाडीने प्रवास करीत होते ती गाडी होती आमच्या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकाऱ्यांची.ते सांगलीचे ते स्वतः गाडी चालवित होते.गाडीत मागे आणखी दोघेजण होते ज्यांना पेठ नाक्यावर उतरायचे होते.रहदारीतून संथ गाडी चालली होती.आणि आमच्या गाडीच्या पुढे एक बाईक होती नवरा बायको आणि लहान मुलं होत त्या गाडीवर.अचानक त्या बाईने आपल्या गर्दीने हैराण आणि रडवेल्या झालेल्या मुलाच्या तोंडात आपला पदर बाजूला सारून स्तन दिले. हे सगळं फक्त काही सेकंदात घडलं,आजूबाजूला सगळं पूर्वीसारख सुरू होत.गर्दी, गोंधळ,हॉर्नचे कर्ण कर्कश आवाज आणि त्यात माझं लक्ष वेधले होते त्यागर्दीत स्तनपान करविणार्या मातेकडे. रस्त्यावर बऱ्यापैकी खड्डे होते आणि ती बाई जराही विचलित न होता,स्थिर राहण्याचा प्रयत्न करीत आपल्या मुलाला छातीशी कवटाळून स्तनपान देत होती.एक प्रकारे त्याला आश्वस्त करीत होती. तिचे वागणे त्यावेळी मला खूप सहज वाटले .आजूबाजूला,गाडीत पाहिलं मला या गोष्टीने कुणी विचलित झाले आहे अस नाही जाणवलं.ती स्त्री कष्टकरी होती.ती तिच्या वागण्याबद्दल यत्किंचितही गोंधळली नव्हती,ती संयंत होती.त्यांच्या गाडीला मागे खोरं आणि घम्याले पाटी अडकवली होती. आम्ही हायवेला लागलो पण ते दृश्य माझ्या मनातील द्विधा मनस्थितीला मात्र चांगलाच धडा शिकवून गेलं.मी मनातून पक्क ठरवलं की संसदेतील ती स्त्री आणि ही रस्त्यावरील कष्टकरी स्त्री दोघीही आजूबाजूच्या परिस्थिचा ,विचारांचा ,अवधानाचा,कुचेष्टेचा,अभिमानाचा,शाबासकीचा कोणत्याही चांगल्या किंवा वाईट विचारांचा विचार न करता त्या केवळ एक विचार करतायत तो म्हणजे मातृत्वाचा आपल्या बाळाच्या उदरभरणाचा.स्तनपान आडोश्याला केले पाहिजे असे काही नाही.ज्या ठिकाणी त्या आईला आपल्या मुलाला स्तनपान करावेसे वाटेल तिथे तिने तितक्याच सहजतेने खुशाल करावे.माझ्या मनातील किंतु परंतु नष्ट झालेच होते या घटनेने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला एक आणखी एक घटना कारणीभूत झाली.

ती म्हणजे आमच्या घरात अवचित अवतरलेली छोटीशी मणी.हे मांजराचे छोटेसे पिल्लू मम्मीला आणि मला पटकन आवडून गेले आणि तेही आमच्या घरात मोतीशी पंगा घेऊन,गरज पडली तर मला कस फुगता येत हे रागाने मोतीपुढे रागाने शेपटी फुलवून दाखवू लागलं.त्याचे काळेभोर केस आणि सोनेरी डोळे आम्हाला विशेष आवडून गेले.त्याच्या सोनेरी डोळ्यात लहान मुलांची निरागसता,व्याकुळता दिसत होती मला आणि स्पर्शाला आसुसलेले हे छोटंसं पिल्लू स्वतःहुन आपलं अंग माझ्या हाताला घासू लागत.त्याची आणखी एक खोड अशी की मांडीवर घेऊन त्याच्या अंगावर हळुवार हात फिरवत बसलं की ते डोळे मिठून आपल्या पायाचे पुढचे पंजे फुलवीत आणि आकसत राहतं.त्यामुळे मग त्याच्या पंजाची नखे मला किंचितसी रुतत होती.मी मम्मीला दाखवलं बघ हे पायाची हालचाल कशी करते तर मम्मी उत्तरली हे लहान आहे ग अजून ते मनात आपली आई आपल्याला अंगावर दूध कशी पाजत होती ते आठवत असेल.ही पिल्ली अंगावर दूध पिताना आपल्या आईच्या पोटावर असा पंजा रुतवतात.मला हे ऐकून आमच्या मणीबद्दल जास्तच प्रेम दाटून आलं. आईवेगळ हे दूध पित छोटस पिल्लू आईला विसरलं नाही,तिचे स्तनपान विसरलं नाही. खरंच जगात भुकेशिवाय सुंदर अशी गोष्ट नाही.आणि स्तनपान हे केवळ कर्म नाही ते तर लहान मुलांचे उदरभरण आहे. आई आणि मुलं ठरवूदेत कसं ,कधी आणि कुठे स्तनपान करायचे.

अधिकारिणी या व्हाट्सएप ग्रुपवरील चित्रलेखा खातू-राणे, मिनाक्षी थोके-वाकडे,नूतन सावंत-पारधी व इतरही मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार या सगळ्या अधिकारिणी नव्या युगाच्या आणि नव्या विचारांच्या माता आहेत.आधुनिक विचारांच्या असल्या तरी आपल्या बाळांसाठी तितक्याच सजग आहेत.याच माझ्या मैत्रिणींनी मला स्तनपान या विषयावर विचार करायला भाग पाडले.त्यांचे मनपूर्वक आभार.

खरंच स्त्री विधात्याची सर्वात सुंदर कलाकृती.तिचे शरीर घडवीत असताना त्या विधात्याने किती सुंदर गोष्टी योजल्या आहेत.आपल्या बाळाचे पोषण त्या स्तनातून तर होते.जन्मास आलेलं प्रत्येक मुलं, ती स्त्री असो व पुरुष याच स्तनाला प्रथम बिलगून आपलं भूक भागविते या गोष्टीकडे सदा सर्वकाल बघताना एक निर्व्याज भावना आपल्या मनात अवतरली पाहिजे.स्त्रीच्या छबीचा वापर कित्येक उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी केली तरी स्त्री ही पोषणकर्ती आहे ही बाब विसरली नाही पाहिजे.प्रत्येक स्त्री कडे आदराने बघितले पाहिजे.शेवटी युगंधर मध्ये कृष्ण म्हणतो की,स्त्री ही कुणाची माता,पत्नी,भगिनी,प्रेयसी,भाभी,काकी,मामी,वहिनी आहे म्हणून केवळ वंदनीय नाही तर सर्वप्रथम स्त्री ही केवळ स्त्री आहे म्हणूनही वंदनीय आहे.मला वाटत अशी स्त्री आपल्या मुलाला स्तनपान करवित असते तेंव्हा तर जास्तच वंदनीय असते नाही का? उत्तर तुम्ही द्या...

||श्रीकृष्णार्पणमस्तू ||

© राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०३/०८/२०१८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे.
वा!
म्हणजे जी १०-१५% जनता ऑर्गनाइज्ड वर्क फोर्स मध्ये आहे त्यांनां मुलं जन्माला घालण्यापासून परावृत्त करावं आणि बाकीची मेजॉरिटी जनता (अनऑर्गनाइज्ड् लेबर) ह्यांनीं मात्र हवी तितकी मुलं जन्माला घालावी म्हणजे भारतातला पॉप्युलेशन एक्स्प्लोजन चा प्रॉब्लेम सुटेल असं म्हणता का तुम्ही?

सिम्बा, तुम्हाला फक्त राजसी च्या म्हणण्यात टोक गाठलेलं दिसत आहे का?

सिम्बा >>> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे.>>>गरजेची नाही असं म्हटलं म्हणून तर इतका पोस्ट प्रपंच.
असो.

भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?

Ok,
sorry तो प्रतिसाद मिस केला होता,
आणि तो extream सुद्धा आहे,
मागचा प्रतिसाद एडिट करतोय

>>> भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?
बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!

मला तर माझ्या लहानपणीपासून आम्ही कोणत्याही मोलकरणीचा कसल्याही खाड्या बद्दल किंवा रजे बद्दल पगार काटल्याचे आठवत नाही, तसेच कोणत्याही मोलकरणीला आपणहून कधी काढल्याचे आठवत नाही - बहुतांश इतर कामांमुळे किंवा ठिकाण बदलल्याने सोडून जातात. या कामांना लोक मिळण्याचा प्रॉब्लेम मोठा असल्याने सध्या कोणीही ही लक्झरी अ‍ॅफोर्ड करू शकत असेल असे वाटत नाही Happy

पण सिरीयसली, हे सहा महिन्यांच्या पगारी रजेचे धोरण सार्वत्रिक असेल, तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही.
- काम करणार्‍या स्त्रीला सहा महिन्यांची पूर्ण पगारी रजा, आणि नंतर नोकरीत परत
- नवीन कामाकरता लायक असलेल्या स्त्रीला फक्त ती प्रेग्नंट आहे म्हणून नोकरी नाकारणे बेकायदा
- आणि सर्व ठिकाणी, अगदी मोलकरणींकरताही, ते एन्फोर्स करण्याची सिस्टीम

हे जरा युटोपियन वाटले, तरी पूर्ण १००% एन्फोर्स झाले तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही. याचे फायनॅन्शियल बर्डन सर्वत्र सारखेच वाटले जाणार आहे. इतरत्र वापरला जाणारा पैसा प्रेग्नंट स्त्रियांच्या पगाराकरता वापरला जाइल.

एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत अनेक खाजगी कंपन्यांत पहिले दोन नियम राबवले जातात. जेथे ते सक्तीचे आहेत त्या कंपन्यांना स्वतःला व त्यांच्या कॉम्पिटीटर्सना सुद्धा ते लागू होतात. त्यामुळे competitive disadvantage हा जो मुख्य खाजगी कंपन्यांना धोका असतो तो पूर्ण निघून जातो यातून.

<<< सहा महिन्यांच्या पगारी रजेचे धोरण सार्वत्रिक असेल, तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही. >>> असहमत. पण धाग्याचा विषय हा नाही, त्यामुळे तुमचे चालू द्या.

> सर्व इ आय भरणाऱ्या व्यक्तीना मिळतो. सुखवस्तू बाई घरी बसली आणि नवरा काम करत असला तर नवऱ्याला मिळते. इंडिपेंडन्ट कॉन्ट्रॅक्टर असाल आणि खुशीने इ आय भरत असाल तरी मिळतो. > हे ठीक आहे. तिथे व्यक्ती निवड करतेय आपण एखाद्या 'सरकारी' स्कीमचा भाग बनायचे कि नाही. हे भारतातल्या Epf सारखे वाटते आहे. भारतातील भरपगारी maternity leave म्हणजे 'खाजगी कम्पनीच्या जीवावर सरकार उदार' प्रकार आहे.

आधीच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली असती तरी चाललं असतं.
आणि फुकटच्या सल्ल्यासाठी आभार _/\_

===
> बाया प्रेग्नन्ट झाल्यावर मॅटर्निटी लीव्ह नाकारून मुले जन्माला घालण्यास डिस्करेज करणे हे फार लांबचा घास वाटतोय. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअॅक्टिव्ह होईल का? Happy >
वाह वाह मैत्रेयी. फारच स्पॉट ऑन!!
सध्या फक्त maternity leave मिळणाऱ्या बायकाच मुलं जन्माला घालतायत आणि ती बंद झाली कि तो स्त्री नसबंदीचा प्रोग्रामच ठरणार आहे. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअॅक्टिव्ह होईल. बरोबर आहे. सुचलंच नाही मला.

===
> म्हणजे जी १०-१५% जनता ऑर्गनाइज्ड वर्क फोर्स मध्ये आहे त्यांनां मुलं जन्माला घालण्यापासून परावृत्त करावं आणि बाकीची मेजॉरिटी जनता (अनऑर्गनाइज्ड् लेबर) ह्यांनीं मात्र हवी तितकी मुलं जन्माला घालावी म्हणजे भारतातला पॉप्युलेशन एक्स्प्लोजन चा प्रॉब्लेम सुटेल असं म्हणता का तुम्ही? >
Maternity leave मिळतेय म्हणून १०-१५% organised work force मधल्या बायका (त्या किती % आहेत एकूण लोकसंख्येच्या?) मुलं जन्माला घालतायत असं म्हणता का तुम्ही?

===
> हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही. >
असे लिहिलेले असतानादेखील " भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?", " बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!" असल्या कमेंट येण्यामागे काय कारण असेल बरे??

===
> सहा महिन्यांच्या पगारी रजेचे धोरण सार्वत्रिक असेल, तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही. > सार्वत्रिक नाहीय ते धोरण. आणि त्याचा काय परिणाम होतोय याची लिंक वर सिम्बानी दिली आहे. हि अजूनेक
https://money.cnn.com/2017/03/30/news/economy/india-maternity-leave-law-...

>> १०-१५% organised work force मधल्या बायका (त्या किती % आहेत एकूण लोकसंख्येच्या?)
तेच तर मी म्हणते. की ह्या बायकांनां मॅटर्निटी लीव्ह नाकारून भारतातल्या पॉप्युलेशन ला आळा घालण्याचा प्रस्ताव आहे ना तुमचा? त्याबद्दल उत्सुकता आहे.
बाकी मग ह्या बायकांनीं किती मुलं जन्माला घालावीत, प्रत्येक बाळंतपणात किती मॅटर्निटी लीव्ह घ्यावी, ती भर पगारी असावी की कशी आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनीं आणि उरलेल्या सर्व आयांनीं आपापल्या बाळांनां दुध कसं आणि कुठे पाजावं त्याबद्दल नंतर बोलू; एकदा पॉप्युलेशन प्रश्न निकालात काढला की चर्चा करायला मुद्दे हवेतच ना!

तुम्ही जन्मदर वाढलाय म्हणून गर्भारपण कमी करायला रजा पगार काही नको म्हणत होता. मग ते फक्त पांढरपेशा लोकांना मिळतं तर मोलकरणीना का नाही वर आलात आता सरकारी धोरणामुळे सगळा भार खाजगी आस्थापनावर येतो म्हणून कितीपण रजा घ्या पण पगार नको पण नंतर नोकरी देण्याचं बंधन ठेवा असं म्हणताय.

अमितव,
परत एकदा मागे जाऊन प्रतिसाद वाचून बघा.

> सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं. > आपल्या एम्पलोयरकडून भ.बा.र. मिळावी म्हणणारे स्वतः एम्पलोयर झाल्यावर काय करतात विचारले आहे.
===
> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

===
सिम्बानी " प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे," असे सुचवले आहे त्यावर मी "हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही." म्हणले आहे.

>>>जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. >>>
म्हणूनच विचारतोय की जन्मदर 2 होत नाही तोपर्यंत वरील सर्वांनी इन्शुरन्स ही देऊ नये. सरकारी मोफत उपचार करणारी इस्पितळे बंद करून टाकावी. पुरेसे गरीब लोक मेले आणि इफेकटिव्ह जन्मदर 2 वर आला की वाचवा कोणाला वाचवायचं ते. तोपर्यंत पैसे असतील तर जा डॉ कडे नाहीतर मरा. हे वाचायला कसं वाटतंय ??

> तोपर्यंत वरील सर्वांनी इन्शुरन्स ही देऊ नये. > व्यक्ती स्वतः प्रिमियम भरून विमा घेते ना?

> सरकारी मोफत उपचार करणारी इस्पितळे बंद करून टाकावी. पुरेसे गरीब लोक मेले आणि इफेकटिव्ह जन्मदर 2 वर आला की वाचवा कोणाला वाचवायचं ते. तोपर्यंत पैसे असतील तर जा डॉ कडे नाहीतर मरा. हे वाचायला कसं वाटतंय ?? > खाजगी कंपनीने भ.बा.र. का द्यावी सांगू शकाल का?
आणि सरकारने हि सक्ती केल्याने कम्पनी स्त्रियांना नोकरीवरच घेत नाही याची सामाजिक किंमत किती आहे?

त्याऐवजी सरकाराने इआयसारखी योजना आणावी किंवा 'सर्व' स्त्रियांना २च मुलांसाठी एक ठराविक रक्कम द्यावी. त्यासाठी करदात्यांना वेगळा सेस लावावा अशा मागण्या का होत नाहीत?

भारतत रहात असताना माझी खाजगी कंपनी माझा, माझ्या कुटुंबाचा, आणि आमची कंपनी जरा जास्तीच उदार होती म्हणून कुटुंबात आई/ वडिलांचा समवेश करुन वैद्यकीय विमा काढत असे. माझ्या पदरचे (पगारातले) काहीही पैसे खर्च होत नसत.
>>>खाजगी कंपनीने >> हे नियम सरकारी आस्थापनानाही लागू असतील सो फक्त खाजगी कंपनी हे पहिलं चुकीचं आहे.
दुसरं म्हणजे तुम्ही जितका इआय भरता तितकाच इआय तुमच्या कंपनीला भरणे ही बंधनकारक असते.
शेवटचं : कोणी आणि कशा स्किम मधून हा खर्च उचलावा हा माझा मुद्दा नाहीये. ती सामाजिक सुरक्षा देणारी सेवा असावी. हे तुम्हाला मान्य असेल तर कोणी आणि कशी स्किम चालवावी यावर कॉम्प्रोमाईज होउ शकते.

> तेच तर मी म्हणते. की ह्या बायकांनां मॅटर्निटी लीव्ह नाकारून भारतातल्या पॉप्युलेशन ला आळा घालण्याचा प्रस्ताव आहे ना तुमचा? त्याबद्दल उत्सुकता आहे. >
तुम्ही जो अर्थ काढला आहे तो चुकीचा आहे. मी वरती लिहिले आहे

> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

> भारतत रहात असताना माझी खाजगी कंपनी माझा, माझ्या कुटुंबाचा, आणि आमची कंपनी जरा जास्तीच उदार होती म्हणून कुटुंबात आई/ वडिलांचा समवेश करुन वैद्यकीय विमा काढत असे. माझ्या पदरचे (पगारातले) काहीही पैसे खर्च होत नसत. > तो हिशोब Ctc मध्ये केलेला असतो. There is no such thing as free lunch.

===
>>>खाजगी कंपनीने >> हे नियम सरकारी आस्थापनानाही लागू असतील सो फक्त खाजगी कंपनी हे पहिलं चुकीचं आहे. > सरकारने द्यावं त्याच्या नोकरांना काय द्यायचं ते. खाजगी कम्पनीला का सक्ती करतायत?आणि त्यामुळे होणाऱ्या ऋण परिणामांच काय?

===
> दुसरं म्हणजे तुम्ही जितका इआय भरता तितकाच इआय तुमच्या कंपनीला भरणे ही बंधनकारक असते. > Epf सारखेच आहे हे. कम्पनी इआय भरत असेल तर तो तुमच्या Ctc त हिशेबात धरलेला असणार.

===
> शेवटचं : कोणी आणि कशा स्किम मधून हा खर्च उचलावा हा माझा मुद्दा नाहीये. > माझा हाच मुद्दा आहे.

> ती सामाजिक सुरक्षा देणारी सेवा असावी. हे तुम्हाला मान्य असेल तर कोणी आणि कशी स्किम चालवावी यावर कॉम्प्रोमाईज होउ शकते. > सरकारी && 'सर्व'समावेशक असेल तरच मान्य आहे

अ‍ॅमी च्या पोस्ट्स काहीही वाटल्या.
चाईल्डबर्थ हा माझा ह क्क आहे. एज्युकेशन हा जसा आज सगळ्यान्चा हक्क समजला जातो, त्याचा भार कसा सगळ्या समाजावर पडतो, त्यापे क्षाही बेसिक गोष्ट आहे ही.
तुमची आई काम करायची का माहित नाही, पण करत असेल तर तेव्हाच रजाच न देण्याचा उपाय केला असता तर तुम्ही आज इथे असला असतात का? (वाईट अर्थाने लिहित नाहीये, उदाहरण समजावे म्हणून लि हिती ये) समाजात ५०% अ सलेल्या वर्क्फोर्स कर्ता असे धो रण!

मोलकरणीला ML दिली असती लिहिलंय ते वाचलं नाहीत का तुम्ही? का तुम्ही देत नाही / द्यायची नाही म्हणून इतरांचं पण तसंच असेल असं गृहीत धरलं आहे. Organised sector एम्प्लॉयमेंट मध्ये कोणत्याही रजेच्या फायद्यांना eligible होण्यासाठी probation पूर्ण करावा लागतो. मोलकरीण एवढी टिकली तर आपोआपच सगळं manage होतं!
बाकी, तुमचं म्हणणं अस दिसतंय की बायका भरपगारी ML घेतात त्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे त्यांना भरपगारी रजा देऊ नये. इतकीच जर मुलं जन्माला घालायची बाईला हौस असेल तर Unpaid Leave घ्या आणि मुलं जन्माला घाला. मुळात बायकांना हे सगळ्या गोष्टी मिळवायला किती संघर्ष करावा लागलाय हे तुम्ही सोयीस्कर रित्या विसरताय. बायकांना बालंतपणाच्या सुट्ट्या द्यायच्या नसतील तर कोणालाच कसलीच सुट्टी देऊ नका. अवघड आहे परत स्वातंत्र्यपूर्व काळाकडे सामाजिक वाटचाल! काही माझ्या समजण्यात चूक झाली असेल तर नक्की सांगा.
बेसिकली, some women can have it all हे बऱ्याच जणांना खुपयंत का? सगळ्याच बायकांना have it all मिळावं अशी इच्छा असेल तर त्यात काही गैर नाही . त्याची सुरूवात घरापासून व्हायला हवी. वडील, भाऊ, नवरा ह्या मंडळींना आधी बदलावं लागेल!

मला अ‍ॅमी यांचे मुद्दे (आता) पटले.
राजसी यांच्या पोस्टचा उत्तरार्ध पकडून आपण कुटुंबव्यवस्था, समाज बदलू शकत नाही, म्हणू कायद्याने, नोकरीच्या नियमांत स्त्रियांना सवलत दिली आहे असा अर्थ निघतो.

सारख्या कामासाठी सारखे हक्क आणि लाभ या तत्त्वांत मॅटर्निटी बेनेफिट्स बसत नाहीत. अ‍ॅमी यांनीच अन्यत्र लिहिलेल्या ज्या मुद्द्यामुळे मला त्यांचं म्हणणं पटलं तो हा मुद्दा :
मॅटर्निटी बेनेफिट्सचा लाभ पुरुष (आता पॅटर्निटी बेनेफिट्स येताहेत, दत्तक, सरोगसीसाठी बेनेफिट्स मिळतील हे आणखी पुढचं) आणि ज्यांना मूल नको आहे, असे स्त्रीपुरुष घेऊ शकत नाहीत. आत त्यांचा निर्णय जगावेगळा म्हणून त्यांना या सोयींचा लाभ घेता येऊ नये हा अन्याय नाही का? की त्याबद्दल त्यांना काही इन्सेंटिव्ह मिळावा? नो क्लेम पिरियडसाठी इन्शुरन्सवाले बोनस देतात- त्याप्रमाणे.

या सगळ्यासाठी स्त्रियांना झगडावं लागलंय हे मान्य करून आपण समानतेच्या पातळीवर ही तात्त्विक चर्चा करतोय हे लक्षात ठेवूया.

बाळंतपणाची रजा हा benefit नाही आवश्यकता आहे. ज्यांना लाभ वाटतो त्यांनी खरंच डोळे उघडून बघण्याची गरज आहे. It is not a vacation, full time job where one doesn't have to atleast worry about how to feed herself and the baby.
बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे.

हा मुद्दा मॅ लिव्ह ६ महिने झाली तेव्हा बर्‍याच चर्चात आला होता.फक्त मॅटर्निटी बेनिफिट स्त्रियांना दिले तर मूल न होण्याचा निर्णय घेतलेले कर्मचारी, बॅचलर्स यांना ते अन फेअर वाटते.
माणूस चोरीछुपे दुसरीकडे जॉइन होणार नाही, आपल्याच कंपनीसाठी काही हायर शिक्षण करेल आणी नंतर आपल्या कंपनीत वापरेल ही काळजी घेऊन कोणालाही ६ मंथ पेड सबाटिकल द्यायला हरकत नाही. (आणि गंभीर आजारांबाबत ६ मंथ पेड सीक लिव्ह.)
मॅ लिव्ह ला दिले गेलेले पेड बेनिफिट ही महिला वर्गाला दिलेली सवलत नसून त्यात भूतकाळातील बरेच वाईट अनुभव, अगतिकता, बायकांनी मूल जन्माला घालून पैशाची गरज वाढणे (सिंगल मदर,काही आकस्मिक अपघातामुळे विधवा होणे, घराचे हफ्ते वगैरे विचार करता) याचा इतिहास आहे. (पूर्वीच्या काळी मुलांना अफू घालून घरी ठेवून दिवसभर कामावर जाणार्‍या बायकांच्या काही कथा ऐकल्या असतील.)
समाजावर परीणाम, गुन्हे वाढणे, मुलं कुपोषित्/गतीमंद निपजणे, मुलांचे शोषण असे बरेच प्रत्यक्ष न दिसणारे साईड इफेक्ट ३ किंवा ६ महिने पेड मॅ लिव्ह न देण्यात आहेत. पूर्वीच्या काळी सरकारी ऑफिसेस मध्ये पण शेवटची कळ येईपर्यंत (बाळ झाल्यवर ३ महिने पूर्ण मिळावे आणि पैशाचे कमी नुकसान व्हावे म्हणून )काम करणार्‍या बायांच्या कथा ऐकल्या आहेत.

पैश्याचं सोंग आणता येत नाही.काही घटकांनी मुलं न जन्माला घालायचा निर्णय घेतला म्हणून सर्वांना घेता येत नाही. नवा जीव समाजात आणायला, वाढवायला पैसे लागतात. वेळ लागतो.आपण ज्या कंपनीला उमेदीची ५-१० वर्षं, रोजचे ९-१० तास किंवा जास्त कमिटमेंट देतो तिच्याकडून या मोठ्या घटनेत आधाराची जराही अपेक्षा करु नये?

मे बी इथे मुद्दे मांडणार्‍यांसमोर चुकीची वागणारी उदाहरणे असतील. पण मॅ लिव्ह घेऊन आपले आवडीचे काम मिस होते म्हणून शक्य तितक्यालवकर जॉइन करुन, अनेक ठिकाणचे बॉल एका वेळी जगल करुन ऑफिस च्या कामावर इम्पॅक्ट होऊ न देणार्‍या कमिटेड वर्क ओरिएंटेड बायका आपण पाहिल्या नाहीत का?

आणि कामवाल्या बायांना पेड लिव्ह देण्याबद्दलः
बाया दिवसाला १ घर सरासरी ४५ मिनीट काम करतात. अशी ४ ते ५ कामं त्यांच्याकडे असतात. सर्वांनी ठरवल्यास एखाद्या बाईला ६ महिने पगारी लिव्ह सर्वांनी मिळून द्यायला काहीच हरकत नाही. कल्पना चांगली आहे. माझ्याकडे दिवसाची फक्त ४५ मिनीट कमिट करणार्‍या बाईला ६ महिने भरपगारी रजा एकटीने देणं मला परवडणार नाही. पण ती माझ्याकडे दिवसाचे ६ तास/जास्त वेळ काम करत्/मुले सांभाळत असेल तर ही अशी लिव्ह आणि लागेल तो हेल्थ सपोर्ट/बिनव्याजी कर्ज देणं हे माझं कर्तव्य आहे.

बाय द वे, स्वतःचे रास्त तळमळीचे लॉजिकल मुद्दे पर्सनल वर न येता, अती अग्रीसिव्ह न होता मांडले तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो असा अनुभव आहे.

राजसी +१
बाळंतपणाची रजा ही आवश्यकताच आहे, ' फायदा' नाही.

मी आधीच स्पष्ट केलंय की बाळंतपणाच्या (भरप्गारी) रजेसाठी झालेल्या झगड्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे तात्त्विक पातळीवर आहे.

वेगळ्या शब्दांत लिहून पाहतो.
"बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे."
इथे भेदभाव होतो, असं वाटत नाही का?

<.आपण ज्या कंपनीला उमेदीची ५-१० वर्षं, रोजचे ९-१० तास किंवा जास्त कमिटमेंट देतो >

यासाठी मोबदला मिळतो ना? की आवडीचं काम आहे म्हणून करतो आपण ते?

मोबदला मिळतो. नो डाऊट.पण कंपन्यांचे निर्णय, अक्वीझिशन्स, बदललेल्या स्ट्रॅटेजी या आपल्या जीवनाची दिशा हळूहळू नकळत बदलत असतात.ही दिशा भविष्यासाठी चांगली असते किंवा नसते.जरी हा सुप्रिम त्याग वगैरे नसला तरी एखादी कंपनी एका विशीष्ठ स्टेज ला जाण्यात मनापासून काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याचा बीट असतो.
मोबदला आणि श्रम हे प्रपोर्शन मध्ये नसू शकतात. (कोणत्यातरी लांबच्या गावातून १.५ लाख वर्षाला पॅकेज वर पुण्यात्/मुंबईत कॉट बेसिस वर राहणारे फ्रेशर्स्/पगार ओके मिळूनही कामाच्या ठिकाणाजवळ महाग रेंट्/लांब स्वस्त रेंट ने राहील्यास बस रुट वर नसणे/एकंदर खिश्यातले गणित नफ्याकडे जावे म्हणून कराव्या लागलेल्या तडजोडी/आयटीतले महाग पार्टी कल्चर्/त्यातून जास्त पंगे न घेता वेगळे राहणे/स्वस्त मजा मॅनेज करणे). कधीकधी आयुष्यातले अनेक तास, नोकरीसाठी केलेल्या तडजोडी, भलता रोल अंगावर पडून वेगळी कामे करावी लागणे याच्या मानाने नोकरीने आपल्याला जास्त दिलेले नाहीये असा फील येतो.

Pages