हिपोक्रसी 5 - वर्क फ्रॉम होम बायका

Submitted by कटप्पा on 30 July, 2018 - 15:35

काल उशिरा एक पी 1 issue आला आणि सगळी टीम काँफेरेन्स कॉल वर जमली. सगळे घरून लॉगिन होते कारण लेट नाईट कॉल होता.
सगळे पुरुष होते आणि फक्त एक स्त्री होती कॉल वर.
डिस्कशन चालू होते आणि अचानक लहान मुलाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. कॉल interrupt झाला.
पी एम ने कॉल मध्ये एकदम त्या स्त्री ला सांगितले - कॅन यु प्लिज गो ऑन म्युट?
आणखी एकाने री ओढली, की बाई जेंव्हा बोलायचे असेल तेंव्हाच unmute करत जा, बाकी वेळ प्लिज म्युट ठेवत जा.

खरी गोष्ट अशी होती की ती बाई आधीच म्युट वर होती, आणि तो लहान मुलाचा आवाज खरं तर त्या कॉल मधल्या एका पुरुषाच्या घरातला होता. त्याने लगेच सांगितले की त्याचा बेबी ओरडत होता. Its his fault that he didnt गो ऑन म्युट.

कधी बदलणार परसेप्शन??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं नाव घेउन कुणी कुणाला म्युटवर जायला सांगत नाहीत. ईथे लहान मुलंच काय, पाळलेले कुत्रे, मांजरं, पक्षी, टिव्ही, भांडी धुणे, असे कसलेही आवाज येतात तेव्हा फक्त, कॅन एवरीबडी गो ऑन म्युट इफ नॉट स्पिकींग एवढेच सांगितले जाते.

>>सगळे घरून लॉगिन होते कारण लेट नाईट कॉल होता.
सगळे पुरुष होते आणि फक्त एक स्त्री होती कॉल वर. -- यांत वर्क फ्रॉम होम बायका चा काय संबंध आहे?

आता तुम्ही लोकं मला हिप्पोक्रसी समजवा
>>> पोराचं रडणे म्हणजे बाईच असेल हे थिंकिंग.

लेखक बरोबर ना?

अहो त्यांनी शेवटची लाईन लिहिलाय की...
कधी बदलणार परसेप्शन??
>>>>
परसेप्शन आणि हिप्पोक्रसी यात आंतरसंबंध काय आहे?
या दोन्ही शब्दांचा मराठीत अर्थ काय होतो नेमका?

एक सहज आठवले,
आमच्याकडे जेव्हा कॉलमध्ये असा गोंगाट सुरू होतो तेव्हा फॉरेनची लोकं बिनदिक्कत ईंडिया ऑफिसला म्यूट करायला सांगतात, कारण असला गोंगाट कल्चर ईथल्याच ऑफिसमध्ये असतो. जाम खेचतात ..

कटप्पा , सॉरीच बरे का..
आधीचे भाग अटलिस्ट हिप्पोक्रसी च्या सिमारेषेवर घुटमळणारे होते,
हा भाग उगीच ओढून ताणून लिहिलाय

कसलेही आवाज येतात तेव्हा फक्त, कॅन एवरीबडी गो ऑन म्युट इफ नॉट स्पिकींग एवढेच सांगितले जाते. >> +१११ असेच कॉन्फरन्स कॉल वर सगळीकडे (भारत आणि भारताबाहेर ) बोलले जाते. बायकांनीच फक्त लहान मुले सांभाळायची असतात हा विचार आता मागे पडत चाललेला आहे. पुरुषसुद्धा आता इक्वली मुलांना सांभाळतात जसे कॉल मध्ये अनम्यूट पुरुष सांभाळत होता. तो प्रोजेक्ट मॅनेजर चुकीचे बोलला. हा हिप्पोक्रसीचा धागा त्या प्रोजेक्ट मॅनेजरलाच वाचायला द्या.

असा एक गमतीचा किस्सा, आम्ही कॉलवर होतो. उसगावात सकाळ होती आणि बहुदा स्कूल ब्रेक होता. आमचा एक कलीग घरुन आला होता कॉलवर.

अधनंमधनं त्याची पोरं गोंधळ करत होती, तो म्यूट करून त्यांन्ना काही तरी सांगून यायचा बहुदा.

तो बोलत असताना मध्येच एकदा काही तरी केलं त्या पोरांनी आपापसात, नुसता कल्ला. तो म्हणाला सॉरी आय विल ड्रॉप ऑट बिफोर माय किड्स ब्रिन्ग द हाऊस डाऊन अ‍ॅन्ड ब्लो योर इअरड्रम्स. Proud

यात कुणाची कसली हिपोक्रसी दिसली? त्या माणसाचे चुकले हे खरेच. पण मुले मध्ये बोलताहेत म्हणून तो बाईला बोलला असता पण बाबाला बोलला नसता तर हिपोक्रसी वाटली असती.

पण मुले मध्ये बोलताहेत म्हणून तो बाईला बोलला असता पण बाबाला बोलला नसता तर हिपोक्रसी वाटली असती.
>>> बाई लाच बोलला ना फक्त, बाबाला कुठं बोलला

रडणारी मुले बाईची नसतानादेखील बाईला बोलला हे त्याने बाईला गृहीत धरणे, ज्यावर मूळ धाग्यात शेवटी भाष्य आहे.

वरच्या बाईला बोलून झाल्यावर एखाद्या दुसऱ्या बाबाची पोरे रडायला लागली असती व त्याला मॅनेजर काहीच बोलला नसता/सहनुभूतीपर किंवा तसे काही बोलला असता तर ती मनेजरची हिपोकरसी ठरली असती.

पी एम आणि दुसरा री ओढणारा मुर्ख आहेत. त्यांच्याबद्दल गोष्ट लिहावी इतके पण ते महत्वाचे नाहीत.