कर्म असं खरंच काही असतं?

Submitted by _धनश्री_ on 29 July, 2018 - 21:44

नमस्कार वाचकहो, मी सध्या मनाच्या खूप विचित्र अवस्थेतून जात आहे.. आणि जो माणूस यासाठी जबाबदार आहे त्याला आपण कर्माची फळं म्हणतो ती मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.. जसे करावे तसेच भरावे असं आपण नुसताच ऐकलं आहे.. पण मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की कर्मा factor, किंवा कर्माची फळं वगैरे असं काही असतं का?
मी खूप प्रामाणिक पणे विचारतेय कारण इथे खूप mature लोक आहेत हे खूप दिवस वाचत असल्याने माहीत झालंय... मला प्लीज खरं काय असतं ते सांगा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांनी चांगले वागावे अशी इच्छा होती काही लोकांची हजारो वर्षांपूर्वी, पण तेंव्हा आ़जकालच्या सारखे कायद्याचे राज्य नव्हते. मग लोकांना धाक कशाचा घालायचा? म्हणून मग कर्म, धर्म, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक असले काही काही सांगितले नि हज्जारो वर्षे लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. पण आता पाश्चिमात्य ज्ञान आल्यावर हे जोपर्यंत मोजमाप घेऊन, प्रयोग करून सिद्ध होत नाही तोपर्यंत कशावरहि विश्वास बसत नाही.

म्हणून कशावरहि विश्वास ठेवा वा न ठेवा - चांगले वागा, दुसर्‍याला त्रास देऊ नका.

प्रतिसाद बरेच आलेत. एव्हाना धाग्याचा हेतू साध्य झालाही असेल. माझे इतकेच मत आहे कि:

वाईट अनुभवातून योग्य तो धडा घेऊन असे अनुभव देणाऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून कायमचे डिलीट करणे आणि त्यांच्यावर विचारही न करता आपण आपल्या आयुष्यात पुढे जात राहणे (मूव्ह ऑन). हा एकच चांगला पर्याय आहे (निदान माझ्या दृष्टीने तरी हे निर्विवाद)

(बाकी, त्याच काय इतर कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात त्यांचे पुढे कसे व्हावे यावर आपण विचार करून, त्यांच्याविषयी भले अथवा बूरे चिंतून, काही उपयोग होत नसतो. कर्म असो अगर नसो)

इथे 'कर्माचा सिद्धांत' नावाच्या हीराभाई ठक्करांच्या पुस्तकाबद्दल उल्लेख आलाय म्हणून हे थोडसं

अन्य धर्मीयांनी भारतावर आक्रमणे केली,आपला धर्म बर्‍याचदा जबरदस्तीने लादला,लुटालूट केली आणि एवढं होऊनही हिंदू बर्‍याच ठिकाणी हिंदू हा छळ का सोसत राहिले त्या मागचं कारण हवं असेल तर हे पुस्तक अवश्य वाचावं

या पुस्तकातून घेण्यासारखं काहीही नाहीये. ज्या गोष्टी कॉमनसेन्स या गटात येतात त्यांनाच आध्यात्मिक शब्दांचा मुलामा फासून सादर केलेलं आहे.

पुस्तकाचा बराचसा भाग हा तर्काला धरुन नाहीये.तरीही याच्या एवढ्या आवृत्या निघाव्यात याचं आश्चर्य वाटतं.

नव्या बाटलीत जुनी दारु एवढीच लायकी या पुस्तकाची आहे.

बाकी केशव तुलसी अाणि देवकी यांच्याशी १००% सहमत.

देवकी,
चालू जन्मात चांगली कृत्ये करा,वाईट केलीत तर त्याची फळे याजन्मी किंवा पुढल्या जन्मी भोगावी लागतील असा धमकीवजा इशारा आहे.एकाअर्थी ही संकल्पना चांगली आहे.फ्क्त ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्यावेळी पूर्वजन्मीचे भोग,नशीब म्हणायचे इतकेच.

अचूक लिहिलयतं!

नव्या बाटलीत जुनी दारु एवढीच लायकी या पुस्तकाची आहे.>>>>>

व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् हे ऐकले असेलच. म्हणून त्यानंतर कुणी काहीही लिहिले नाही असे झालेय का? ते पुस्तक वाचून लोकांना बरे वाटले असावे म्हणून आवृत्त्या निघाल्या. नाहीतर प्रकाशक काय कागद जास्तीचा साठलाय म्हणून आवृत्त्या काढत नाही. Happy Happy

तर झालं काय की माझ्या आयुष्यात असलेल्या एका व्यक्तीच्या मते, माझ्यामुळे तिचं भयंकर नुकसान झालंय, आयुष्य खडतर वगैरे... आमच्यातील नातं बऱ्यापैकी प्रेमाचं होतं, पण शेवटची भेट फार वाईट म्हणावी अशीच होती. बरं हे जे नुकसान ती म्हणतेय ते कधीच तिने explain केलेलं नाही. तर मुद्दा हा की त्या व्यक्तीने मला अगदी शाप वगैरे दिलेला. माझं टेम्पर कधी जात नाही, पण त्यावेळी मी बोलून गेलो की जर मी तुझं काही वाईट केलं असेल तर माझं वाईटच होणार, माझ्या कर्माचं फळ मला नक्की मिळणार!

काही बाबतीत झालं असेलही, पण माझा उद्देश कधीच वाईट नव्हता, नसेल.

आता सल्ला, तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहात, त्यांचा उद्देश वाईट होता का हे तपासा, जर असेल तर कर्माची वाट बघू नका, स्वतःच काहीतरी कर्म करून कानशिले फोडून या त्या व्यक्तीची!

सर्व साधारण पणे व्यक्ती दु:खात असताना किन्वा दारू प्यायल्यावर अध्यात्मिकतेकडे वळतो ( दारु प्यायल्यावर कारण मुळ अन्तरन्ग सामाजिक दडपणातून मोकळा होतो), तुम्हाला नक्की काय झाले? तुमच्या तर नावातच धन आहे... तुम्हाला कसली ददात.?

Pages