आयुष्य नागमोडी वळण हे...!

Submitted by प्रिया येवले on 28 July, 2018 - 04:15

लवकर घरी पोचायचंय ! आईला काहीतरी चांगलं बनवलं पाहिजे खायला.. जेव्हापासून पप्पा ऍडमिट आहेत घशात चार घास कसेतरीच ढकलतेय .. अन्न शरीराला लागत सुद्धा नाही सर्व चिंतेत , काळजीत वाया जातंय. रीना आणि मोनू (बहीण, भाऊ ) दोघांची खूप धावपळ होते त्यांनाही जरा पोटाला आधार ....
आल्या दिवशी असा विचार करून मीना रोज कामावरून येऊन घरी स्वयंपाकाला लागत असे कामावरून यायलाच तिला ७ वाजत असे तिथून पुढे अर्ध चित्त हॉस्पिटलमध्ये तर अर्ध जेवणात . कसातरी ८.३० वाजता जेवण उरकून डब्बे भरून रीना ला फोन करून एवढा ४ जणांचा डब्बा हातात घेऊन तो न सांडता डचमळता बस च्या गर्दीतून घेऊन जाण हा गेल्या २ महिन्यापासून दिनक्रम ठरलेला. रीना हि कामाला जात असे. या दोघींच्या जीवावरच तर सर्व चालू होत मोनू या दोघीपेक्षा लहान नुकतंच शिक्षण पूर्ण झालं होत त्याच, आणि आता तो हॉस्पिटल मध्ये राहून आईची ढासळती मनस्थिती आणि येणारे जाणारे नातेवाईक सांभाळत होता.
सर्वच जण आपापल्या पातळीवर या संकटाशी लढत होते. दिनकरराव-बकुला हे साधेसे मध्यम वर्गीय जोडपे. मीना, रीना आणि मोनू तीन अपत्ये .आर्थिक परिस्तिथी यथातथाच त्यात लोन काढून घर घेतलेलं . त्याचे हफ्ते कसेबसे फेडणारे आणि घर चालवणारे हे जोडपे, फार सुखी आणि समाधानी आयुष्य जगत होते. पण नियती पुढे सर्व बदललं . मीना च लग्न थाटात लावू. आणि गावी छानसं घर बांधून तिथेच उर्वरित आयुष्य काढावं हे स्वप्न. आणि हे क्षणात भंगल. दिवाळसण जवळ आला होता तयारी सर्व झाली होती. मीना साठी पैसे जमवून जमवून एक सोन्याचा हार बनवला होता. तिच्या लग्नासाठी स्थळ बघन चालू केलं होत. पण मीनाला एक मुलगा आवडत होता. पण ती वडिलांच्या शब्दाबाहेर नाही हे पप्पाना माहित होते म्हणून एकदा विक्रम (मीनाचा कलासमेट )च्या घरीही जाणार होते बघायला. दिवाळीचा पहिला दिवस मस्त गेला भाऊबीजेला ४ हि मामा येणार होते. दिवशी चाळीतल्या एकीच्या नवऱ्याने मासे पकडून आणले होते आणि साऱ्या चाळीला वाटलॆ होते. संपूर्ण चाळीचा मेनू एकच ...
त्याच दिवशी बकुळाच्या मैत्रिणीचा नवरा कॅन्सरशी लढत लढत गेला. सर्व सोपस्कार झाले , आणि दुसऱ्या दिवशी नातेवाईकाकडे दिवाळी पोचवण्यासाठी दिनकरराव सज्ज झाले. दात पडल्यामुळे दिनकरराव थोडं अडखळत बोलत होते. जेवण जात नव्हतं , त्यामुळे थकवा जाणवत होता. पण लगेच उठून दवाखाना गाठेल तो मध्यमवर्गीय कसला ?
दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त गरम दुधात दोन करंज्या खाऊन ते घराबाहेर पडले आणि दुपारीच घरी आले काम त्यांचं पेंटर च त्यामुळे सीझन असेल तर काम नाहीतर ......
दुपारी घरी येऊन झोपी गेले संध्याकाळी मीना कामावरून आली त्यांना पाहून तिला वाटलं पडले असतील दमून म्हणून टीव्ही पाहू लागली. इतक्यात बकुळाबाई आल्या त्या जवळच एका संस्थेत ग्रंथालय सांभाळायला जायच्या. आणि रीना हि त्यांच्यासोबत आली. मोनू , रीना आणि बकुळाबाई दिनकर रावांना घेऊन दवाखान्यात पोचल्या तिथे समजलं त्यांचा बीपी हाय आहे आणि त्यांना पक्षाघाताचा अटॅक झाला आहे संपूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
क्रमश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users