एक विरोधाभास (संजू)

Submitted by कल्पतरू on 21 July, 2018 - 11:12

कालच चित्रपट पाहिला, सगळ्यात पहिलं नमूद करतो कि मला कोणत्याही संजूप्रेमींच्या भावना दुखवायच्या नाहीत. हा चित्रपट म्हणजे निव्वळ संजय दत्तची प्रतिमा सुधरवायला केलेला खटाटोप आहे. प्रेक्षक पण अक्कल गहाण ठेऊन चित्रपट पाहतात आणि डोळे ओले करून सिनेमागृबाहेर पडतात. बाकी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर चित्रपट आणि वास्तव यात काय फरक आहे हे इथे सगळ्यांनी लिहिलयच त्याबद्दल जास्त बोलत नाही. आता मला जाणवलेला सगळ्यात मोठा विरोधाभास सांगतो. चित्रपटाची सुरवात होते संजूच्या पुस्तकापासुन, संजूला त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचं असतं, पण काहीकेल्या त्याला लेखक मनासारखा मिळत नाही. एका लेखकाचा अपमान करून चप्पल जोड्यानी मारून त्याला घराबाहेर काढतो. त्याचवेळी केसचा निकाल लागतो आणि संजूला तुरुंगात जावं लागेल अशी बातमी सगळ्या न्यूज चॅनेलवर झळकते. त्या रात्री संजू आत्महत्येची चिट्ठी लिहतो, लिहितो म्हणजे सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर चार शब्द रखडतो. उंच इमारतीवरून उडी मारणार(कदाचित अशी वेळ येईल म्हणून सगळ्यात टॉप फ्लोअर त्याने घेतला असावा) इतक्यात बायकोचा अचानक आवाज येतो. मग अर्थातच आत्महत्येचा प्लॅन रद्ध होतो. मग संजू तिला बोलतो आयुष्यात काही राहिलं नाही त्याच्या मुलांना अतिरेक्यांची मुलं असं चिडवतील, पुस्तक लिहायला कोणी मिळत नाही त्यामुळे उडी मारलेली बरी. बायको बोलते तू का नाही लिहीत पुस्तक तेव्हा संजू बोलतो साधी आत्महत्येची चिट्ठी लिहिता येत नाही मला आणि पुस्तक लिहू???

हा एक भाग झाला आता दुसरा भाग म्हणजे चित्रपट पुढे सरकतो सुनील दत्त ज्यावेळी मरतो त्याच्या आदल्या दिवशी संजूने एका लेखकालाही लाजवेल असा लेख सुनील दत्तवर लिहिलेला असतो. तो लेख ऐकून सगळेच प्रेक्षक रडायला लागतात. अरे जरा विचार करा हा तोच संजू आहे ज्याने सुरवातीलाच स्पष्ट केलं होतं कि त्याला चार शब्द लिहता येत नाहीत तो असा लेख लिहू शकतो का? असे कितीतरी विरोधाभास दाखवलेत त्या चित्रपटात. पण आपल्यासारख्या डोळ्यांना झापडे बांधून चित्रपट पाहणाऱ्यांना ते दिसणार नाहीत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हे जगच अंतर्विरोध, बाह्यरोध आणि प्रतिरोधाने भारलेले आहे. अस्तित्त्वहीन अस्तित्त्वे जेव्हां अस्तिवर आपला रोध वाढवत नेतात त्या वेळी अस्तित्वे अंतर्विरोधाच्या दाबाखाली परस्परविरोधी वर्तणूक करू पाहतात. यास विरोधाभास कसे म्हणावे ? विरोधाभास हे सहज भौतिक आहे. मूदेपासून उत्पन्न झालेली शिळा पूजनीय ञ्हरू शकते तर त्याच शिळेच्या छोट्याशा तुकड्याने गावपातळीवर स्वच्छतेचे धडे गिरवले जातात यास विरोधाभास कसे म्हणावे ? या चराचरात पदार्थ व्यापून राहीलेला आहे. पदार्थ स्वतःमधे विरोधी नाही. आपणास दिसतात त्या त्याच्या दोन बाजू. इंग्रजी सहा हा अंक दुस-या बाजूने इंग्रजी नऊ दिसतो.
तद्वतच संजू उभा राहून जे लिहू शकणार नाही ते कदाचित लवंडलेल्या अवस्थेत लिहू शकतो.

हे जगच अंतर्विरोध, बाह्यरोध आणि प्रतिरोधाने भारलेले आहे. अस्तित्त्वहीन अस्तित्त्वे जेव्हां अस्तिवर आपला रोध वाढवत नेतात त्या वेळी अस्तित्वे अंतर्विरोधाच्या दाबाखाली परस्परविरोधी वर्तणूक करू पाहतात. यास विरोधाभास कसे म्हणावे ? विरोधाभास हे सहज भौतिक आहे. मूदेपासून उत्पन्न झालेली शिळा पूजनीय ञ्हरू शकते तर त्याच शिळेच्या छोट्याशा तुकड्याने गावपातळीवर स्वच्छतेचे धडे गिरवले जातात यास विरोधाभास कसे म्हणावे ? या चराचरात पदार्थ व्यापून राहीलेला आहे. पदार्थ स्वतःमधे विरोधी नाही. आपणास दिसतात त्या त्याच्या दोन बाजू. इंग्रजी सहा हा अंक दुस-या बाजूने इंग्रजी नऊ दिसतो.
तद्वतच संजू उभा राहून जे लिहू शकणार नाही ते कदाचित लवंडलेल्या अवस्थेत लिहू शकतो.. >>> +११११११११११११११११११११११११११११११

तुम्ही लिहिलेला विरोधाभास सिनेमा बघतांना लक्षातच आला नाही. सही निरिक्षण.
पण तुम्ही म्हणता ते खरे आहे.... आपण चाहते अक्कल गहाण ठेऊन सिनेमा बघायला जातो.
अवांतर वाटेल पण एक सांगू का?- अशी दुसर्‍याची अक्कल काढल्याने (तुम्ही सत्य किंवा त्यांच्या भल्याचे सांगत असलात तरी) त्यांच्या भावना नाही दुखावल्या तरी त्यांना थोडे वाईट वाटतेच. हाही एक प्रकारचा विरोधाभासच म्हणायचा..

{{{ सुनील दत्त ज्यावेळी मरतो त्याच्या आदल्या दिवशी संजूने एका लेखकालाही लाजवेल असा लेख सुनील दत्तवर लिहिलेला असतो. तो लेख ऐकून सगळेच प्रेक्षक रडायला लागतात. अरे जरा विचार करा हा तोच संजू आहे ज्याने सुरवातीलाच स्पष्ट केलं होतं कि त्याला चार शब्द लिहता येत नाहीत तो असा लेख लिहू शकतो का? }}}

बाप मुलाचं भावनिक नातं त्याच्याकडून असा लेख लिहून घेऊ शकेल. त्या नात्यातच ती ताकद आहे.