विसरू कसा मी तुला

Submitted by महादेव सुतार on 21 July, 2018 - 10:25

ह्रदयात असणारी
स्वप्नात दिसणारी
गोड हसणारी
माझी प्रेमीका
निरागस मनाची
चांगल्या स्वभावाची
निस्वार्थी प्रेमाची
माझी प्रेमीका
माझ्या ह्रदयाला आवडणारी
माझ्या मनाला भुलवणारी
माझ्या प्रत्येक शब्दात असणारी
माझी प्रेमीका
तिचं हसणं गोड
मनाला माझ्या तिची ओढ
हात धरला की म्हणते सोड
माझी प्रेमीका
आई वडिलांचा मान ठेवते
वडीलधाऱ्या माणसांचा आदर करते
गरिबांना मदत आणि अन्यायावर लढते
माझी प्रेमीका
एवढी पण नाही गोरी
पण सुंदर दिसते
चेहऱ्यापेक्षा
मनाने सुंदर वाटते
म्हणून मला खूप आवडते
माझ्या स्वप्नांत येणारी माझी प्रेमीका..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ok sir