अंतर

Submitted by सुप्रिया जाधव. on 18 July, 2018 - 15:02

अंतर

किती झाकशील मला ?
माझा अपुरा पदर
डोक्यावरून ओढता
ओका-बोका पाठीवर

सांग कुठवर असा
मला देशील आधार ?
माझ्या पायातला काटा
तुला करेल बेजार

मान जाईल खालती
रोखू नकोस नजर
तुझ्या मागे कशी धावू ?
तुला ठेंगणे अंबर

उरफाटे हे गणित
तुला कधी कळणार ?
तुझ्या जवळ आणते
तुझे राखले अंतर

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users