ती निघाली - द्विशतशब्दकथा

Submitted by किल्ली on 15 July, 2018 - 09:44

त्या विशिष्ट वेळी घाईघाईने एका प्रवासाचा आरंभ करण्यास ती निघाली.
ह्या प्रवासाच्या प्रत्येक पल्ल्यावर संघर्ष करावा लागतो हे माहित असूनही ती जाण्यास निघाली.
शेवटी काहीही झाले तरी आयुष्यात कर्तव्यपूर्ती महत्वाची हे जाणून ती निघाली.
पहिला टप्पा कुठलेही विघ्न न येता सुरळीत पार पडला. दुसऱ्या टप्प्यावर सुरु झाला संघर्ष!! हो संघर्षच तो! तिच्यासारख्याच सैनिकांचा जमाव तिला आडवा आला. एकेकाला चपळाईने झपाट्याने मागे टाकत ती निघाली.
पुढच्या टप्प्यावर निसर्गाची अवकृपा सहन करावी लागली. पण संरक्षक कवच आणखी मजबून करून ती पुढे निघाली.
अशा प्रकारे मजल दरमजल करत, अडथळ्यांची शर्यत पार करत, येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत, वेळेशी जणू स्पर्धा करत, ती निघाली.
शेवटच्या टप्प्यावर जे काही दिसले ते बघून ती स्तब्ध झाली. इप्सित साध्य झाले होते.
हिरवीकंच रानोमाळ पसरलेली झाडं , मऊशार ओलसर गवत, काळीभोर मऊ मऊ माती, पाण्याने गच्च भरलेले आणि कधीही कोसळतील असे वाटणारे ढग, उंच आणि हिरव्यागार वनराईने नटलेल्या टेकड्या, टेकड्यांवर ओथंबून वाहणारे मेघ, सावळा रंग मिरवणारे आभाळ, रंगीबेरंगी डौलदार फुले हे सगळं पाहून नेत्रांचे पारणे फिटले. तिच्या मेहनतीचे फळ मिळाले होते.
इतक्यात …………………………………………………………………………
टंऽऽऽऽग आवाज झाला…………………………………………………….
ऍक्सेस कार्ड स्वाईपचा!!
आज सुद्धा ऐन पावसाळ्यात खूप रहदारी असूनही हिंजवडी फेज ३ स्थित तिच्या आयटी कंपनीच्या प्रांगणात ती ऑफिसच्या वेळेत पोचली!!!
आजचा संघर्ष पूर्ण झाला होता, निदान एका वेळेचा तरी!!!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------

पुण्यात हिंजवडी हा औद्योगिक विशेषतः आयटी भाग म्हणून ओळखला जातो. येथे सह्याद्रीच्या डोंगररांगा असल्यामुळे पावसाळ्यात निसर्ग प्रसन्न असतो.
पण ह्या ऋतूत खूप जास्त रहदारीला सामोरे जावे लागते. अतिशय गजबजलेला आणि रहदारीचा हा भाग आहे. पुण्याच्या सर्व भागातून हिंजवडीकडे जाण्यास एकच रस्ता आहे. रोज जाण्या येण्यात खूप वेळ लागतो. ह्या तथ्यास अनुसरून वरची कथा लिहिली आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
आपले ह्यासंदर्भात काही अनुभव असतील तर जरूर सांगा
कथा सहन केल्याबद्दल धन्यवाद! Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद सायुरी,आदीसिद्धी,अक्षय दुधाळ ,च्रप्स Happy
@च्रप्स:
हो, मेट्रो येणार आहे असं ऐकलंय, काम सुरु झालं नाहीये पण अजून , मार्ग काय असेल तेही निश्चित माहित नाही.
लवकरच येईल अशी आशा करायला हरकत नाही Happy
मी आयटी वाली हिंजवडीकर आहे. सदर कथेला स्वानुभव म्हणता येईल Lol

बरीये, प्न १९७ शब्द आहेत, २०० नाही
सहज गम्म्त म्ह्नुन मोज्ले, दोन्दा

दोन्ही वेलेला १९७ शब्द्च आहेत

भारी !!
मला आधी गोगलगाय किंवा मुंगी असं वाटत होतं !! Lol